Other sports

या स्टार खेळाडूंना कोरोनाची बाधा

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यातून आता क्रीडाविश्वही सुटलेले नाही. जगभरातील अनेक स्टार खेळाडू करोनाच्या विळख्यात सापडले असून, अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. करोनाची (coronavirus sports) बाधा झालेले कोण आहेत हे खेळाडू?

नोव्हाक जोकोविच

जगातला अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि त्याची पत्नी येलेनाला कोरोनाची बाधा झाली आहे. जोकोविचने नुकतीच एशिया टूर स्पर्धा खेळली होती. ही स्पर्धा सर्बिया आणि क्रोएशियामध्ये आयोजित करण्याची जबाबदारीही जोकोविचनेच घेतली होती. १७ वेळा ग्रँड स्लॅमचे विजेतेपद मिळविणारा जोकोविच या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण होतं. या स्पर्धेचा पहिला टप्पा बेलग्रेडमध्ये, तर दुसरा टप्पा क्रोएशियातील जडरमध्ये झाला. coronavirus sports |

जोकोविचच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे, की “जोकोविच कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे. ब्रेलग्रेडमध्ये पोहोचल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाची चाचणी घेण्यात आली होती. त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेल्या पथकातील लोकांचीही चाचणी घेण्यात आली, जे त्याच्यासोबत जडरमध्ये आले होते. कोणालाही कोविडची लक्षणे जाणवत नव्हती.” जोकोविचपूर्वी याच स्पर्धेत खेळणारे व्हिक्टर ट्रोइस्की, ग्रिगोर दिमित्रोव आणि बोर्ना कोरिक यांचीही चाचणी घेतली असता ते पॉझिटिव्ह आढळले. जोकोविचने करोना झाल्याचे मान्य केले आहे. coronavirus sports

मुले निगेटिव्ह

जोकोविच आणि त्याची पत्नी जरी पॉझिटिव्ह आढळले असले तरी त्याची मुले मात्र निगेटिव्ह आढळली आहेत. या एकूणच प्रकरणानंतर ब्रिटनचा डेन इव्हान्सने जोकोविचवर टीका केली आहे. तो म्हणाला, “ग्रिगोर दिमित्रोव आणि बोर्ना कोरिक कोविड-19 चाचणी अहवालात पॉझिटिव्ह आढळले असताना जोकोविचला जबाबदारीची जाणीव व्हायला हवी होती.” जोकोविच म्हणाला, “आम्ही गेल्या महिन्यात जे काही केले ते अगदी मनापासून केले. त्यामागची माझी भावना चांगली होती. आमच्या स्पर्धेचा उद्देश एकता आणि सगळ्यांसोबत उभे राहण्याचा होता. दक्षिण युरोपमधील लोकप्रिय आणि तरुण टेनिसपटूंना स्पर्धात्मक टेनिस खेळण्याची संधी देणे हा या टूरचा मुख्य उद्देश होता.”

माफी मागितली

कोविड-19 अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या जोकोविचने माफी मागितली आहे. तो म्हणाला, “करोना महामारीची तीव्रता कमी झाल्यानेच आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती. दर्दैवाने कोरोना अजूनही आहे आणि हे सत्य आम्हाला उमगलं आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांना कोरोना झाला असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागतो.”

नेमबाजी

समरेश जंग

भारताचा आघाडीचा नेमबाज समरेश जंग कुटुंबातील पाच जणांसह कोविड-19 अहवालात पॉझिटिव्ह coronavirus sports | आढळला होता. त्याचं घरच जणू मिनी हॉस्पिटल झालं होतं. त्याला पिस्तूल आणि नेमबाजीची सगळीच उपकरणं एका कोपऱ्यात ठेवावी लागली होती आणि या उपकरणांच्या जागेवर पॅरासिटॅमॉल, ऑक्सिजन मॉनिटरिंग मशीन आणि कॉन्सनट्रेटर (श्वासाशी संबंधित आजारांच्या रुग्णांना ऑक्सिजन देणारी मशीन) या उपकरणांनी घेतली. आता समरेश कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आपला अनुभव लोकांसमोर आणत त्याने जागरूकता करण्याचा निर्णय घेतला आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि दृढनिश्चयाने त्याने कोरोनावर मात केली होती. आपल्या या लढावू वृत्तीमुळेच त्याला ‘गोल्फफिंगर’ म्हणून ओळखले जाते.

