All Sportssports newsTokyo Olympic 2020

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूला रौप्य

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा प्रारंभ वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या ऐतिहासिक रौप्य पदकाने झाला. या रौप्य पदकासह मीराबाई चानूने भारतोलन स्पर्धेत भारताची 21 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा 24 जुलै 2021 रोजी संपुष्टात आणली. 49 किलो वजनगटात रौप्य पदक जिंकले, तेव्हा मीराबाई चानूच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. अर्थातच हे आनंदाचे होते. कारण पाच वर्षांपूर्वी निराशाजनक कामगिरीमुळे रियो ऑलिम्पिकच्या याच मंचावरून मीराबाईला रडत रडत मायदेशी परतावे लागले होते. 

मीराबाई चानूच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारत पदक तालिकेत झळकला. भारताने भारतोलन स्पर्धेत अशी कामगिरी यापूर्वी कधीच केली नव्हती. मणिपूरच्या 26 वर्षीय मीराबाई चानूने एकूण 202 किलो (87 किलो + 115 किलो) वजन उचलले. ही रुपेरी कामगिरी कर्णम मल्लेश्वरीच्या 2000 सिडनी ऑलिम्पिक कांस्य पदकापेक्षा सरस ठरली. या कामगिरीमुळे तिने 2016 च्या रियो ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीच्या वेदनाही विसरायला लावल्या. रियोमध्ये तिला एकही वैध वजन उचलता आलं नव्हतं.

मीराबाईच्या चेहऱ्यावर शनिवारी, 24 जुलै 2021 रोजी आत्मविश्वास जाणवत होता. संपूर्ण स्पर्धेत तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य विलसत होते. तिच्या कानात ऑलिम्पिक रिंगच्या आकारातील बुंदे चमकत होते. ही रिंग तिच्या आईने तिला गिफ्ट केली होती.  

चीनच्या होऊ जिहुई हिने 210 किलो (94 +116 किलो) वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. इंडोनेशियाच्या ऐसाह विंडी कांटिका हिने 194 किलो (84 +110 किलो) वजन उचलत कांस्य पदक जिंकले. स्नॅच हा प्रकार मीराबाई चानूची कमजोरी मानला जात होता. मात्र, तिने पहिल्याच प्रयत्नात स्नॅचमध्ये 84 किलो वजन उचलले. त्यासाठी तिने थोडा वेळ घेतला होता हेही तितकंच खरं आहे. पुढच्या प्रयत्नात तिने 87 किलो वजन उचलले. नंतर यात आणखी वाढ करीत 89 किलोपर्यंत नेले. ही कामगिरी तिच्या वैयक्तिक 88 किलोपेक्षा एक किलोने अधिक होती. गेल्या वर्षी तिने राष्ट्रीय स्पर्धेत तिने 88 किलो वजन उचलले होते. अर्थात, ती स्नॅचमध्ये आपल्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा उत्तम कामगिरी करू शकली नाही. तिने स्नॅचमध्ये 87 किलो वजन उचलले. याउलट जिहुईने याच प्रकारात 94 किलो वजन उचलत नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित केला. याच चिनी जिहुईच्या नावावर 96 किलो वजन उचलण्याचा विश्वविक्रमही आहे.

क्लीन अँड जर्क प्रकारात चानूच्या नावावर विश्वविक्रम आहे. तिने पहिल्या दोन प्रयत्नांत 110 आणि 115 किलो वजन उचलले. मात्र, अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात ती 117 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. मात्र, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतलं पहिल्यावहिल्या रौप्य पदकावर वेटलिफ्टर मीराबाई चानूने नाव कोरलं. तिच्यामुळे भारताचं पदकांचं खातं तर उघडलं. पदक जिंकल्यानंतर तिने अश्रूंना वाट करून दिली. प्रशिक्षक विजय शर्मा यांना आलिंगन देत आपला आनंद व्यक्त केला. नंतर तिने ऐतिहासिक पोडियमवर स्थान मिळविण्याचा आनंद पंजाबी भांगडा करीत साजरा केला. तिच्या आनंद मास्कमागे लपलेल्या चेहऱ्यातूनही स्पष्टपणे जाणवत होता.

