All SportsSports Historysports newsTennis

रॉजर फेडरर याने वसूल केलेले संस्मरणीय गुण

रॉजर फेडरर याने वसूल केलेले संस्मरणीय गुण

विश्वातला महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने 15 सप्टेंबर 2022 रोजी निवृत्तीची घोषणा केली आणि टेनिसप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला. रॉजर फेडरर याचे हे काही संस्मरणीय सामने, ज्यात त्याने अप्रतिम शॉटच्या जोरावर घेतलेले गुण.

1. मार्क फिलिप्पोसिसविरुद्ध 2003 ची विम्बल्डन फायनल

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=-rD17DukZ90″ column_width=”4″]

2003 मध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉजर फेडरर विरुद्ध मार्क फिलिप्पोसिस (Mark Philippoussis) यांच्यातील रोमहर्षक सामना कोणीही विसरणार नाही. हा सामना टीव्हीवर लोकांनी मोठ्या संख्येने पाहिला. या सामन्यात फेडररने दोन गुण सलग घेतले. फेडररने हुशारीने घेतलेला मॅचपॉइंट कमालच होता. त्याने बेसलाइनवरून हाफ व्हॉलीवर, वाइड-अँगल ग्राउंडस्ट्रोक आणि रेषेच्या खाली एक चमकदार फोरहँडचा फटका मारत सामना खिशात घातला. फेडरर त्या वेळी 22 वर्षांचा होता, तर फिलिप्पोसिस 27 वर्षांचा होता.

2. आंद्रे अगासीविरुद्ध 2005 मधील अमेरिकन ओपनची अंतिम फेरी

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=pIdoGK8dQlY” column_width=”4″]

अवघ्या चोविशीतला रॉजर फेडरर आणि पस्तिशीतला आंद्रे अगासी यांच्यातील 2005 मधील अमेरिकन ओपनचा सामना. अगासी लोकप्रियतेच्या शिखरावर होता, तसा निवृत्तीच्या उंबरठ्यावरही होता. अगासीची क्रेझ इतकी होती, की रॉजर फेडरर याच्या एकदम विरुद्ध होती. जवळपास सगळ्यांचाच अगासीला भावनिक पाठिंबा होता. त्यामुळे त्यालाच ते चीअरअप करायचे. अशा प्रतिकूल परिस्थितीत फेडरर त्याच्यासमोर ज्या ताकदीने खेळला त्याला तोड नव्हती. त्याने बेसलाइनवरून मारलेला शक्तिशाली फोरहँड कौतुकास्पद होता. फेडररच्या कौशल्यासमोर अगासी थक्कच झाला. काही वर्षांनी अगासीने या सामन्याविषयी आपली भावना व्यक्त केली. तो म्हणाला, “ जेव्हा मी 2005 मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत रॉजर फेडररविरुद्ध खेळलो, तेव्हा त्याच्याविरुद्ध मारलेला प्रत्येक फटका तो परतावून लावायचा. रॉजरच्या कोर्टवर अशी कोणतीही सुरक्षित जागा मला दिसली नाही, जेथे मी चेंडू मारू शकतो. रॉजरची सर्व्हिस, परतीचे फटके, नेटवरील त्याचा खेळ अप्रतिमच होता. त्याच्या अष्टपैलू खेळाने तो माझ्यापेक्षा वरचढ ठरला.”

3. जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्याविरुद्ध 2009 मधील फ्रेंच ओपनचा उपांत्य फेरीतील सामना
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=uJ5VLghZrks” column_width=”4″]

