All SportscoronavirusOther sports

मोकळ्या मैदानातील खेळ (sports) आणि व्यायाम (exercise) : करोना (coronavirus) लढाईत प्रभावी साधन 

मोकळ्या मैदानातील खेळ आणि व्यायाम करोना लढाईत प्रभावी साधन

विजय पुरंदरे


sports, exercise and Coronavirus | ‘करोना’ (Coronavirus) एक साधा तीन अक्षरी शब्द.. वर्ष-दीड वर्षांपूर्वी कोणालाही माहिती नसलेला! मागच्या वर्षी सुरवातीला कुठे कुठे कुजबूज ऐकू येऊ लागली आणि मग मास्कचा आग्रह सुरू झाला आणि एक दिवस आपल्या शब्दकोशात आणखी दोन शब्दांची भर पडली- सोशल डिस्टन्स आणि लॉकडाउन (Social distance and Lockdown). चीनमधील वुहानमध्ये उगम असलेला हा कोव्हिड-19 (Covid-19) नावाचा अभद्र व्हायरस बघता बघता संपूर्ण जगभर पसरला आणि जगाचा अव्याहतपणे सुरू असलेला गाडा करकचून ब्रेक मारल्यासारखा जागेवरच थांबला.

विमाने, रेल्वे, बस, वाहने, ऑफिस, उद्योग, दुकाने, हॉटेल, शाळा, कॉलेज सगळेच बंद. लाट वाढू लागली. हॉस्पिटल भरून जाऊ लागली. करोना (Coronavirus) कसा पसरतो, कसा वाढतो, त्याला औषध काय, ट्रीटमेंट काय, मास्कचा वापर, त्याचे विविध प्रकार, सॅनिटायझर, फवारणी, सोशल नव्हे, खरे तर फिजिकल डिस्टन्सिंग यांवर विविध मते, चर्चा, संशोधन यातून निर्माण झालेली मार्गदर्शक तत्त्वे (SOP) हे सर्व आपण अक्षरशः घरात बसून पाहत होतो. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणे आणि सकारात्मक प्रतिसाद हे पृथ्वीवरील मानवी जीवन टिकण्याचे आणि विकसित होण्याचे प्रमुख आधार आहेत. यातूनच या कोव्हिड संक्रमणाचा सामना करण्यासाठी संपूर्ण मानवजात सरसावली. डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल स्टाफ, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी यांच्याबरोबर आवश्यक तेथे मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊ लागल्या. विद्यार्थ्यांना भोजन, गरजू नागरिकांना, कष्टकरी लोकांना व प्रवासी कामगारांना भाजी, अन्नधान्य, औषधे यांचे वाटप एक ना अनेक कामे करण्यासाठी असंख्य जण योगदान देऊ लागले. 

क्रीडाभारतीचे लोकजागरणासाठी प्रशिक्षण वर्ग


sports, exercise and Coronavirus | या काळात क्रीडाभारतीनेसुद्धा सेवाकार्यात आपला वाटा संपूर्ण देशात उचलला. असंख्य कार्यकर्त्यांनी सहकुटुंब झोकून देऊन सहभाग दिला. पोलिस, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचाऱ्यांना रोज सकाळी चहा-नाश्ता पुरवणे, अन्य संस्थांच्या बरोबरीने धान्य, औषधे, भोजन यांचे वाटप, मास्क आणि शील्ड यांचे वितरण, प्रवासी कामगार गावी परतत असताना त्यांची व्यवस्था, रक्तदान, कोव्हिड केअर सेंटरमध्ये राहून प्रत्यक्ष सेवा अशा आवश्यक त्या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी भरपूर योगदान दिले. विश्व योग दिवस प्रकटपणे करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर, समाजातील सकारात्मकता टिकून राहावी यासाठी क्रीडाभारतीने सर्वांना करता येतील अशा सोप्या आसनांचा मार्गदर्शक व्हिडीओ बनवून तो घराघरांत पोचवला. कल्पनेपेक्षाही कितीतरी अधिक प्रतिसाद या उपक्रमाला समाजातून मिळाला. राष्ट्रीय क्रीडादिनीही स्व. ध्यानचंदजी यांचा जीवनसंदेश महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पोचवण्याचा मोठा उपक्रम सर्व क्रीडाशिक्षकांच्या मदतीने केला. करोनाची पहिली लाट ओसरत असतानाच कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह यावा आणि त्यांच्यामार्फत सर्व समाजात चैतन्य यावे, म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अनेक ठिकाणी लोकजागरणासाठी प्रशिक्षण वर्ग घेतले. 

