All SportsMarathonsports news

one hour running record | एक तासाच्या शर्यतीत विश्वविक्रम

Your Content Goes Here

एक तासाच्या शर्यतीत विश्वविक्रम

रोना महामारीत ब्रुसेल्समध्ये झालेल्या एक तासाच्या शर्यतीत one hour running record | मोहम्मद फराह आणि सिफान हसन यांनी विश्वविक्रमी कामगिरी नोंदवली आहे. डॅम मीटिंग स्मारक येथे ५ सप्टेंबर २०२० मध्ये ही स्पर्धा झाली. 

प्रेक्षकांशिवाय झालेल्या या स्पर्धेत मो फराह याने पुरुषांच्या गटात, तर सिफान हसन हिने महिलांच्या गटात ही कामगिरी केली आहे.

one hour running record | मोहम्मद फराह Mo. Farah | हा चार वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. करोना महामारीमुळे प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

[table id=40 /]

नेदरलँडची सिफान हसन हिने महिला गटात इथिओपियाची डिरे टूने हिचा विक्रम मोडीत काढला. डिरे टुने हिने २००८ मध्ये ओस्लावा गोल्डन स्पाइक मीटिंगमध्ये एका तासात १८.५१७ किलोमीटर अंतर कापले होते. 

[table id=41 /]

मात्र, डिरेचा हा विक्रम मोडीत काढताना सिफान हसनने Sifan Hassan | एका तासात १८.९३० किलोमीटरचे अंतर कापले. मीटिंगच्या अखेरच्या शर्यतीत डायमंड लीग सीरिजचाही समावेश आहे. 

one hour running record | फराहनेही पुरुष गटात हॅले गेब्रसेलास्सीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला. गेब्रसेलास्सीने एका तासात २१.२८५ किलोमीटर अंतर कापत विश्वविक्रम केला होता.

मात्र बशीर अब्दीसोबत धावणारा मूळ सोमालियाचा ब्रिटिश धावपटू फराह याने २१.३३० किलोमीटरचे अंतर कापले. अब्दी त्याच्यापासून आठ मीटर मागे राहिला.

[jnews_block_18 first_title=”हेही वाचा” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”108″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!