2009 मधील ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत रफाएल नदाल याच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच रॉजर फेडरर फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी खेळत होता. त्याच्यासमोर आव्हान होते जुआन मार्टिन डेल पोट्रोचे. फेडररला या वेळी फ्रेंच ओपन जिंकण्याची नामी संधी होती. कारण नदालचे आव्हान रॉबिन सॉडर्लिंगने चौथ्या फेरीतच संपुष्टात आणले होते. कारण नदाल फ्रेंच ओपनमध्ये क्ले कोर्टचा बादशाह समजला जात होता. त्यामुळेच फेडररला पोर्टोविरुद्ध जिंकणे महत्त्वाचे होते. अर्थात हा सामना फेडररसाठी सोपा मुळीच नव्हता. 6 फूट 7 इंच पोट्रोचा ग्राउंडगेम अप्रतिम होता. मात्र, फेडररने आपली सगळी अस्रे वापरत पोट्रोला निष्प्रभ केले. पोर्ट्रोला पराभूत करीत फेडररने नंतर अंतिम सामनाही जिंकत फ्रेंच ओपनच्या किताबावर नाव कोरले.

4. अँडी रॉडिकविरुद्ध 2009 मधील विम्बल्डन स्पर्धेची फायनल

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=rctOtFOXco8″ column_width=”4″]

विम्बल्डन स्पर्धेत रफाएल नदालविरुद्ध रोमहर्षक सामन्यात पाच सेटमध्ये रॉजर फेडररला पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच्या वर्षभरानंतर फेडरर पुन्हा विम्बल्डन स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झाला होता. रॉडिकने पहिला सेट जिंकला आणि टायब्रेकरमध्ये 6-2 ची आघाडी घेतली. रॉडिकने फेडररवर वर्चस्व मिळवत होता. त्याच्या एका फोरहँडने चेंडू फेडररच्या पायाला लागला. तरीही फेडररचं चित्त ढळलं नाही. त्याने बँकहँडचा फटका मारत टायब्रेकची लढत जिंकली. त्याचा पाचवा सेट असाधारण होता, जो त्याने 16-14 असा जिंकला.

5. नोव्हाक जोकोविचविरुद्धची 2010 मधील अमेरिकन ओपनची उपांत्य फेरीतील लढत

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=5mLlIwmukh4″ column_width=”4″]

या यादीमध्ये फेडररपासून दूर गेलेल्या काही गुणांचा समावेश आहे; परंतु त्यांने दिलेली लढत संस्मरणीय ठरली. 2010 ची अमेरिकन ओपन नदाल विरुद्ध फेडरर अशी होईल अशी अटकळे बांधली जात होती. मात्र, फेडररला जोकिविचचा मोठा अडथळा होता. जोकोविचची सर्व्हिस ब्रेक करीत फेडररने 15-40 अशी आघाडी घेतली. फेडररने प्रत्येक गुणासाठी दिलेला हा चिवट लढा कौतुकास्पदच होता. अर्थात, फेडररला अंतिम फेरी गाठता आली नाही, मात्र त्याने दिलेली लढत आजही कोणी विसरले नसतील.

6. जोकोविचविरुद्धची 2011 मधील उपांत्य फेरीची लढत

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=RIEgS8u68cs” column_width=”4″]

2011 मध्ये फेडररची “मंदी” सुरू होती. कारण सलग चार ग्रँडस्लॅम खेळला. मात्र, एकाही स्पर्धेत विजेता होऊ शकला नाही. दुसरीकडे जोकोविचचीही 2011 मधील सुरुवात भन्नाटच होती. त्याने या मोसमात सलग 41 सामने जिंकले होते. अशा स्थितीत फेडररने जोकोविचविरुद्ध जी लढत दिली ती कमालच म्हणावी लागेल. फेडररने ऐन भरातल्या जोकोविचला कोर्टवर अक्षरशः आपल्या तालावर नाचवत चार सेटमध्ये हरवले. अखेरच्या पाचव्या सेटमध्ये या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी अप्रतिम फटके लगावले. फेडररने फ्लिक केलेला बॅकहँड तर अप्रतिमच होता. फेडररने जोकोविचला पराभूत करीत अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. या व्हिडीओत या दोघांमधील लढत पाहताना दंग होऊन जातो.

रॉजर फेडरर याचा तो अखेरचा सामना

 

 

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!