• Latest
  • Trending
IPL 2021 postpone

IPL 2021 postpone | आयपीएल स्थगित होण्याची प्रमुख कारणे

May 14, 2021
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 2, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

IPL 2021 postpone | आयपीएल स्थगित होण्याची प्रमुख कारणे

IPL 2021 postpone | इंडियन प्रीमियर लीग (IPL) 4 मे 2021 रोजी अनिश्चितकाळासाठी का स्थगित करण्यात आली...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
May 14, 2021
in All Sports, IPL
0
IPL 2021 postpone
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

आयपीएल स्थगित होण्याची प्रमुख कारणे

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 4 मे 2021 रोजी अनिश्चितकाळासाठी का स्थगित (IPL 2021 postpone) करण्यात आली, त्यामागची कोणकोणती कारणे आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जैव सुरक्षित वातावरणात (बायो बबल) आयपीएल आयोजित करूनही स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातमध्ये करोना संकटकाळातच आयपीएल आयोजित करण्यात आली होती. तेथेही जौव सुरक्षित वातावरण (Bio Bubble) वातावरण होते. तेथे आयपीएलचे सत्र यशस्वी झाले. मग भारतातच आयपीएलला का ग्रहण लागले, यामागे अनेक कंगोरे आहेत.

मिश्रा, साहा पॉझिटिव्ह आढळल्याने निर्णय


आयपीएल अनिश्चितकाळासाठी स्थगित (IPL 2021 postpone) करण्यात आली आहे. काहींच्या मते, ही स्पर्धा पुढच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आयपीएलच्या सूत्रांनी ही शक्यता फेटाळली आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आयपीएलवर टीका होऊ लागली होती. तरीही आयपीएल स्थगित (IPL 2021 postpone)  करण्यात आली नाही. मात्र, जेव्हा सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, तेव्हा आयपीएलच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर आयपीएल अनिश्चितकाळासाठी स्थगित (IPL 2021 postpone) करण्यात आली. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होऊ शकते. हा फक्त अंदाज आहे. योग्य वेळ आल्यानंतर या स्पर्धेबाबत निर्णय होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

पहिला झटका


चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी आणि कोलकाता नाइट रायडर्सचे (KKR) गोलंदाज संदीप वारियर्स, वरुण चक्रवर्ती यांना कोरोना झाला. आयपीएलला बसलेला हा पहिला झटका. त्यामुळे आणखी संसर्ग वाढू नये म्हणून आयपीएलचे दोन सामने स्थगित (IPL 2021 postpone) करण्यात आले होते. आयपीएलमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह अनेक देशांतील खेळाडूंचा सहभाग होता. संसर्गाच्या घटना समोर आल्यानंतर अनेक खेळाडूंचा जीव धोक्यात आला असता. आयपीएल 9 एप्रिल 2021 पासून सुरू झाली होती. केकेआरमध्ये संसर्गाचा शिरकाव होण्याच्या आधीपासून आयपीएलचा प्रवास निर्धोकपणे सुरू होता. नंतर दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरील कर्मचारीही पॉझिटिव्ह सापडले. दिल्ली तथा जिल्हा क्रिकेट संघटनेचे (DDCA) अध्यक्ष रोहन जेटली यांनी सांगितले, की यापैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणावरही मैदानाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नव्हती. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू कोविड-19 च्या भीतीने लीगमधून बाहेर पडले. कोविड-19 मुळेच 2020 मध्ये यूएईमध्ये जैव सुरक्षित वातावरणात आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी स्पर्धेपूर्वी संसर्गाच्या घटना घडल्या होत्या. मात्र, स्पर्धा सुरू झाल्यानंतर निर्धोकपणे ही स्पर्धा होऊ शकली. भारतात मात्र तसे घडले नाही हेच दुर्दैव.

पहिल्यांदाच स्थगित झाला आयपीएलचा सामना


केकेआर-आरसीबी सामना स्थगित करावा लागला


सीएसकेच्या स्टाफमध्येही कोरोनाची बाधा


कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रकोपानंतरही इंडियन प्रीमियर लीग सुरूच ठेवण्यात आली होती. अखेर 5 मार्च 2021 रोजी कोरोनाने आयपीएलमध्ये (IPL) दस्तक दिली. कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे 5 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूविरुद्ध (RCB) अहमदाबादमध्ये होणारा सामना स्थगित करावा लागला आहे. एवढेच नाही तर चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघातही कोविड पॉझिटिव्हची प्रकरणं समोर आली. केकेआर (KKR) आणि आरसीबी (RCB) दरम्यान 5 मार्च 2021 रोजी सायंकाळी अहमदाबाद येथे सामना होणार होता. मात्र, आयपीएलमध्ये (IPL) कोरोनाने (Corona) शिरकाव केल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी आणि स्टाफच्या अन्य सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना पॉझिटिव्हचा चुकीचा अहवाल असल्याचे सांगत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सारवासारव केली होती. मात्र, बालाजी आणि एक ड्रायव्हरची दुसऱ्यांदा चाचणी घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले.

