दक्षिण आफ्रिका क्रिकेटला आशा पुन्हा परतण्याची…
जोहान्सबर्ग : ‘कुप्रशासना’मुळे निलंबित करण्यात आलेल्या क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (सीएसए) मंगळवारी सांगितले, की दक्षिण आफ्रिका खेल महासंघ आणि ऑलिम्पिक समितीसोबतची (एसएएससीओसी) sascoc csa meeting | बैठक सकारात्मक झाली.
सीएसएमध्ये प्रशासकीय रचना अस्ताव्यस्त झाली आहे आणि या संघटनेला भ्रष्टाचार, तसेच वर्णद्वेषाच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. अशातच एसएएससीओसीने निलंबनाची कारवाई करीत क्रिकेट संघटनेला दणका दिला.
sascoc csa meeting | संघटनेतील ‘प्रशासनातला भोंगळ कारभार आणि गैरव्यवहाराच्या अनेक प्रकरणांची चौकशी एसएएससीओसीने सुरू केली आहे.
सीएसएने सांगितले, की बैठकीदरम्यान काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऊहापोह झाला आहे.
सीएसएने १५ सप्टेंबरला सांगितले, की ‘‘या बैठकीत सुशासन आणि कार्यकारी संचालनाच्या हितासाठी सहकार्य केले जात आहे.’’
बैठकीत ज्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे, त्याबाबत १७ सप्टेंबर २०२० रोजी संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान चर्चा करणार असल्याच्या मुद्द्यावर दोन्ही संघटनांचे एकमत झाले आहे.
Follow us
Read more