‘‘मी त्याच गोष्टी लोकांना सांगत आहे, ज्या इतरांनी करू नये,’’ असे समरेश सांगतो. समरेशचं मोठंधाटं घर आहे. घरात अनेक खोल्या आहेत, अनेक टॉयलेट आहेत. त्यामुळे त्याला कोरोनावर मात करणे सोपे झाले. तो आपल्या कुटुंबातील पाच जणांसह कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
‘‘जे कोविड-19 मध्ये पॉझिटिव्ह आढळे आहेत, त्यांनी घाबरून जाऊ नये. मात्र, या आजाराला दुर्लक्षितही करू नये. हा विचारच करू नये, की मला संसर्ग होऊ शकणार नाही. तुम्हाला नेहमी सावध राहावं लागेल,’’ असे जंग सांगतो. आता राष्ट्रीय राष्ट्रीय पिस्तूल संघाचा प्रशिक्षक असलेला जंग म्हणतो, “जेव्हा मला ५ जून २०२० रोजी कोरोना झाल्याचे समजले तेव्हा माझं लक्ष्य हेच होतं, की स्वत:ला नकारात्मक विचारांपासून दूर राहणे. म्हणून मी सर्वच व्हॉट्सअॅप संदेश, टीव्हीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. ते तसे कठीणच होते, पण मी सकारात्मक राहिलो.’’ त्याच्या कुटुंबातील चौघांनी घरातच स्वत:ला वेगळे केले, तर दोन जणांना विशेष कोविड रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आमच्याकडे काही खोल्या आणि टॉयलेट आहेत, जे आम्हाला स्वतंत्रपणे वापरता आले.’’

फुटबॉल

‘वॉस्को दि गामा’चे १६ खेळाडू कोरोना पॉजिटिव्ह

ब्राझीलमधील ‘वॉस्को दि गामा’ या फुटबॉल क्लबमधील १६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. coronavirus sports | क्लबने १ जून २०२० रोजी ही माहिती दिली. एकूण २५० जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात हे १६ खेळाडू पॉझिटिव्ह आढळले. यापैकी तीन खेळाडू कोरोनामुक्त झाले आहेत, तर इतरांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

यूक्रेन फुटबॉल संघातील २५ जण पॉझिटिव्ह

यूक्रेनच्या एका फुटबॉल संघातील खेळाडू आणि स्टाफमधील २५ जण ३ जून २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यूक्रेन फुटबॉल संघाने सांगितले, की कारपाटी एलविव संघातील ६५ जणांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, कोणत्या खेळाडूंना कोरोना झाला हे स्पष्ट करण्यात आले नाही. मेच्या अखेरच्या आठवड्यातच यूक्रेन लीग घेण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र, कोरोना रुग्ण आढळल्याने या संघाचा पहिला सामना रद्द करण्यात आला होता. लीगचे आणखी दोन सामनेही स्थगित करण्यात आले. कारपाटी संघाचा इगोर नाजारिना याने युक्रेन ‘फुटबॉल’ टीव्ही चॅनलला सांगितले, की मला नाही वाटत, क्लबमधील कोणाला कोविड १९ चे लक्षण असेल. मात्र, अन्य खेळाडूंना लागण झाल्याने ही लीगच रद्द करण्यात आली.

भारताच्या माजी फुटबॉलपटूचा कोरोनामुळे मृत्यू

संतोष ट्रॉफी खेळलेले माजी फुटबॉलपटू ई. हमसाकोया यांचा ६ जून रोजी एका हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. केरळमधील पाराप्पानांगडीचे रहिवासी असलेले हमसाकोया ६१ वर्षांचे होते. ते मूळचे केरळचे असले तरी संतोष ट्रॉफी स्पर्धा महाराष्ट्राकडून खेळले होते. मोहन बागान आणि मोहम्मेडन स्पोर्ट्स क्लबतर्फेही ते खेळले होते. नेहरू ट्रॉफी स्पर्धेसाठी त्यांनी भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. मुंबईत वाढत्या कोरोना संसर्गामुळे त्यांचे कुटुंब २१ मे रोजी आपल्या घरी केरळमध्ये परतले होते. तेव्हापासून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

स्टोकचा मॅनेजर ओ नील

इंग्लंड फुटबॉल क्लबचा खेळाडू स्टोक याचा मॅनेजर मायकेल ओ नील कोविड-19 अहवालात पॉझिटिव्ह आढळला आहे. दुसऱ्या डिव्हिजनच्या क्लबने सांगितले, की ५० वर्षीय ओ नील गेल्या पाच दौऱ्यांतील अहवालात निगेटिव्ह आले होते. मात्र ८ जून २०२० रोजी घेतलेल्या चाचणी अहवालात ते पॉझिटिव्ह आढळले.

अल्बानियाचा फुटबॉलपटू पॉझिटिव्ह

अल्बानियाचा एका फुटबॉलपटूला कोरोनाचा संसर्ग झाला. केएफ बायलिस क्लबचा हा खेळाडू असून, त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

क्रिकेट

पाकच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

पाकिस्तानचे माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू रियाज शेख यांचा २ जून २०२० रोजी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. ते ५१ वर्षांचे होते. शेख यांच्या परिवाराने त्यांचा परस्पर दफनविधी केला आणि त्यांची तपासणी करण्यापर्यंतही कुटुंबाने वाट पाहिली नाही. रियाज शेख यांनी ४३ प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यांत ११६ गडी बाद केले आहेत. त्यांच्या कुटुंबाने घाईघाईत त्यांचा दफनविधी केला. मात्र, त्यांच्या शेजाऱ्यांना संशय आहे, की त्यांना कोरोनाचा संसर्ग होता. त्यामुळे पुढच्या सरकारी प्रक्रियांमध्ये अडकू नये म्हणून त्यांच्या कुटुंबाने घाईघाईत दफनविधी केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये जफर सरफराज (वय ५०) यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता.

