Diwali Spacial 2019Jagjit Singh

रेकॉर्ड विकली गेल्याने जगजीत सिंग यांचे बल्ले बल्ले (भाग 3)

रेकॉर्ड विकली गेल्याने जगजीत सिंग यांची बल्ले बल्ले झाली; पण संभ्रम हा होता, की कोणामुळे ही रेकॉर्ड विकली गेली? कारण त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरेश राजवंशीच्याही आवाजातील दोन गझला होत्या; पण यामुळे जगजीत सिंग यांना एक फायदा झाला, की या मायानगरीत आता ते अनोळखी राहिले नाहीत.

[jnews_element_socialiconitem social_icon=”facebook” social_url=”https://www.facebook.com/kheliyad”]   [jnews_element_socialiconitem social_icon=”twitter” social_url=”https://twitter.com/kheliyad”]   [jnews_element_socialiconitem social_icon=”youtube” social_url=”https://www.youtube.com/channel/UCtDg3ouSUEsZ-kt8Z83dhAA?sub_confirmation=1″]   [jnews_element_socialiconitem social_icon=”linkedin” social_url=”https://www.linkedin.com/in/maheshpathade03″]   [jnews_element_socialiconitem social_icon=”instagram” social_url=”https://www.instagram.com/kheliyad/”]

kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549


डील निवृत्त झाले होते. संपूर्ण कुटुंब लुधियानात येऊन राहू लागलं. घरची परिस्थिती खालावत चालली होती. अशा परिस्थितीत वडिलांकडून काय मागणार…? या वेळी हरदमनसिंग भोगल जणू काही देवदूत म्हणून आले. भोगल सायकलींचा व्यापार करीत होते. ते म्हणाले, “जगजीत तू तुझे स्वप्न पूर्ण कर. दर महिन्याला मनीऑर्डर मी पाठवेन. पैशांमुळे तुला परत यावं लागणार नाही. बस तू तुझं कौशल्य दाखव.”

या दिलाशाने जगजीतच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. ते मनात म्हणाले, “आयुष्यात कोणीच देव पाहिला नाही, पण देवाचे रूप असेल तर ते भोगलमध्ये आहे.” पुन्हा एकदा जगजीतने कोणालाही न सांंगता पठाणकोट एक्स्प्रेस पकडली. 19 मार्च 1965 चा तो दिवस होता. ही गाडी तीन दिवसांनी मुंबईला पोहोचायची. मुंबईत पोहोचल्यानंतर हरदमनने सहा-सात महिने 200 रुपये प्रतिमहिना पाठवले. घरात कोणालाच माहीत नव्हतं, की या वेळी गेलेला जगजीत खरोखर जगाला जिंकण्यासाठी गेला आहे. घरच्यांना कोणालाच जगजीत कुठे गेला हे माहीत नव्हतं. फक्त हरदमनला माहीत होत. अखेर महिनाभरानंंतर जगजीतची चिठ्ठी आल्यावर घरच्यांना कळलं, की जगजीत मुंबईला गेला आहे. कुरुक्षेत्र विद्यापीठात होस्टेलमध्ये राहत असताना जगजीत दर आठवड्याला शनिवारी- रविवारी घरी यायचा आणि सोमवारी परत होस्टेलवर परतायचा. नंतर तीन आठवडे झाले तरी जगजीत घरी आला नाही, म्हणून वडिलांनी दुसऱ्या मुलाला सांगितले, की त्या भोगलला विचार बरं, का आला नाही जगजीत? भोगलला विचारले तर त्याने सांगितले, की अरे, तो तर मुंबईला गेला आहे. त्याने कोणाला सांगायला लावले नाही. तूही कोणाला सांगू नकोस. भावाने कोणाला सांगितले नाही आणि महिनाभरानंतर जगजीतची चिठ्ठी आल्यानंतर नेमका काय तो उलगडा झालाच.

