All Sportswrestling

भारतीय कुस्तीला आणखी एक धक्का

भारतीय कुस्तीला आणखी एक धक्का

Sumit Malik dope test | सुशील कुमारला खून प्रकरणात अटक केल्याने डागाळलेल्या भारतीय कुस्तीला आणखी एक धक्का बसला आहे. ऑलिम्पिक तिकीट मिळविणारा भारतीय पहिलवान सुमित मलिक (Sumit Malik) उत्तेजक द्रव चाचणीत (dope test) 4 जून 2021 रोजी दोषी आढळला. बल्गेरियात नुकत्याच झालेल्या पात्रता फेरीत तो दोषी आढळला. त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. ही सलग दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, जी सुरू होण्यापूर्वीच खेळाडू उत्तेजक द्रव चाचणीत आढळला आहे. यापूर्वी 2016 मधील रियो ऑलिम्पिकच्या काही आठवड्यांपूर्वीच भारतीय पहिलवान नरसिंग यादव उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळला होता. त्याला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

सुमित मलिक (Sumit Malik) 2018 मधील राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पहिलवान आहे. त्याने बल्गेरियातील स्पर्धेत 125 किलो वजनगटात टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली होती. ऑलिम्पिक पात्रता मिळविण्यासाठी ही अखेरची स्पर्धा होती. आता उत्तेजक द्रव चाचणीत (dope test) दोषी आढळल्याने या 28 वर्षीय मल्लाचे ऑलिम्पिक स्वप्न जवळजवळ भंगले आहे. तो चौथा मल्ल होता, ज्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कोटा मिळवून दिला होता. तत्पूर्वी रवी दहिया (57kg), बजरंग पुनिया (65kg) आणि दीपक पुनिया (86kg) यांनी ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे.

Sumit Malik fails dope test

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) सचिव विनोद तोमर यांनी सांगितले, ‘‘आम्हाला गुरुवारी, 3 जून 2021 रोजी ‘यूडब्लूडब्लू’चा (United world wrestling) ई-मेल मिळाला आहे. सुमित (Sumit Malik) उत्तेजक द्रव चाचणीत ( dope test) दोषी आढळल्याचे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई केली जात आहे. त्याच्या शरीरात ‘5-मिथाइलहेक्सन-2-एमीन (1,4-डाइमिथाइलपेंटाइलमाइन) हा उत्तेजक पदार्थ आढळल्याचे ई-मेलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.’’ मलिकच्या समर्थनार्थ तोमर म्हणाले, ‘‘आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. नकळतपणे त्याच्याकडून ही चूक झाली असावी. कारण त्याची मागची कारकीर्द उत्तम आहे. आम्हीला त्याच्या नमुन्यांच्या परीक्षणाची प्रतीक्षा आहे.’’ साधारणपणे ‘एनाबॉलिक स्टेरॉइड’ विनानिर्दिष्ट आणि ‘स्टिमुलेंट’ (उत्तेजक) निर्दिष्ट पदार्थ असतात.

निलंबन कारवाई चुकीची

दिल्लीतील खेळांचे वकील पार्थ गोस्वामी यांचा असा तक्क आहे, की हा एक निर्दिष्ट पदार्थ आहे. त्यामुळेच मलिकवर तात्पुरत्या स्वरूपाच्या निलंबनाची कारवाई केली जाऊ शकत नाही. गोस्वामी म्हणाले, ‘‘वाडा कलम 2021 नुसार, अशा प्रकरणांत जो खेळाडू एका गैरनिर्दिष्ट पदार्थांसाठी पॉझिटिव्ह आढळतो, त्याच्यावर लगेच अपरिहार्य अस्थायी निलंबन केले जाऊ शकत नाही. जोपर्यंत या प्रकरणात अंतिम निर्णय होत नाही आणि या दरम्यान तो एकही स्पर्धा खेळत नाही, तोपर्यंत अशी कारवाई करता येत नाही.’’ अॅड. गोस्वामी म्हणाले, ‘‘निर्दिष्ट पदार्थाशी संबंधित प्रकरणांत बऱ्याचदा खेळाडूला अस्थायी निलंबनाचा पर्याय दिला जातो. जर खेळाडू स्वेच्छेने अस्थायी निलंबन स्वीकारत असेल तर जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत संबंधित खेळाडू स्पर्धात्मक खेळात भाग घेऊ शकतो.’’ या पुष्ट्यर्थ गोस्वामी यांनी 2019 मधील भारतोलक स्वाती सिंह हिचे उदाहरण दिले.