सीएसकेच्या पथकातील सदस्य, सीईओ काशी, गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी आणि बसचालक यांची 5 मार्च 2021 रोजी सकाळी चाचणी घेतली होती. त्यात हे सर्व पॉझिटिव्ह आढळले. नंतर मात्र त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आढळली. आरटी पीसीआर चाचणीत बालाजी आणि बसचालक पुन्हा पॉझिटिव्ह आढळले. संघातील इतर सदस्य विशेषत: खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली होती.

कोरोनाचा विळखा आणखी घट्ट


कोरोनाचा विळखा हळहळू घट्ट बसत असतानाही बीसीसीआयने स्पर्धा सुरूच राहील, यावर सारखा जोर देत होती. मात्र, 3 एप्रिल 2021 रोजी संसर्गाच्या घटना समोर आल्यानंतर आयपीएलवर कोरोनाचा विळखा आणखी घट्ट बसत असल्याची प्रचीती आली. लेग स्पिनर चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज वारियर अवघ्या तिशीतले खेळाडू. त्यांना क्वारंटाइन व्हावं लागलं. दुर्दैव म्हणजे, या दोन्ही खेळाडूंपैकी वारियरला या आयपीएलच्या सत्रात एकदाही खेळायला मिळालेले नाही. त्यात आता क्वारंटाइन व्हावे लागल्याने जवळजवळ त्याच्या खेळण्याची आशा धूसरच झाली. संसर्गाच्या या घटनेपर्यंत केकेआरने सात सामने खेळले होते. केकेआरने 29 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अहमदाबादमध्ये सामना खेळला होता. संसर्गाच्या घटना समोर आल्यानंतर स्पर्धेत भीतीचे वातावरण तयार झाले.

गंभीर बाब तर ही होती, की जैवसुरक्षित वातावरणात स्पर्धा खेळविली जात असल्यानंतरही संसर्गाच्या घटना समोर येत होत्या. एक तर बायो बबलमध्ये काही तरी दोष आहे किंवा वातावरणात तरी. चक्रवर्तीला संसर्ग कशामुळे झाला, याचा शोध घेतला असता वेगळेच कारण समोर आले. त्याला दुखापत झाली होती म्हणून खांद्याचे स्कॅन करण्यासाठी तो रुग्णालयात गेला होता. तेथून तो परतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळला. चक्रवर्तीची आयपीएलच्या सत्रातील कामगिरी कौतुकास्पद होती. त्याने केकेआरच्या सर्वच सामन्यांत भाग घेतला होता. सात गडी बाद करीत संघातील सर्वांत यशस्वी खेळाडू ठरला होता. आयपीएलच्या सुरुवातीलाही काही खेळाडूंना संसर्ग झाला होता. यात अक्षर पटेल आणि देवदत्त पडिक्कलसारख्या खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला किंवा सहयोगी स्टाफला संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना होती. भारतात कोविड-19 बाधितांची रोज तीन लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.

सदोष ‘बायो बबल’वर प्रश्नचिन्ह


संयुक्त अरब अमिरातमध्ये 2020 मध्ये ‘बायो बबल’चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला होता. तत्पूर्वी इंग्लंडमध्येही बायो बबलच्या वातावरणात विंडीजविरुद्धच्या क्रिकेट मालिकाही यशस्वीपणे झाल्या. ही उदाहरणे समोर असताना बीसीसीआयच्या आशा पल्लवित झाल्या. भारतातही जैव सुरक्षित वातावरणात आयपीएलसारख्या स्पर्धा घेता येऊ शकतील, हा विश्वास मिळाला. मात्र, बायो बबलची व्यूहरचना काटेकोरपणे राबविण्यात भारत सपशेल अपयशी ठरला. बायो बबलचे सर्रास उल्लंघन होत होते. यावर आता खेळाडूही उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानेही बायो बबलबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. कोविड-19 महामारीदरम्यान भारतात इंडियन प्रीमियर लीग घेताना काही गोष्टी आणखी उत्तम करता आल्या असत्या, असे सूचक विधान कमिन्सने व्यक्त केले आहे. कोलकाता नाइट रायडर्स टीमचा सदस्य असलेल्या कमिन्सने यूएईमधील आयपीएल सत्राचे कौतुक केले. मात्र, त्या तुलनेत भारतातील आयपीएल सत्राबाबत त्याने नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत आयपीएल सत्र रद्द करण्यात आले होते. मात्र, नंतर यूएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय झाला होता.

