Mumtaz Khan Hockey | ‘ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेत पदक जिंकायचंय!’
‘ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेत पदक जिंकायचंय!’
भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघाची फॉरवर्ड खेळाडू मुमताज खान Mumtaz Khan hockey | हिने आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली आहे. तिने १ ऑगस्ट २०२० रोजी सांगितले, माझं लक्ष्य वरिष्ठ संघात आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे आहे. मात्र हे साध्य करण्यासाठी मी टप्प्याटप्प्याने पाऊल टाकणार आहे.
सतरा वर्षीय मुमताजने Mumtaz Khan hockey | २०१८ मध्ये अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे युवा ऑलिम्पिकमध्ये दहा गोल केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने रौप्यपदक मिळवले होते.
तिची कामगिरी एवढ्यापर्यंतच सीमित नाही, तर २०१६ मध्ये महिलांच्या १८ वर्षांखालील आशिया करंडक (Asia Cup) स्पर्धेत कांस्यपदक, २०१८ मध्ये सहा देशांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रौप्य आणि गेल्या वर्षी २०१९ मध्ये ‘कँटर फिट्जगेराल्ड अंडर-२१ इंटरनॅशनल फोर-नेशन्स टूर्नामेंट’ (Cantor Fitzgerald under-21 International Four-Nations tournament) मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
मुमताज म्हणाली, ‘‘मला माहीत आहे, की मी आतापर्यंत जी कामगिरी केली आहे, ती माझ्या दृष्टीने कमीच आहे. कारण मला जे हवं आहे, त्याच्या तुलनेत ही कामगिरी काहीच नाही. मी एकेक पाऊल टाकण्याबरोबरच नेहमीच योग्य पद्धतीने पुढे जात आहे.’’
एका भाजीविक्रेत्याची मुलगी असलेल्या मुमताजचा Mumtaz Khan hockey | प्रवास अनेक चढ-उतारांचा आहे. लखनौची ही खेळाडू देशासाठी चांगलं काही तरी करण्याचा संकल्प उराशी बाळगून आहे.
हेही वाचा…. संघर्षकन्या मुमताज खान
ती म्हणाली, ‘‘हे कोणापासूनही लपून राहिलेलं नाही, मी वैयक्तिक पातळीवर अतिशय कठीण काळ अनुभवला आहे. हा काळ माझ्या आईवडिलांसाठीही अतिशय त्रासदायक राहिला आहे. मात्र, मला आनंद आहे, की ते नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि मला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. त्यासाठी मी आणखी वाट नाही पाहू शकत.’’
ती म्हणाली, ‘‘मी उराशी एक ध्येय बाळगले आहे. ते म्हणजे प्रत्येक प्रशिक्षण सत्रात मन लावून अभ्यास करायचा आणि देशासाठी खेळताना प्रत्येक सामन्यात उत्तम कामगिरी करायची. ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धांसारख्या मोठ्या स्पर्धांत पदक जिंकण्यासाठी भारतीय संघाची मदत करण्याची माझी इच्छा आहे.’’
मुमताजने सांगितले, की शालेय स्पर्धेत शर्यतीत भाग घेतला असताना प्रशिक्षकांनी मला पाहिलं. त्यांनी माझी गुणवत्ता हेरून माझी निवड हॉकीसाठी केली.
ती म्हणाली, ‘‘मला वाटतं, ती २०११ ची शालेय स्पर्धा होती. शर्यतीच्या वेळी नीलम सिद्दिकी तेथे उपस्थित होत्या. मी हॉकी खेळावं म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं. त्या वेळी मला खेळाविषयी फारसं काही माहीत नव्हतं. मात्र जेव्हा मी हॉकी खेळ पाहिला आणि खेळायला सुरुवात केली तेव्हा मला मजा आली.’’
4 Comments