स्वातीवर अशाच प्रकारच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अॅड. गोस्वामी म्हणाले, ‘‘मी स्वाती सिंह प्रकरणात बाजू मांडली होती. आंतरराष्ट्रीय भारतोलन महासंघाने (International Weight lifting Federation) भारतीय भारतोलन महासंघाला (Indian Weight lifting Federation) एका निर्दिष्ट पदार्थ प्रकरणी अस्थायी निलंबन केल्याने एक नोटीस पाठवली होती. जेव्हा या प्रकरणाचा विरोध करण्यात आला तेव्हा आयडब्लूएफने तातडीने आपला निर्णय बदलला.’’

सुमितची भिस्त बी नमुन्यावर

लखनौतील ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चे तज्ज्ञ डॉ. सरनजीत सिंह यांनी मलिकच्या नमुन्यात मिळालेल्या पदार्थाला निर्दिष्ट पदार्थ म्हंटले आहे. ते म्हणाले, ‘‘हा एक निर्दिष्ट पदार्थ आहे, जो मूत्रातून आढळतो. हा ‘स्टिमुलेंट’ असल्याचे निश्चित रूपाने सांगता येऊ शकते. जर त्याचा बी नमुना पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर निर्बंध लागू शकतो.’’ डॉ. सरनजीत सिंह म्हणाले, ‘‘भारतोलक ख्रिस्तोफर मार्टिनेज याच्या नमुन्यात हाच ‘स्टिमुलेंट’ पॉझिटिव्ह आढळला होता. यूएसएडीएने 10 जानेवारी, 2020 रोजी घोषणा केली होती, की मार्टिनेजने उत्तेजक द्रव चाचणीविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याने त्याने दोन वर्षांचे निलंबन स्वीकारले.’’

मलिक गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याला ही दुखापत ऑलिम्पिक पात्रता गाठण्यापूर्वीच राष्ट्रीय शिबिरादरम्यान झाली होती. त्याने एप्रिलमध्ये अल्माटी येथील आशियाई पात्रता स्पर्धेह सहभाग घेतला होता. मात्र, ऑलिम्पिक कोटा मिळविण्यात तो अपयशी ठरला. मे महिन्यात बल्गेरियातील सोफिया येथे झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत मात्र मलिकने अंतिम फेरी गाठत ऑलिम्पिक कोटा मिळवला. दुखापतीमुळे तो अंतिम फेरी खेळू शकला नाही. ऑलिम्पिकपूर्वी डब्लूएफआयद्वारे टोकियो ऑलिम्पिक कोटा मिळविणाऱ्या पहिलवानांसाठी पोलंडमध्ये सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र, दुखापतीमुळे तो या सराव सत्राला जाऊ शकला नाही.

आयुर्वेदिक औषधांमुळे अडचणीत?

डब्लूएफआयच्या सूत्रांनी सांगितले, ‘‘त्याने नकळतपणे काही घेतले असावे. तो आपल्या जखमी गुडघ्यावरील उपचारासाठी काही आयुर्वेदिक औषधे घेत होता. यात काही प्रतिबंधित पदार्थ असू शकतात’’ ते म्हणाले, ‘‘मात्र, या पहिलवानांनी सावधानी बाळगायला हवी होती. अशा औषधांच्या सेवनाने जोखीम घ्यावी लागेल याची त्यांना चांगलीच जाणीव आहे.’’ मलिकचा बी नमुनाही जर पॉझिटिव्ह आला तर त्याला खेळापासून प्रतिबंधित केले जाऊ शकते. निलंबनाला तो आव्हान देऊ शकतो; पण जोपर्यंत सुनावणी अथवा निर्णय येत नाही, तोपर्यंत तरी त्याला ऑलिम्पिक खेळता येणार नाही. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आठ पहिलवानांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. यात चार पुरुष आणि चार महिला पहिलवानांचा समावेश आहे.

Follow us

Sumit Malik dope tes Sumit Malik dope tes Sumit Malik dope tes Sumit Malik dope tes Sumit Malik dope tes Sumit Malik dope tes

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”73,97″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!