प्रवासाचा, लोकसंपर्काचा पूर्वीचा आत्मविश्वास परत प्राप्त व्हावा म्हणून हे वर्ग आपापल्या घरापासून, गावापासून दूर असे आयोजित केले. त्या त्या ठिकाणचे खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व क्रीडाभारतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. वीरमाता जिजाऊ पुरस्कार कार्यक्रम अनेक जिल्ह्यांत (सर्व नियमांचे पालन करून) उत्साहात पार पडले. ठिकठिकाणी क्रीडांगणे, मैदाने उत्साहात पुन्हा सुरू झाली. सर्व नागरिकांनी लस घ्यावी, याच्या जागृतीसाठी करण्यासाठी क्रीडाभारतीने मोठी मोहीम सुरू केली, पण …. 

पण दुर्दैवाने हा करोना (Coronavirus) विषाणू दुसऱ्या लाटेच्या रूपात पुन्हा एकदा समोर आला. तोही पहिल्यापेक्षा अधिक वेगात आणि अधिक मारकता घेऊन. पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये आपण बंदिस्त झालो, रुग्णालये भरून गेली, बेड कमी पडू लागले, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा मोठाच तुटवडा निर्माण झाला.  आजूबाजूचे अनेक परिचित, आपले मित्र, नातेवाईक, कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय यांच्यावरही करोनाची काळी छाया पसरली. कित्येक आप्तस्वकीय, मित्र आपल्यापासून कायमचे दूर गेले. जीवनातील सर्वांत आशादायक शब्द “पॉझिटिव्ह”… पण याच शब्दाची सर्वांना अक्षरशः भीती वाटू लागली. 

करोना (Coronavirus) निर्मूलनासाठी सरकार, वैज्ञानिक, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यांना मोठे यशसुद्धा येत आहे. तरीसुद्धा सरकारी आणि वैद्यकीय नोकरशाही (ब्युरोक्रसी)मध्ये आणि वैद्यकीय व्यवसायाच्या अर्थकारणात काही साध्यासोप्या आणि नैसर्गिक गोष्टी भरडल्या गेल्या का, असा एक मोठा प्रश्न आहे. कुठल्याही रोगाचा, विषाणूचा किंवा साथीचा सामना करण्यासाठी दोन अत्यंत मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे प्रत्येक व्यक्तीची स्वतःची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी) आणि दुसरे म्हणजे मानवी मनाची स्वाभाविक उभारी. ज्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती उत्तम, तो कुठल्याही आजाराला सहज परास्त करू शकतो, तसेच कोणत्याही आजाराची सुरुवात ही प्रथम मनात होते, असे म्हंटले जाते. त्याच न्यायाने कोणत्याही आजारातून बरे होण्याचा मार्गही मनातूनच सुरू होतो. दुर्दम्य संकल्पशक्तीच्या जोरावर अनेक दुर्धर रोगांवर मात केल्याची उदहरणे आपल्या आजूबाजूलाही आपल्याला अगदी सहज दिसतात. 

sports exercise and Coronavirus


sports, exercise and Coronavirus | इम्युनिटी बूस्टर, विविध जीवनसत्त्वे (Vitamins), काढे, निरनिराळ्या पथींच्या गोळ्या यांची उपयोगिता स्वीकारूनसुद्धा या सगळ्यांच्या मायाजालात माणसाची नैसर्गिक इम्युनिटी कुठेतरी हरवून गेली का? मनाची ती अद्भुत उभारी चोवीस तास घरात कोंडून बसल्याने आपण गमावून बसलो का? याची उत्तरे शोधायलाच हवीत. ज्या डी (D) जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्याने इम्युनिटी वाढते असे वैद्यकशास्त्र सांगते, तेच डी (D) जीवनसत्त्व सकाळी अर्धाएक तास फक्त सूर्यप्रकाशात नुसते बसल्याने प्राप्त होते हे आपण विसरून जाणार का? या गोष्टींचा विचार करीत असताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे या सगळ्याचे सोपे उत्तर ‘आनंदासाठी खेळ’ या क्रीडाभारतीच्या मूलमंत्रामध्ये आहे. सकाळच्या सूर्यप्रकाशात शुद्ध हवेत मोकळ्या मैदानावर वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, योगासने, सूर्यनमस्कार, छोटे छोटे खेळ (sports, games) हे सर्व कोरोना नियमांचे पालन करूनसुद्धा सहज शक्य आहे. खेळ, व्यायाम (exercise), मोकळी हवा, नैसर्गिक वातावरण या सगळ्यामुळे शरीर आणि मन हे दोन्हीही पूर्ण स्वस्थ होणार आहे. अगदी कुठल्याही औषधापेक्षा जास्त. आणि आतून निर्माण झालेली ही इम्युनिटी बाकी कुठल्याही उपायांपेक्षा कितीतरी अधिक प्रभावी ठरणार आहे हे नक्की. 

