इथंही विराट कोहली नंबर वन
लंडन
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने virat kohli | लॉकडाउनमध्ये इन्स्टाग्रामच्या instagram | प्रायोजित पोस्टद्वारे घसघशीत कमाई करणाऱ्या जगभरातील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
एका अहवालानुसार विराट कोहली virat kohli | इन्स्टाग्रामच्या कमाई करणाऱ्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. ‘अटेन’ने 12 मार्च आणि 14 मेदरम्यान नोंदविलेल्या आकडेवारीत ही माहिती नमूद केली आहे. करोना विषाणू महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत.
या यादीनुसार कोहलीने आपल्या प्रायोजित पोस्टद्वारे एकूण 3 लाख 79 हजार 294 पाऊंड कमाई केली आहे. पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याची कमाई सुमारे 18 लाख पाऊंड आहे, तर अर्जेंटिना आणि एफसी बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी (12 लाख पाऊंड), पीएसजीचा नेमार (11 लाख पाऊंड) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. बास्केटबॉलचा महान खेळाडू शाक्विले ओनिल (5,83,628 पाऊंड) आणि इंग्लंडचा फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम (405,359 पाऊंड) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहे.
स्वीडनचा फुटबॉलपटू ज्लाटन इब्राहिमोविच (184,413 पाऊंड), एनबीएचा माजी स्टार ड्वेन वेड (143,146 पाऊंड), ब्राझिलचा फुटबॉलपटू दानी एल्व्स (133,694 पाऊंड) आणि मुष्टियोद्धा अँथोनी जोशुआ (121,500 पाऊंड) आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये आहेत.