आयपीएलचे 2021 चे सत्र भारतात आयोजित करताना यात अनेक शहरांचा समावेश करण्यात आला. मात्र, एकूणच स्थिती पाहता बीसीसीआय यापेक्षा उत्तम काही तरी करू शकली असती, असे कमिन्स म्हणाला. या सत्रात ऋद्धिमान साहा, अमित मिश्रा, वरुण चक्रवर्ती, संदीप वारियर, लक्ष्मीपति बालाजी कोरोनाबाधित झाले. फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीदेखील कोविड-19 पॉजिटिव्ह आढळला. आयपीएलच्या आयोजनावरूनच देशात टीकेचे मोहोळ उठले होते. आयपीएल खेळणे योग्य की अयोग्य याबाबत कमिन्सही द्विधा मन:स्थितीत होता. तो म्हणाला, आम्ही भाग्यवान आहोत, की आम्ही सुरक्षित आहोत. मात्र दुसरीकडे लोक प्राथमिक सेवा-सुविधांपासून वंचित आहेत, उपचारासाठी संघर्ष करीत आहेत. आयपीएल स्थगित (IPL 2021 postpone) झाल्यानंतर कमिन्सला उपरती आली असली तरी यातून बीसीसीआय काही बोध घेतील याची शक्यता तशी कमीच आहे.

आयपीएल स्थगित होण्याची ही प्रमुख कारणे

  • संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘बायो बबल’चे वातावरण सदोष होते. आयपीएल स्थगित होण्यामागचे हे प्रमुख कारण आहे.
  • नियमांचे काटेकोर पालन नाही. मैदान कर्मचाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष, दिल्लीत मैदान कर्मचाऱ्यांना बाधा झाल्यानंतर बायो बबलच्या मर्यादा उघड
  • नियमांचे काटेकोर पालन नाही. मैदान कर्मचाऱ्यांकडे साफ दुर्लक्ष, दिल्लीत मैदान कर्मचाऱ्यांना बाधा झाल्यानंतर बायो बबलच्या मर्यादा उघड
  • अनेक शहरांमध्ये आयपीएलचे सामने घेण्याचा अट्टहास नडला. त्यामुळे खेळाडूंना दीर्घ प्रवास करणे भाग पडले.
  • महत्त्वाचे म्हणजे खेळाडू, प्रशिक्षकांच्या चाचण्या सदोष
  • खेळाडूंना संसर्ग झाल्यानंतर सामना स्थगित करण्याची नामुष्की
  • नंतर आणखी दोन जणांना करोनाची बाधा झाल्याने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय

एकूणच या कारणमीमांसेवर आपल्याला काय वाटते हे आम्हाला जरूर कळवा. अशाच अनेक माहितीपूर्ण स्टोरीज आपल्यासाठी घेऊन येत राहू. तोपर्यंत आम्हाला फॉलो करा…

Follow us:

IPL 2021 postponeMajor reasons for IPL 2021 postponementIPL 2021 postpone
IPL 2021 postponeIPL 2021 postponeIPL 2021 postpone

हेही जरूर वाचा...

महिला क्रिकेट वर्ल्ड कप
All Sports

महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

by Mahesh Pathade
February 2, 2023
भारतीय क्रिकेट 2022
All Sports

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

by Mahesh Pathade
January 23, 2023
टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे वेळापत्रक
All Sports

टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे वेळापत्रक

by Mahesh Pathade
October 30, 2022
वर्ल्ड कप वेस्ट इंडीज
All Sports

टी-20 वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज संघाच्या पराभवाची कारणे

by Mahesh Pathade
October 22, 2022

 

Tags: IPL 2021 postponeआयपीएल स्थगित
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
hockey player Ravinder Pal Singh dies

मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!