टेनिस स्टार स्लोएने स्टीफेन्स आणि फुटबॉलपटू जोझी अल्टिडोर 5 जानेवारी 2022 रोजी विवाहबंधनात अडकले. दोघांनी इन्स्टाग्रामवर विवाहाची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. हा विवाह सोहळा शादी मियामी बीचवर झाला.
Source : Instagram from jozyaltidore
टेनिस स्टार स्लोएने स्टीफेन्स आणि फुटबॉलपटू जोजी अल्टिडोर यांनी एप्रिल 2019 मध्ये ट्विटरवर साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती. आता ते विवाहबंधनात अडकले आहेत.
स्टीफेन्सने 2017 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. 2018 मधील फ्रेंच ओपनचे विजेतेपद मात्र हुकले. यात ती उपविजेता ठरली. तिने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी आणि विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.
अल्टिडोर 2015 पासून टोरोंटो एफसीकडून खेळत आहे. तो न्यूयॉर्क रेडबुल्स, स्पेनचा विलारियाल आणि शेरेज, तसेच इंग्लंडच्या हल तथा संडरलँडकडूनही खेळला आहे.
स्लोएने स्टीफेन्स
नाव : स्लोएने स्टीफेन्स
देश : अमेरिका
निवास :फोर्ट लाउडरडेल, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म : 20 मार्च 1993, प्लँटेशन, फ्लोरिडा
खेळ : टेनिस
खेळण्याची शैली : उजव्या हाताची खेळाडू (दोन्ही हातांनी बॅकहँड)
2022 पर्यंत मिळविलेल्या बक्षिसांची रक्कम : 16,281,104 डॉलर