Cricket

इंग्लंडचा ‘अनामिक हिरो’

क्रिकेटमध्ये काही खेळाडू पटकन लक्षात येत नाहीत. मात्र, सांघिक कामगिरीत ते आपली भूमिका इमानेइतबारे पार पाडतात. अशा खेळाडूंमुळेच संघाची ताकद वाढते. इंग्लंड क्रिकेट संघातही असाच एक खेळाडू आहे, तो म्हणजे वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स Chris Woakes cricket | म्हणूनच इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेक स्टीवर्ट Alec Stewart | यांनी ख्रिस वोक्सला Chris Woakes cricket | अनामिक हिरोची उपमा दिली आहे.

वोक्सची कामगिरी


वोक्स आपली कामगिरी चुपचाप करतो. मात्र, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चरसारखे गोलंदाज नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात. वोक्सने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. त्यामुळे पाहुण्या विंडीज संघाला दुसऱ्या डावात 129 धावांतच गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडचा संघ या कसोटी मालिकेत 2-1 ने विजय मिळवत विज्डन करंडक आपल्या नावावर केला आहे.

स्टीवर्ट म्हणाला, की सातत्याने चांगली कामगिरी करूनही वोक्सचं Chris Woakes cricket | म्हणावं तसं कौतुक झालं नाही. याउलट इतर गोलंदाजांवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव झाला. या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत 35 कसोटी सामन्यांत 106 गडी बाद केले आहेत.

स्टीवर्टने स्काय स्पोर्ट्सला सांगितले, की ‘‘तो इंग्लंड संघाचा अनामिक हिरोसारखा आहे. कारण आपण नेहमीच ब्रॉड आणि अँडरसनबाबत बोलतो. कधी आर्चर आणि वूड यांच्या वेगावर चर्चा करतो. मात्र, वोक्स Chris Woakes cricket | त्याचं काम गुपचूप करीत असतो.’’


alec-stewart

‘‘मला आनंद आहे, की त्याने पाच गडी बाद केले. कारण अनेकदा त्याच्या कामगिरीला इतर खेळाडूंच्या तुलनेत महत्त्व दिले गेले नाही.’’
-Alec Stewart


स्टीवर्ट म्हणाला, 31 वर्षीय अष्टपैलू वोक्सने Chris Woakes cricket | इंग्लंडने उत्तम कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध निर्णायक कसोटी सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात त्याची निवड होणे हेच वोक्सच्या उत्तम कामगिरीचं लक्षण आहे.

वोक्सचं स्थान भक्कम


स्टीवर्टने इंग्लंडसाठी 1989 ते 2003 दरम्यान 133 कसोटी सामने आणि 170 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यष्टिरक्षक आणि उत्तम फलंदाज असलेले स्टीवर्ट यांना वाटते, की युवा खेळाडू सॅम कुरेनला कसोटी संघात वोक्सची जागा घेणे सोपे नाही.

स्टीवर्ट म्हणाले, ‘‘सॅम कुरेनने एक कसोटी सामना खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. तो ख्रिस वोक्सची जागा घेण्याची त्याची मनीषा आहे. मात्र, आता अब वोक्सची अशी उत्तम कामगिरी असेल, तर सॅम कुरेनला संघात स्थान मिळणे अवघडच आहे.’’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!