सुरुवातीच्या काळात जगजीत मुंबईत एल्फिन्स्टन रोडवरील गोप हाऊसमध्ये राहत होता. त्या वेळी ते खूपच स्वस्त होतं. रोज सकाळी चर्चगेटसाठी लोकल पकडावी लागायची. दिवसभर इकडेतिकडे धावपळ सुरू असायची. थकूनभागून आल्यानंतर रात्री अंथरुणावर अंग टाकून द्यायचं, असा त्याचा नित्यक्रम. काही दिवसांनंतर गोप हाऊसमधूनही एक प्रकारे जगजीतची हकालपट्टीच झाली. गरिबाचा कोणी वाली नसतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय आला.

एकदा रूमवर जगजीत परतला तर सामान बाहेर पडलेलं. जगजीत चकित झाला. अरे हे काय झालं? त्याने त्याच्या पार्टनरचा शोध घेतला, तर त्याचा रूम पार्टनर रात्री साडेदहा वाजता आला.

जगजीत म्हणाला, “अरे माझं सामान बाहेर कसं काय?”

तर तो म्हणाला, “सामान तर माझंही बाहेर आहे. मी तुझ्यासाठी इथं आलोय. मी ही रूम सोडलीय.” मग जगजीतला कळलं, की तोही एक भाडेकरू होता, ज्याने आपल्यालाच पोटभाडेकरू म्हणून ठेवलं; पण मूळ मालक वेगळाच होता!

नंतर जगजीतसह तो आग्रीपाडा भागातील शेर-ए-पंजाब होस्टेलमध्ये राहायला आला. त्या वेळी 35 रुपये भाडे होते. दोघांनी मिळून ते भरण्याचा निर्णय घेतला. नंतर तोही दुसरीकडे निघून गेला. कारण तो नोकरी करीत होता. जगजीत मात्र आणखी दोन-तीन वर्षे तिथेच राहिला. तेथे सुविधा अशा होत्या, की कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नव्हती. चहा मागवायचा असेल, तर वरतूनच आवाज द्यायचा, “अरे दो कप चाय भेज..” चहा यायचा. थाली भेज, तर थाळी यायची. कदाचित ताजमध्ये वेळ लागेल, पण शेर-ए-पंजाबमध्ये पटापट सर्व्हिस मिळायची. याच दिवसांत जगजीतला भेटले सुभाष घई. सुभाषला हिरो बनायचे होते, तर जगजीतला गायक. दोघेही स्वप्नांचे गाठाेडे उराशी घेऊन फिरत होते. सुभाष घईंना अजूनही हा संघर्षमय प्रवास आठवत असेल.

सुभाष घई जगजीत सिंग यांना पंजाब विद्यापीठापासून ओळखत होते. पंजाब विद्यापीठात सुभाषची अभिनयकला लोकप्रिय होती. त्या वेळी जगजीत डीएव्ही कॉलेजकडून शास्त्रीय संगीत स्पर्धेसाठी यायचा. त्या वेळी जगजीतने अनेक पुरस्कार जिंकले होते. तिथूनच सुभाष आणि जगजीतच्या मैत्रीचे धागे घट्ट झाले. त्यानंतर अचानक सुभाष मुंबईत जगजीतला भेटला. सुभाष चकित. जगजीतला म्हणाला, “अरे तू इथे कसा?””

“मी गायक बनण्यासाठी इथे आलोय.” – जगजीत सिंग

“अरे वाह, मीही इथं अभिनेता बनण्यासाठी आलोय.” – सुभाष

मग काय, निघाले दोघे संघर्षाचा अध्याय रचायला. कालांतराने हे दोघे आठवड्यातून दोनदा मरीनलाइन्स, मरीनड्राइव्हला भेटू लागले. दोघेही एकमेकांना आपल्या दुखभऱ्या कहाण्या सांगत होते.