sports exercise and Coronavirus

याच विषयाला धरून सरकारने क्रीडांगणे, मैदाने, जॉगिंग ट्रॅक, बागा या सर्व नागरिकांना रोज उपलब्ध करून द्याव्यात, व्यायाम करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना लॉकडाउनमधून सूट द्यावी, किंबहुना असे व्यायाम (exercise) आणि खेळ (sports) यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करणारे एक निवेदन क्रीडाभारतीने मुख्यमंत्री महोदयांना दिले होते. हे निवेदन अनेक प्रमुख वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध झाले होते. हाच विषय पुढे नेण्यासाठी क्रीडाभारतीने ऑनलाइन वेबिनार आयोजित केला. या सेमिनारमध्ये डॉ. अनिल करवंदे (नागपूर), डॉ. संजय करवडे (पुणे), प्रा. अशोक काळे (सांगली) आणि डॉ. मकरंद जोशी (संभाजीनगर) यांनी विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करताना सरकारकडे, मैदाने व जॉगिंग ट्रॅक हे सर्व नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी केली. क्रीडाभारतीचे महामंत्री  राज चौधरी यांनी सेमिनारचा समारोप करताना परत एकदा मोकळ्या मैदानातील खेळ आणि व्यायाम यांचा मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित करीत मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक नागरिकांसाठी उपलब्ध होणे हे करोनाविरुद्धच्या लढाईत प्रभावी शस्त्र ठरू शकते आणि सरकारने याबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले. 

शुद्ध विचाराने आणि चांगल्या मार्गाने केलेल्या कामाचा योग्य परिणाम दिसतोच, या आपल्या अनुभवाचा पुन्हा एकदा प्रत्यय येताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र सरकारने अतिशय सकारात्मक विचार करीत ( कोव्हिड नियमांचे पालन करून) मोकळी मैदाने, बागा, जॉगिंग ट्रॅक येथे व्यायाम, आसने, सायकलिंग यांना मान्यता दिल्याचे समजते. या अतिशय आवश्यक आणि उत्तम निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे संपूर्ण क्रीडाविश्वातर्फे मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर सर्वच प्रकारचे व्यायाम आणि खेळ याबद्दल असाच सकारत्मक निर्णय लवकर घ्यावा, अशी पुन्हा एकदा विनंती. 

आनंदासाठी खेळ


sports, exercise and Coronavirus | करोना विरुद्धची ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जगातील कित्येक प्रगत देशांच्या तुलनेत आपण किती तरी अधिक यशस्वीपणे या संकटाचा सामना करीत आहोत. दुसऱ्या लाटेचा परिणाम हळूहळू ओसरताना दिसत आहे. सार्वत्रिक लसीकरण वेग पकडत आहे. आता खेळाडू, मार्गदर्शक आणि क्रीडा क्षेत्रातील सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांना समाजाप्रति आपले दायित्व पुन्हा एकदा निर्धाराने पार पाडायचे आहे. मनावर आलेली मरगळ झटकून आपण सगळे पुन्हा एकदा बाहेर पडू, अधिकाधिक नागरिक मैदानावर येतील, “आनंदासाठी खेळ” या संकल्पनेचा स्वीकार करतील, यासाठी एकदिलाने प्रयत्न करू. यातून मिळणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती, आत्मविश्वास आणि त्याला लसीकरणाची जोड यामुळे लवकरच आपण सर्व या करोना संकटावर यशस्वी आणि कायमची मात करणार हे निश्चित. 

(लेखक हे क्रीडा-भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष व अखिल भारतीय नियामक मंडळाचे सदस्य आहेत) 

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”61,106″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!