All SportsHockey

मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचं निधन

मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचं निधन

भारतीय हॉकी संघाचा माजी सदस्य व मॉस्को ऑलिम्पिक 1980 मध्ये सुवर्णपदक विजेते रविंदर पाल सिंह (Ravinder Pal Singh) यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. त्यांनी शनिवारी, 8 मे 2021 रोजी लखनौ येथील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला (hockey player Ravinder Pal Singh dies). ते 60 वर्षांचे होते. दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

रविंदर पाल सिंह यांना 24 एप्रिल रोजी लखनौतील विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते रुग्णालयातून घरी परतले. मात्र, शुक्रवारी त्यांची तब्येत पुन्हा खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

1984 मध्ये लॉस एंजिल्स ऑलिम्पिक खेळलेले रविंदर पाल सिंह अविवाहित होते. त्यांच्या मागे भाची प्रज्ञा यादव आहे. रविंदर पाल सिंह 1979 मध्ये ज्युनिअर विश्व कपही खेळले होते. हॉकी सोडल्यानंतर त्यांनी स्टेट बँकेतूनही स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सीतापूरमध्ये जन्मलेले रविंदर पाल सिंह यांनी 1979 ते 1984 दरम्यान हॉकीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ते सेंटर हाफमध्ये खेळायचे. दोन ऑलिम्पिक (1980, 1984) व्यतिरिक्त ते 1980 आणि 1983 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 1982 विश्व कप आणि 1982 मध्ये एशिया कपही खेळले.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”94″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!