तेथे जगजीतला आणखी एक देवदूत लाभला. ते म्हणजे बेरी हॉटेलचे मालक बेरी. तरुणांचे ते मदतगार. बऱ्याचदा मोफत जेवण द्यायचे, चहा पाजायचे आणि जगजीतसाठी संधीही शोधायचे. आजच्या जमान्यात असे लोक कुठे मिळतात हो.. त्यांनी काही हॉटेलांमध्ये व काही मैफलींमध्ये गायनाची संधी दिली. पैसेबैसे काही मिळत नव्हते, पण रात्रीचं जेवण मिळायचं आणि काही मोठी लोकं जगजीत यांचं गाणं ऐकायचे. जगजीतला वाटायचं, की कदाचित कुणाला तरी गाणं आवडो आणि लॉटरी लागो. जगजीत हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गाणे गायचा, पंजाबी टप्पे आणि मागणीप्रमाणे गीतेही सादर करायचे. अगदी श्रीमंतांच्या पार्टीतही ते गाणे गाण्यासाठी जायचे. चार पैसे तरी मिळायचे. लोकं जगजीतच्या गाण्यावर अक्षरशः थिरकायचे. जगजीत बिझी झाला, पण दिल्ली अजूनही दूर होती.

त्या काळात जगजीतने थ्री पिस सूट शिवला होता. तो परिधान करून रोज गाणे गायचे. या आठवणी ते महेश भटसोबत शेअर करायचे. महेश भट प्रोत्साहनही द्यायचे. महेश भट म्हणायचे, जगजीत, त्या काळात मैफिलींमध्ये गायचे. थोडे फार पैसे मिळायचे. त्यात त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. ते मला म्हणायचे, की मी मुंडण सेरेमनीतही गायचो!

सुभाष घई तर अ‍ॅक्टिंग करण्यासाठी आले होते; पण अ‍ॅक्टिंगचा रोल मिळाला जगजीत सिंग यांना. त्या वेळी 1967 मध्ये “अमन” नावाचा चित्रपट आला होता. त्यात हिरो होते राजेंद्र कुमार. या चित्रपटात त्यांचा एक सरदार दोस्त होता. तो सरदार दोस्त म्हणजे जगजीत सिंग. नंतर जेव्हा कधी जगजीत सिंग स्वतःची अ‍ॅक्टिंग पाहतात तेव्हा त्यांना हसू आवरत नसायचं. मनात म्हणायचे, बरं झालो अ‍ॅक्टर झालो नाही ते. या चित्रपटात जगजीत सिंग राजेंद्र कुमारला “ओ जियो पापेजी” असे ओरडत त्याला उचलून घेतो आणि थोडासा संवाद आहे…

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=EdkK8pVRAqc” column_width=”4″]

जगजीत सिंग यांची गाडी हळूहळू दौडायला लागली होती. नव्या गायकांमध्ये लोक जगजीत यांच्या नावाची चर्चाही करू लागले होते. त्यांना ते छान वाटायचं; पण आतून बेचैन व्हायचे. कधी ब्रेक मिळेल, याची चिंता त्यांना सतावत होती.

एक दिवस अशीच काहीशी सुरुवात झाली. 1966 मध्ये एचएमव्ही कंपनीचे आमंत्रण मिळाले. त्या काळात गाण्यांचे रेकॉर्ड निघायचे. त्याला काळा तवा म्हणायचे. कंपनीने सांगितले, की आम्ही तुझ्या दोन गझलांची ईपी काढू. ईपीमध्ये एका बाजूने किमान दहा मिनिटे रेकॉर्डिंग व्हायचे. म्हणजे दोन गझला. रेकॉर्डिंग झाले. त्यांनी कव्हरवर छापण्यासाठी त्यांना जगजीत सिंग यांचा एक फोटो हवा होता. सगळ्यांनी सांगितलं, की पगडी, संगीत आणि दाढी यात मोठा विरोधाभास आहे. जर तू सफाचट झाला तर अधिक चांगलं वाटेल. आता ही गोष्ट जगजीत वडिलांना तर सांगू शकत नव्हते; पण मोठ्या भावाला माफी मागून चिठ्ठी लिहिली, की “आता मी शीखरूपात तुम्हाला दिसणार नाही” 9 जानेवारी 1966 रोजी हे अंतर्देशीय पत्र लिहिले होते. त्यात लिहिले होते, मी आता मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आहे. इथले लोक शीख व्यक्तीला आर्टिस्ट म्हणून स्वीकार करीत नाहीत. त्यामुळे पगडी-दाढीपासून मुक्ती आवश्यक आहे.

