All SportsCricket

पुजारा, हनुमाला व्हावे लागणार क्वारंटाइन | Cheteshwar Pujara, Hanuma Vihari Quarantine

 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पुजारा, हनुमाला
व्हावे लागणार क्वारंटाइन


Follow us

[jnews_footer_social social_icon=”rounded”]

नवी दिल्ली | चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), हनुमा विहारी (Hanuma Vihari ), तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दुबईत सहा दिवस क्वारंटाइन (Quarantine In Dubai) व्हावे लागणार आहे. क्वारंटाइन होण्यासाठी त्यांना इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम टप्प्यात दुबईत यावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचे 23 ते 25 जणांचे पथक रवाना होणार आहे. कोविड-19 महामारीमुळे जैवसुरक्षेला (Bio Bubble) अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. Cheteshwar Pujara, Hanuma Vihari May Have 6-Day Quarantine In Dubai |

संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) जैवसुरक्षा वातावरणातून ऑस्ट्रेलियातील जैविक सुरक्षित वातावरणात स्थानांतरित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (BCCI) संपूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे.

जैवसुरक्षा नियमांमध्ये कोणताही दिलासा मिळणार नसल्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातही दोन आठवडे क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.

बीसीसीआयची योजना होती, की आयपीएलमध्ये न खेळणारे खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या स्टाफला थेट ऑस्ट्रेलियाला रवाना करण्यात येणार होते. मात्र, आता पर्यायी योजनांवरही विचार सुरू आहे.

दुबईत असलेल्या बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, ‘‘सद्यःस्थितीत सर्वात व्यावहारिक योजना अशी वाटते, की दुबईहून संपूर्ण टीम एका चार्टर्ड विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. त्यासाठी चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्याशिवाय प्रशिक्षकांच्या स्टाफमधील रवी शास्त्री, भरत अरुण, विक्रम राठोड़ आणि आर. श्रीधर यांना ऑक्टोबरअखेरीस दुबईत यावे लागेल.’’

एकूणच आयपीएल न खेळणारे खेळाडू आणि प्रशिक्षण स्टाफला सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी दुबईत काढावा लागण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी वेगळे जैवसुरक्षित वातावरण तयार करावे लागणार आहे. पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी त्यांची चाचणीही घेतली जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर संघ एकत्रितपणे ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकेल.

या योजनेची अंमलबजावणी करणे सोपे आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातील बहुतांश खेळाडू सुरक्षित वातावरणात आयपीएल खेळत आहेत. फक्त उर्वरित खेळाडूंसाठी दुबईत जैव सुरक्षित वातावरण तयार केले जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौऱ्याचा सुरुवातीचा कार्यक्रम पाठवला आहे. मात्र, त्यातही बदल होण्याची शक्यता आहे. कारण कोविड-19 संबंधित स्थिती पाहता ऑस्ट्रेलियातील स्पर्धास्थळे आणि तारखांमध्ये बदल होऊ शकतो.

भारत अॅडिलेड, पर्थ किवा मेलबर्नच्या कोणत्या शहरात आधी प्रवेश करणार आहे, हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. याशिवाय क्वारंटाइनचा कालावधी किती असेल यावरही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा झालेली नाही.

[jnews_block_23 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”65″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!