ऑलिम्पिकच्या कोव्हिड-19 प्रोटोकॉलमुळे विजेत्यांना सोशल डिस्टन्स राखणे बंधनकारक आहे. त्यांना ग्रुप फोटो काढण्यासाठीही एकत्र येता येत नाही. मात्र, आनंदाच्या भरात तिन्ही पदकविजेत्यांना एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि फोटोही काढला. मात्र एका अधिकाऱ्याने त्यांना अंतर राखण्याची सूचना केली. मीराबाईने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक ठिकाणी स्वत:ला सिद्ध केलं. फक्त ऑलिम्पिक पदकाचीच उणीव होती. आता तीही उणीव भरून काढली आहे. तिने जागतिक स्पर्धेत सुवर्ण, राष्ट्रकुल स्पर्धेत (2014 मध्ये रौप्य आणि 2018 मध्ये सुवर्ण) दोन पदके आणि आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे.

मीराबाई ऑलिम्पिक रौप्य

मीराबाईच्या कानातील रिंग


ऐतिहासिक रौप्य पदकाने मीराबाई चानूच्या चेहऱ्यावर विलसलेले हास्य तिच्या सगळ्या भावना सांगून जातं. मात्र, आणखी एका गोष्टीकडे लक्ष जातं, ते म्हणजे तिच्या कानातील रिंग. तिने कानात ऑलिम्पिकच्या पाच रिंगचे सोन्याचे डूल परिधान केले होते. हा कानातील दागिना तिच्या आईने पाच वर्षांपूर्वी तिला भेट दिला होता. त्यासाठी आईने तिचे दागिने विकून तो बनवला होता. मीराबाईच्या आईला खात्री होती, की यामुळे तिचं भाग्य चमकेल. मात्र, रियो 2016 मध्ये असं काही झालं नाही. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाईने सकाळी पदक जिंकलं. त्या वेळी तिच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. सेखोम ओग्बी तोम्बी लीमा हे मीराबाईच्या आईचं नाव.

मणिपूरच्या आपल्या घरी असलेल्या लीमा म्हणाल्या, ‘‘मी टीव्हीवर तिच्या कानातले पाहिले. मी तिला 2016 च्या रियो ऑलिम्पिकपूर्वी मी भेट दिले होते. माझ्याकडे जे सोनं होतं आणि काही साठवलेल्या पैशांतून मी तिला ते केले होते. अपेक्षा हीच, की यामुळे तिचं भाग्य चमकेल आणि तिला यश मिळेल.’’

मीराबाईची कामगिरी पाहण्यासाठी तिच्या घरी अनेक नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली होती. मणिपूरची राजधानी इम्फाळपासून 25 किलोमीटरवर नोंगपोक काकचिंग या गावात मीराबाईचं घर आहे. कोविड-19 महामारीमुळे येथे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असे असतानाही शुक्रवारी रात्रीपासूनच पै-पाहुण्यांची वर्दळ वाढली. मीराबाईला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. मीराबाईच्या नात्यातील बहीण अरोशिनी हिने सांगितले, ‘‘मीराबाई फारच कमी घरी येते. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आहे. आज सकाळी तिने आम्हा सर्वांशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला. आईवडिलांचे आशीर्वाद घेतले.’’

Follow us

मीराबाई ऑलिम्पिक रौप्य मीराबाई ऑलिम्पिक रौप्य मीराबाई ऑलिम्पिक रौप्य मीराबाई ऑलिम्पिक रौप्य मीराबाई ऑलिम्पिक रौप्य मीराबाई ऑलिम्पिक रौप्य

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!