All SportsHockey

New president of Hockey India | हे आहेत हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

 

हे आहेत हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी ज्ञानेंद्रो निंगोम्बम (Gyanendro Ningombam) यांची 6 नोव्हेंबर 2020 रोजी निवड झाली. New president of Hockey India | यापूर्वी मोहम्मद मुश्ताक अहमद (Mohd Mushtaque Ahmad) अध्यक्ष होते.

मात्र, राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या कार्यकाळातील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने मुश्ताक अहमद यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यांच्या जागेवर आता हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी (New president of Hockey India) मणिपूरचे ज्ञानेंद्रो निंगोम्बम यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अहमद यांना अध्यक्षपदावर राहता आले नसले तरी तरी त्यांची हॉकी इंडिया काँग्रेस आणि वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे हे विशेष. अहमद यांनी खासगी कारण देत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होते.

करोना महामारीमुळे हॉकी इंडियाची Hockey India | बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली.

हॉकी इंडियाचे अध्यक्षपद भूषविणारे ज्ञानेंद्रो निगोंम्बम Gyanendro Ningombam | ईशान्य भागातील पहिले सदस्य आहेत.

2018 मध्ये अहमद यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, ही निवड राष्ट्रीय क्रीडासंहितेच्या नियमांचं उल्लंघन असल्याचा ठपका क्रीडा मंत्रालयाने ठेवला.

त्यामुळे अहमद यांनी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाचा president of Hockey India | राजीनामा देण्यास सांगितले होते. तसेच नव्याने निवडणूक घेण्यास हॉकी इंडियाला सांगितले.

राष्ट्रीय क्रीडासंहितेनुसार कोणताही पदाधिकारी एका पदावर तीन वेळा राहू शकत नाही. अहमद 2010 ते 2014 दरम्यान हॉकी इंडियाचे कोशाध्यक्ष होते. त्यानंतर 2014 मध्ये सरचिटणीस झाले. 2018 मध्ये त्यांची चार वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड झाली होती.

क्रीडा मंत्रालयातर्फे अहमद यांची निवड अवैध असल्याचे 2019 मध्ये सांगण्यात आले. मात्र, अहमद यांची निवड क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेआधीच झाली होती.

ते संघटनेच्या कोशाध्यक्षपदी क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेपूर्वीच नियुक्त झाले होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ गृहीत धरला जाणार नाही, असा युक्तिवाद हॉकी इंडियाने केला होता. मात्र, मंत्रालयाने हा युक्तिवाद फेटाळू लावला.

[jnews_block_8 first_title=”Read more at : ” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”94″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!