All SportsOther sports

प्रशिक्षकांनाही तंदुरुस्ती चाचणी | SAI coaches to take age-appropriate fitness tests twice a year

 

प्रशिक्षकांना द्यावी लागणार
वर्षातून दोनदा तंदुरुस्ती चाचणी


Follow us

[jnews_footer_social social_icon=”rounded”]

नवी दिल्ली | भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या Sports Authority of India | प्रशिक्षकांना आता वर्षातून दोन वेळा तंदुरुस्तीची चाचणी fitness tests | द्यावी लागणार आहे. साइने (SAI) 5 ऑक्टोबर 2020 रोजी हे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही, तर प्रशिक्षकांना SAI coaches | तंदुरुस्ती चाचणीची नोंद असलेली वैयक्तिक फाइलही करावी लागणार आहे.

साइतर्फे SAI | सांगण्यात आले, की ‘‘वयानुसार तंदुरुस्तीचे निकष पाळूनच ही चाचणी निश्चित केली जाणार आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी ‘फिट इंडिया डायलॉग’दरम्यान केली होती. वयाशी संबंधित ही भारतातील पहिली तंदुरुस्ती चाचणी आहे.’’

तंदुरुस्तीच्या प्रोटोकॉलनुसार fitness protocol | सर्व प्रशिक्षकांची शारीरिक संरचना चाचणी (BMI), संतुलित चाचणी– फ्लेमिंगो संतुलन आणि वृक्षासन, मांसपेशींच्या मजबुतीशी संबंधित चाचणी, नौकासन आदींबरोबरच 2.4 किलोमीटर चालणे किंवा धावण्याचा समावेश आहे.

साइने म्हंटले आहे, ‘‘प्रशिक्षकांच्या माध्यमातून भारतीय क्रीडा प्राधिकरण खेळाडूंच्या सरावासाठी जबाबदार आहे. प्रशिक्षकांना मैदानावर उत्तम प्रशिक्षण देता यावे, यासाठी त्यांची तंदुरुस्ती महत्त्वपूर्ण आहे.’’

साइने दिलेल्या निर्देशांत म्हंटले आहे, ‘‘प्रशिक्षकांना विशिष्ट मर्यादेपर्यंत तंदुरुस्तीची पातळी कायम राखणे आवश्यक आहे. तसे असेल तरच ते खेळाडूंना तंदुरुस्तीचे फायदे सांगू शकतील. त्यामुळेच प्रशिक्षकांना वर्षातून दोन वेळा प्रोटोकॉलनुसार शारीरिक तंदुरुस्ती चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’’

[jnews_block_11 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”80″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!