योगाची आधुनिक ओळख | Modern introduction to yoga

Modern introduction to yoga
योगाची आधुनिक ओळख
पुरातन काळापासून योगाचे महत्त्व सर्वांना माहितीच आहे. मात्र, दिवसेंदिवस ते आपल्यापुढे प्रखरतेने येत आहे. चालीरीती, रूढी-परंपरा जशा बदलत गेल्या, त्याचप्रमाणे योगसाधनेच्या रूपातही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे.
योग Yoga | ही आपली संस्कृती आहे. प्राचीन शास्त्र आहे.
योगशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हेच महत्त्व पाश्चात्त्य देशातील लोकांनी ओळखले. त्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी भारतात येऊन शिक्षण घेतले व त्यांच्या देशात प्रचार- प्रसार करण्यास सुरुवात केली. भारतातही हे अवघड शास्त्र सोप्या भाषेत शिकून प्रसार केला.
विशेषतः अष्टांगयोगातील तिसरी पायरी आसन यामध्ये विविधता निर्माण करून एक स्टाइल विकसित करून उत्सुकता निर्माण केली.
विविध नावे, पद्धती, रूपे तयार केली. सर्वसामान्यांपर्यंत लहान मुले, महिला यांच्यापर्यंत सहज ही साधना याचा प्रसार व्हायला मदत झाली. योगाभ्यासामुळे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांनाच लाभ मिळतो. जर नियमित सराव केला तर… पण ही आवड निर्माण होणे आवश्यक आहे.
1. राजयोग, 2. हठयोग, 3. मंत्रयोग, 4. ज्ञानयोग, 5. लययोग, 6. कर्मयोग, 7. भक्तियोग.
यामध्ये सर्व योगाभ्यास समाविष्ट आहे. तो अवघड आहे. त्याचे काही भाग विशेषतः आसनांबद्दलचा- हा सोप्या भाषेत योगाच्या आधुनिक पद्धतीत सांंगितला जातो, जो लहान मुलांनाही पटकन समजेल-उमजेल. त्याचे महत्त्व पटेल.
योगाशास्त्राविषयी आत्मीयता वाढेल. योगाभ्यासात नावीन्यता आणून हठयोगातील आसनांमध्ये विविधता व बदल आणून योगासनांचे विविध प्रकार प्रचलित केले गेले आहेत. या आधुनिक प्रचाराबद्दलच आपण आज थोडक्यात जाणून घेऊया.
योगाच्या प्रसारासाठी काही योगाभ्यासकांनी काही गोष्टींची सांगड घालून ते प्रकार खूप छान पद्धतीने सादर केले. त्याचे महत्त्व, होणारे फायदे सर्वांसमोर आणून योगाचा प्रसार केला. आपल्या इथेसुद्धा (भारतात) हे आधुनिक प्रकार सर्वत्र शिकवले जातात. त्यातील काही प्रकार बघूया…
पॉवर योगा Power Yoga |
नावातच आहे योगाची पॉवर- ताकद. यात खरे तर हठयोगाचाच अभ्यास केला जातो; परंतु जलद पद्धतीनेे. याच आसनाची साखळी पद्धतीने विशेष तंत्र वापरून सराव केला जातो.
हा एक प्रकारचा कार्डियो व्यायाम प्रकार आहे म्हणूनही केला जातो. याच्या सरावाने क्षमता, ताकद, लवचिकता वाढते. वजन व अतिरिक्त चरबी कमी होते. खूप मनोवेधक प्रकार आहे.
आपल्याकडे जसे पूर्वीपासून दोरीचा मलखांब केला जातो. थोडेफार तसेच एक टांगलेल्या कपड्यावर योगासने व कसरती केल्या जातात. बाहेरच्या देशांतून खूप प्रचलित आहे.
गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने योग या सिद्धान्तावर आधारित आहे. या प्रकाराच्या स्पर्धासुद्धा होतात. एरियल योग Aerial yoga | व योग ऑन हॅमॉक Yoga on Hammock | असे दोन प्रकार यामध्ये येतात.
हॅमॉक Hammock | म्हणजे कापडाचा झुला/झोळीच. जमिनीपासून वर उंचावर या कापडाच्या साह्याने आसने केली जातात. यामध्ये हाताची, खांद्यांची, पाठीची ताकद वाढण्यास मदत होते. हा थोडा अॅडव्हेंचरयुक्त (धाडसी) योगप्रकार आहे; पण योग्य मार्गदर्शनाखालीच शिका, अन्यथा त्रास होऊ शकतो.
आर्टिस्टिक योग Artistic Yoga |
हा संगीताच्या तालावर विविध आसनांचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये एक प्रकारची लय (rhythm) साधून आसनांचा अभ्यास खूप छान होतो.
मानसिक ताणतणाव संगीतामुळे एकदम कमी होऊन जातो. रिलॅक्स वाटते. मानसिक, वैचारिक सक्षम होण्यास मदत होते. स्वतःकडे संपूर्ण लक्ष केंद्रित होते. त्यामुळे खूप छान लाभ होतो.
माझ्या मते, योग व संगीत यांची योग्य सांगड घातल्यास प्रत्येकालाच खूप छान लाभ होईल. ताणतणावापासून मुक्ती मिळेल.
आर्टिस्टिक योग Artistic Yoga |, ऱ्हीदमिक योग Rhythmic Yoga |, योगा फ्लो Yoga flow | हे प्रकार संगीताच्या तालावर केले जातात. यांच्या स्पर्धाही असतात; पण स्पर्धेपेक्षा स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी नक्की सराव करावा.
योगा वुइथ प्रॉप Yoga with props |
या प्रकारात हातामध्ये किंवा विशिष्ट काही वस्तू घेऊन योगाभ्यास केला जातो, ज्यामुळे योगास्नानचा सराव करणे सोपे जाते किंवा काही अवघड आसने करणे सोपे जाते.
काही विशिष्ट प्रॉप हातात घेऊन किंवा कपाळावर ठेवून योगासने केल्यास किंवा कपाळावर ठेवून योगासने केल्यास प्रचंड एकाग्रता वाढते.
मनावरील संयम वाढतो. चिडचिड, राग कमी होतो. उदा. दीपयोग काही विशिष्ट प्रॉप्स वापरून आसने केल्याने म्हणजेच योगारोप बेल्ट, ब्रिक्स, बेंच, रोलर यांच्या मदतीने आसने केल्यास छान लाभ होतो. आसनांची स्थिती (Posture) उत्तम जमते.
आज आपण काही आधुनिक योगप्रकार पाहिले. पुढच्या भागात अजून काही प्रकार जाणून घेऊ. मात्र, यात सर्वांचे प्रशिक्षण त्या त्या योगतज्ज्ञांकडूनच घेणे आवश्यक आहे. कुठलीही विद्या आत्मसात करताना योग्य असा गुरूच हवा. गुरू सांगे विद्या असे म्हंटलेच आहे.
[jnews_block_9 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]
One Comment