जेव्हा जगजीत सिंग नव्या रूपात आले तेव्हा त्यांनी मोठ्या भावाला पुन्हा एक अंतर्देशीय पत्र लिहिलं. त्यात लिहिले, की मी माझी चूक मान्य केली. वडील तर खूप दिवस जगजीत सिंग यांच्यावर नाराज होते. त्यांनी तर बोलणेच सोडले होते. जगजीत यांचे मोठे भाऊ जसवंतसिंग यांनी ही आठवण सांगितली.

“वडील लोकांना सांगायचे, की आपण एक चांगला शीख बनून राहायला हवं. शब्दकीर्तन, गुरूग्रंथमध्ये विश्वास ठेवायला पाहिजे. शीख धर्म सोडला नाही पाहिजे. हे ते दुसऱ्यांना सांगायचे. नंतर त्यांना कळलं, की आपल्याच मुलाने बट्टा लावला तर ते तीन दिवस घरातून बाहेर निघाले नाही. त्यांना वाटायचं, की लोक काय म्हणतील? पण नोकरी होती म्हणून येणं-जाणं तर होणारच होतं. बाहेर पडायलाच हवं. जे काही झालं ते त्यांनी स्वीकारलं, पण सद्मा तर मोठा बसला होता”

जेव्हा जगजीत सिंग यांचा चेहरा रेकॉर्डवर प्रसिद्ध झाला तेव्हा लोकांनी ओळखलंच नाही. फेब्रुवारी 1966 मध्ये हा रेकॉर्ड मार्केटमध्ये आला. तो इतका हिट झाला, की त्याच्या पाच हजार प्रती विकल्या गेल्या. एचएमव्हीवाले तर थक्क झाले. त्यात जगजीत सिंग यांनी एक गझल मुकेशची कॉपी करून गायिली, तर दुसरी स्वतःच्या खास शैलीत.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=fzivT1xnsmM” column_width=”4″]

अपना गम भूल गये
तेरी जफा भूल गये
हम तो हर बात
मोहब्बत के सिवा भूल गये

ही या रेकॉर्डमधील पहिली गझलस जी मुकेशच्या शैलीत गायली. दुसरी गझल खास जगजीत सिंगह यांनी यांच्या शैलीत होती, ती गझल होती…

आंख को जाम समझ बैठा था अंजाने में
साकिया होश कहा था तेरे दिवाने में…

ही रेकॉर्ड विकली गेल्याने जगजीत सिंग यांची बल्ले बल्ले झाली; पण संभ्रम हा होता, की कोणामुळे ही रेकॉर्ड विकली गेली? कारण त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरेश राजवंशीच्याही आवाजातील दोन गझला होत्या; पण यामुळे जगजीत सिंग यांना एक फायदा झाला, की या मायानगरीत आता ते अनोळखी राहिले नाहीत. याच काळात जगजीत यांना रेडिओ सिलॉनवाल्यांनी रेकॉर्ड केले. त्या काळात रेडिओ सिलॉनमध्ये संधी मिळणे खूप मोठी गोष्ट होती. जगजीत सिंग यांचं 5 फेब्रुवारी 1966 च्या रात्री आठ वाजता फुलवारीमध्ये पहिल्यांदाच गाणं लागलं होतं.

(रेडिओ सिलॉनची एक टॅगलाइन वाजायची. 60 च्या दशकातील पिढीला ती चांगली ठाऊक असेल… आपका पुराना साथी रेडिओ सिलॉन…)

(क्रमशः)

गझल गायक जगजीत सिंग आणि चित्रा यांच्या लग्नाची गोष्ट! (भाग 5)

[jnews_widget_facebookpage title=”Follow on Facebook Page kheliyad” url=”https://www.facebook.com/kheliyad” small=”true” header_icon=”fa-facebook-square” url=”https://www.facebook.com/kheliyad” header_type=”heading_4″ header_background=”#3b5998″ header_text_color=”#ffffff”] [jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”104″]

Related Articles

2 Comments

  1. जगजीत सिंग यांच्या जिवनातील चढ उतार अतिशय सुरेख रितीने मांडलेले आहेत. खुप खुप छान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!