‘शॉर्ट रन’ने आयपीएल वादाच्या भोवऱ्यात
दुबई | दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पराभव किंग्स इलेव्हन पंजाबला भयंकर अस्वस्थ करीत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानंतर आता नवाच वाद उपस्थित होऊ लागला आहे. या वादाचे कारण ठरला आहे ‘शॉर्ट रन.’ KXIP appeal against ‘short run’ call |
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानी अंपायर नितीन मेनन यांनी वादग्रस्त ‘शॉर्ट रन’ दिला होता. त्याविरुद्ध पंजाबच्या खेळाडूंनी या ‘शॉर्ट रन’विरुद्ध अपील केले आहे.
KXIP appeal against ‘short run’ call | पंजाबच्या माजी खेळाडूंनीही यावर मत व्यक्त करताना, याबाबत तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याची मागणी केली आहे.
या ‘शॉर्ट रन’चा मुद्दा टीव्ही फूटेजमुळे समोर आला आहे. हा सामना सुपरओव्हरमध्ये जाण्यापूर्वी स्क्वेअर लेग अंपायर मेनन यांनी 19 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनला ‘शॉर्ट रन’साठी टोकले होते.
मात्र, टीवी रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसते, की जॉर्डनने पहिली धाव घेताना बॅट क्रीझच्या आत होती. या चेंडूवर दोन धावा काढण्यात आल्या होत्या. मात्र, मेनन यांनी सांगितले, की जॉर्डन क्रिझपर्यंत पोहोचलेला नव्हता. मयंकने मारलेल्या फटक्यावर ही घटना घडली होती. त्यामुळे मयंक अग्रवाल आणि पंजाबच्या धावसंख्येत केवळ एका धावेची भर पडली.
KXIP appeal against ‘short run’ call | टीव्ही फूटेजमध्ये दोन धावा काढल्याचं स्पष्ट दिसत असतानाही निर्णयात बदल करण्यात आला नाही.
‘‘मी सामनावीर पुरस्काराशी अजिबात सहमत नाही. ‘शॉर्ट रन’ देणाऱ्या अंपायरला हा बहुमान द्यायला हवा.’’ – वीरेंद्र सेहवाग
अखेरच्या षटकात पंजाबला जिंकण्यासाठी १३ धावा हव्या होत्या. अशा वेळी पहिल्या तीन चेंडूंवरच मयंकने १२ धावा केल्या. मात्र, सामना टाय झाल्यानंतर तो सुपर ओव्हरमध्ये गेला. यात दिल्लीने विजय मिळवला.
किंग्स इलेव्हन पंजाबचे सीईओ सतीश मेनन म्हणाले, ‘‘आम्ही सामन्याच्या पंचांकडे अपील केले आहे. मानवाकडून चूक होऊ शकते. मात्र, आयपीएलसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत अशी चूक मान्य नसते. ती एक धाव आम्हाला प्लेऑफपासून वंचित ठेवू शकते.’’
सतीश मेनन म्हणाले, ‘‘पराभव हा पराभवच असतो. मात्र, असा पराभव योग्य नाही. आम्हाला आशा आहे, की नियमांची समीक्षा होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका होण्याची सूतराम शक्यता राहणार नाही.’’
अपिलात जाऊनही त्यावर काही निर्णय होण्याची आशा कमीच आहे. कारण आईपीएल नियम 2 .12 (अंपायरचे निर्णय) नुसार अंपायरचा निर्णय तेव्हाच बदलू शकतो, जेव्हा तो तत्क्षणी घेतला जातो. याशिवाय अंपायरचा निर्णय हा अंतिम असतो.
KXIP appeal against ‘short run’ call | ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडीने सांगितले, की तांत्रिक मदत घेण्यासाठी नियमात बदल करायला हवा.
ते म्हणाले, ‘‘त्या वेळी तिसऱ्या अंपायरचा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, नियम असे सांगतो, की हा नियम स्पर्धा होण्यापूर्वी तयार करायला हवा होता.’’
भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकर म्हणाला, ‘‘तिसऱ्या अंपायरने दखल घेत मेनन यांना सांगायला हवं होतं, की तो ‘शॉर्ट रन’ नव्हता. मेनन यांनी जर निर्णय बदलला असता तर कोणाचीही हरकत नसती. कारण तोही एक निर्णयच होता.’’
प्रीती झिंटा काय म्हणाली?
किंग्स इलेव्हन पंजाबची सहमालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणाली, ‘‘मी नेहमीच जय-पराजय क्रीडोदात्त वृत्तीनेच स्वीकारते. मात्र, नियमांत बदल करण्याची गरज आहे. जे झाले, ते झाले. मात्र, भविष्यात असं होऊ नये.’’
Read more....
आयपीएल संघांतील मुख्य खेळाडू रिटेन करणार की कायम राहणार?
आयपीएलचे मुख्य खेळाडू बदलायचे की कायम ठेवायचे, हा प्रश्न फ्रँचायजींना भेडसावतोय. आयपीएल खेळाडूंच्या रिटेन कालमर्यादेपूर्वीच काही खेळाडूंबाबत फ्रँचायजींमध्ये ही द्विधा...
आयपीएलमध्ये आणखी दोन संघ… बीसीसीआय होणार मालामाल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणखी मालामाल होणार आहे. कारण आयपीएलमध्ये आणखी दोन संघ सहभागी होणार असून, या संघांचा सोमवारी...
IPL 2021 postpone | आयपीएल स्थगित होण्याची प्रमुख कारणे
आयपीएल स्थगित होण्याची प्रमुख कारणे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 4 मे 2021 रोजी अनिश्चितकाळासाठी का स्थगित (IPL 2021 postpone) करण्यात...
केकेआरचा कर्णधार मॉर्गनला दंड
केकेआरचा कर्णधार मॉर्गनला दंड कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) कर्णधार इयॉन मॉर्गनला (Eoin Morgan) १२ लाखांचा दंड झाला आहे. चेन्नई सुपर...
तुम्हाला क्रिकेटचे किती नॉलेज आहे?
तुम्हाला क्रिकेटचे किती नॉलेज आहे? How much knowledge do you have of cricket? क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ. सध्या आयपीएलचे...
Who will win today? Delhi or Bengaluru? | आज कोण जिंकणार? बेंगलुरू की दिल्ली?
Who will win today? Delhi or Bengaluru? आज कोण जिंकणार? बेंगलुरू की दिल्ली? अबुधाबी, एक नवंबर | Who will win...