डब्लूटीसी फायनलनंतर बी जे वाटलिंग घेणार निवृत्ती
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज बी जे वाटलिंग (B J Watling) याने 12 मे 2021 रोजी निवृत्तीचे (retire) संकेत दिले. पुढच्या महिन्यात जूनमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेनंतर (डब्लूटीसी) क्रिकेटच्या (cricket) सर्वच प्रकारांतून निवृत्ती घेईन, अशी घोषणा वाटलिंग याने केली.
जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम फेरी इंग्लंडमधील साउथम्पटन येथे 18 जून रोजी होणार आहे. विजेतेपदासाठी न्यूझीलंड आणि भारतात अंतिम झुंज रंगणार आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
वाटलिंगचा (B J Watling) जन्म दक्षिण आफ्रिकेतला आहे. न्यूझीलंडच्या २० करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर करण्यापूर्वीच वाटलिंगने निवृत्तीची घोषणा केली. त्याला या यादीत स्थान मिळण्याची शक्यता नव्हती.
cricket BJ Watling retire | वाटलिंगचं वय आता ३५ वर्षे आहे. न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांत वाटलिंगने उत्तम कामगिरी केली होती. त्याने 2009 मध्ये सलामीचा फलंदाज आणि कामचलाऊ यष्टिरक्षकच्या रूपाने कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, 2013 मध्ये जेव्हा ब्रँडन मॅक्लमने कसोटी सामन्यात यष्टिरक्षण करणे सोडले, तेव्हा त्याच्या जागी वाटलिंगला संधी देण्यात आली. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
“हीच योग्य वेळ आहे. कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत कसोटी सामन्यात घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. मैदानावर पाच दिवसांपर्यंत घाम गाळल्यानंतर सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रूममध्ये जे क्षण घालवले ते कायम स्मरणात राहतील.’’
– बी. जे. वाटलिंग (B J Watling)
कसोटी सामन्यांत 3,773 धावा
cricket BJ Watling retire | वाटलिंगने आतापर्यंत 73 कसोटी सामन्यांत 38.11 च्या सरासरीने 3,773 धावा केल्या. यात आठ शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडकडून चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही वाटलिंगच्या नावावर आहे. त्याने 2014 मध्ये भारताविरुद्ध बेसिन रिजर्व्हमध्ये मॅक्लमसोबत चौथ्या विकेटसाठी 362 धावांची भागीदारी रचली होती. सध्याचा कर्णधार केन विलियम्सनसोबत वाटलिंगने श्रीलंकेविरुद्ध भारतातच वर्षभरानंतर पाचव्या विकेटसाठी 365 धावांची भागीदारी रचली.
नववा यष्टिरक्षक कसोटीपटू
कसोटी सामन्यांत द्विशतक करणारा तो नववा यष्टिरक्षक कसोटीपटू ठरला आहे. इंग्ल्ंडविरुद्ध 2019 मध्ये त्याने द्विशतकी खेळी केली होती. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला यष्टिरक्षक आहे. बे ओव्हलमध्ये 2019 मध्ये झालेल्या या सामन्यात त्याने मिशेल सँटनरसोबत सातव्या गड्यासाठी 261 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. वाटलिंगने यष्टिरक्षकाच्या रूपात 257 गडी बाद केले आहेत. हा न्यूझीलंडचा एक विक्रम आहे. यापैकी 249 झेल घेतले आहेत. यात 10 झेलांचा समावेश नाही, जे वाटलिंगने क्षेत्ररक्षक असताना घेतले आहेत. वाटलिंगने सर्वाधिक 73 झेल टिम साउदीच्या गोलंदाजीवर टिपले आहेत. त्यानंतर ट्रेंट बोल्ट (55) आणि नील वॅगनर (53) यांचा क्रमांक लागतो. वाटलिंगला मर्यादित षटकांच्या सामन्यात कमी संधी मिळाली आहे. त्याने केवल 28 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
सामने | डाव | धावा | सर्वोच्च धावा | |
कसोटी | 73 | 114 | 3773 | 205 |
वन-डे | 28 | 25 | 573 | 96 |
टी-२० | 5 | 4 | 38 | 22 |