All SportsCricket

Record of umpiring in most international ODIs | यांच्या नावावर आहे अंपायरिंगचा विक्रम

 

यांच्या नावावर आहे अंपायरिंगचा विक्रम

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 1 नोव्हेंबर 2020 रोजी नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. Record of umpiring in most international ODIs | हा विक्रम गोलंदाज किंवा फलंदाजाच्या नावावर नसून अंपायरच्या नावावर आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय वन-डे सामन्यात अंपायरिंग करण्याचा विक्रम Record of umpiring in most international ODIs | पाकिस्तानचे पंच अलीम डार Aleem Dar | यांनी यांनी केला आहे. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेतील दुसरा सामना असला तरी डार यांचा कारकिर्दीतील हा 210 वा सामना होता.

पाकिस्तानचे 52 वर्षीय अलीम डार Aleem Dar | यांनी दक्षिण आफ्रिकेचे रूडी कर्टजन यांचा सर्वाधिक वन-डे सामन्यांतील अंपायरिंगचा विक्रम Record of umpiring in most international ODIs | मोडीत काढला आहे.

डार यांच्या नावावर सर्वाधिक कसोटी सामन्यांतील अंपायरिंगचाही विक्रम आहे. त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान पर्थ येथे या विक्रमाची नोंद केली आहे. हा त्यांचा विक्रमी 132 वा सामना होता. कसोटी सामन्यात सर्वाधिक अंपायरिंगचा विक्रम नोंदवताना त्यांनी जमैकाचे स्टीव बकनर यांचा विक्रम मोडीत काढला.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत अंपायरिंगचा विक्रम

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत (387) अंपायरिंग करण्याचा विक्रमही Record of umpiring | डार यांच्याच नावावर आहे. याबरोबरच डार यांनी 46 टी- 20 आंतराराष्ट्रीय सामन्यांत अंपायरिंग केली आहे. मात्र, यात ते आपल्याच देशातले अहसान रजा यांच्यापासून तीन सामने मागे आहेत.

कसोटी आणि वनडे या दोन्ही प्रकारांत सर्वाधिक सामन्यांत अंपायरिंग करणे ही सन्मानाची बाब आहे. मी जेव्हा अंपायरिंग करण्यास सुरुवात केली तेव्हा असा काही विक्रम करीन याचा विचारही केला नव्हता. अंपायरिंगच्या कार्यकाळात मी सतत नवीन काही तरी शिकत गेलो.
अलीम डार, क्रिकेट पंच, पाकिस्तान

डार माजी क्रिकेटपटू असून, ते पाकिस्तानात एक दशकापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. ते अष्टपैलू क्रिकेटपटू होते. त्यानंतर ते अंपायरिंगकडे वळले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील जिन्ना स्टेडियमवर फेब्रुवारी 2000 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकदरम्यान खेळविला गेलेला सामना अलीम डार यांच्या अंपायरिंग कारकिर्दीतील पहिला सामना होता. ते गेल्या 16 वर्षांपासून आयसीसीच्या एलिच पॅनलचे अंपायर आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!