तौफिक उमर कोरोनामुक्त

पाकिस्तानचा माजी सलामी फलंदाज तौफिक उमर कोरोनामुक्त झाला. त्याने लोकांना आवाहन केले, की या आजाराला गांभीर्याने घ्यावे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. उमरने ५ जून २०२० रोजी सांगितले, की मी आता पूर्ण स्वस्थ झालो असून माझा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. ३८ वर्षीय उमरने पाकिस्तानकडून ४४ कसोटी आणि २२ वनडे सामने खेळले आहेत. ‘‘मी दोन आठवड्यांपासून एका खोलीत वेगळा राहत होतो. मुले, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींपासून लांब राहिलो. अहवालात ‘पॉझिटिव्ह’ आलो तरी घाबरण्याचे कारण नाही. मी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सल्ला देईन,’’ असे उमर म्हणाला.

शाहीद आफ्रिदी

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi ) १३ जून २०२० रोजी कोविड-19 अहवालात पॉझिटिव्ह आढळला. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला तो पहिलाच हाय प्रोफाइल क्रिकेटपटू आहे. आफ्रिदीनेच ट्विटरवर कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले. आफ्रिदी पाकिस्तानसाठी १९९८ ते २०१८ दरम्यान २७ कसोटी सामने, ३९८ वनडे आणि ९९ टी-२० सामने खेळला आहे.

माजी क्रिकेटपटू चेतन चौहान

Chetan Chauhan

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान (Chetan Chauhan) कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. चौहान यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती ११ जुलै २०२० रोजी रात्री उशिरा भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडा आणि आर. पी. सिंह यांनी ट्वीटवरून दिली. चोपडाने ट्वीट केले, की ‘‘चेतन चौहान कोविड-19 मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते लवकर बरे होवो ही प्रार्थना.’’ आर. पी. सिंह यानेही ट्विटवर लिहिले आहे, ‘‘आताच ऐकलं, की चेतन चौहान यांना कोरोना झाला आहे. त्यांनी लवकरात लवकर यावर मात करावी.’’

चौहान यांची शुक्रवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. ७२ वर्षीय या माजी क्रिकेटपटूला आता लखनौच्या संजय गांधी पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चौहान यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे. सध्या त्यांचं घर क्वारंटाइन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात चौहान यांच्याकडे सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी आणि नागरी सुरक्षा मंत्रालयाची जबाबदारी आहे. लोकसभेचे माजी सदस्य असलेले चौहान अशा काही माजी क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाले आहेत, ज्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि स्कॉटलंडचा माजिद हक यांनी कोरोनावर मात केली आहे. चौहान यांनी भारताकडून १९६९ ते १९७८ दरम्यान ४० कसोटी सामन्यांत २,०८४ धावा केल्या. या दरम्यान त्यांच्या फलंदाजीची सरासरी ३१.५७, तर कारकिर्दीत सर्वाधिक ९७ धावा केल्या आहेत. त्यांनी सात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत १५२ धावाही केल्या आहेत. चौहान आणि सुनील गावस्कर ही यशस्वी सलामी जोडी ठरली होती. दोघांनी १९७० च्या दशकात दहा वेळा शतकी भागीदारी रचली, तसेच कारकिर्दीत दोघांनी तीन हजारपेक्षा अधिक धावांची भागीदारी रचली आहे. चौहान स्थानिक क्रिकेट स्पर्धेतही दिल्ली आणि महाराष्ट्राकडून खेळले आहेत.

बॉक्सिंग

मुष्टियोद्धा मिकेला मेयर

अमेरिकेचा लाइटवेट मुष्टियोद्धा मिकेला मेयर हिला कोरोनाचा संसर्ग झाला. चाचणी अहवालात ती पॉझिटिव्ह आढळली. coronavirus sports | हा अहवाल आला त्याच्या दोनच दिवसांनी एमजीएफ ग्रँड गार्डन एरेना स्पर्धेत तिला हेलेन जोसेफशी लढायचे होते. कोरोना महामारीच्या संकटकाळातील लास व्हेगासमध्ये होणारी ही पहिलीच लढत होती. मेयरने ७ जून २०२० रोजी सोशल मीडियावर संसर्ग झाल्याचे सांगितले. मेयर अमेरिकेची माजी ऑलिम्पिक मुष्टियोद्धा आहे. तिने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत १२ लढती खेळल्या आहेत. या सर्व लढती तिने जिंकल्या आहेत. यातील पाच लढती नॉकआउट करीत जिंकल्या आहेत. मुष्टियोद्धात पुनरागमन करण्यास मी उत्सुक होते. पण कोरोनामुळे मी निराश झाले आहे, असे मेयर म्हणाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!