All SportsIPL

chennai vs delhi match preview ipl 2020

 

chennai vs delhi match preview ipl 2020 | चेन्नई की दिल्ली?


दुबई | चेन्नई सुपर किंग्सचा शुक्रवारी आयपीएलमधील तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. पंजाबला हरवल्याने दिल्ली कॅपिटल्सचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंकाच नाही. प्रश्न आता चेन्नईचा आहे. chennai vs delhi match preview ipl 2020 |

कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीचा क्रम बदलण्याबाबत ते नक्कीच विचार करतील. फलंदाजीस सहाय्यभूत ठरणाऱ्या शारजाहच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईला दणदणीत पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यांच्या फिरकी गोलंदाजांचीही मात्रा चालली नाही. कारण चेन्नईचं विसावं षटक फारच महागात पडलं होतं.

[jnews_hero_skew include_category=”87″]

chennai vs delhi match preview ipl 2020 |

राजस्थानविरुद्धच्या पराभवाचं खापर या विसाव्या षटकावर फोडलं जाऊ शकतं. पण तेवढंच कारण पुरेसं नाही. चेन्नईच्या फलंदाजांनी निराशा केली हेही दुर्लक्षून चालणार नाही. मुरली विजय, केदार जाधव आणि दस्तूरखुद्द कर्णधार धोनी हे स्वतःची जबाबदारी झटकू शकणार नाही.

धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरला. सगळ्या योजना यशस्वी ठरतात असं नाही. या वेळी धोनीची योजना अयशस्वी ठरली.

त्याने सॅम कुरेन, केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड़ यांना फलंदाजीला पाठवले. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. हुकमी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर सगळी मदार फाफ डु प्लेसिसवर येऊन पडली.

कमी चेंडूंत जास्त धावा करण्याचा दबाव वाढत गेला. दुसऱ्या बाजूने धोनीची फलंदाजी फारशी छाप पाडणारी नव्हती. राजस्थानविरुद्ध खेळताना वेगवान गोलंदाजांसमोर धोनी चाचपडला.

जेव्हा मध्यमगती गोलंदाज टॉम कुरेनचा मारा सुरू झाला तेव्हा धोनी आक्रमक अंदाजात दिसला. त्या आक्रमणाला फारसं महत्त्व देता येणार नाही. कारण त्या वेळी सामना संपलेला होता. chennai vs delhi match preview ipl 2020 |

दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध विजय मिळविला असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. अर्थात, पंजाबविरुद्धची लढत त्यांनी जवळजवळ गमावलेली होती. पंजाबच्याच चुकीमुळे हा विजय दिल्लीला मिळाला असं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही.

जमेची बाजू हीच आहे, की जेव्हा सामना सुपरओव्हरमध्ये गेला तेव्हा दिल्लीने उत्तम खेळ केला यात शंका नाही. मात्र, चेन्नईविरुद्ध दिल्ली एक चिंता वाढविणारी आहे, ती म्हणजे अश्विनच्या खांद्याला झालेली दुखापत.

अश्विनची खेळण्याची शक्यता धूसरच आहे. त्यामुळे दिल्लीला गोलंदाजीत काहीसे फेरबदल करावे लागण्याची शक्यता आहे. chennai vs delhi match preview ipl 2020 |

जर अश्विन खेळणार नसेल तर सीनिअर फिरकी गोलंदाज अमित मिश्राला खेळविले जाईल. तो अक्षर पटेलसोबत फिरकीची धुरा वाहील. हा एक पर्याय आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

मोहितने सुरुवातीला लोकेश राहुलला बाद केले होते. मात्र, त्यानंतर त्याची गोलंदाजी ढिली पडली. दिल्लीसाठी हे चिंतेचे कारण ठरू शकते. मात्र कॅगिसो रबाडाने अखेरच्या टप्प्यात टिच्चून मारा केला. chennai vs delhi match preview ipl 2020 |

चेन्नई सुपर किंग्ससारखा संघ अखेरच्या दहा षटकांत आक्रमण तीव्र करतात. अशा परिस्थितीत दिल्ली हर्षल पटेलचा मारा आजमावू शकेल. हर्षल फलंदाजीतही उत्तम आहे. त्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सलामीला फलंदाजी केली आहे.

एनरिच नोर्ट्जेची कामगिरी फारशी वाईट नाही, पण डावखुरा डॅनियल सॅम्सही कठीण परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो. शिमरोन हेटमायरला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. chennai vs delhi match preview ipl 2020 |

दिल्लीच्या संघात पृथ्वी साव, शिखर धवन, ऋषभ पंत, कर्णधार श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टोइनिस हे पाच बिग हिटर आहेत.

chennai vs delhi match preview ipl 2020

chennai vs delhi match preview ipl 2020

आजचा (25 सप्टेंबर. 2020) सामना | चेन्नई वि. दिल्ली | सायं. 7.30
Chennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्स Delhi capitals logoदिल्ली कॅपिटल्स
महेंद्रसिंह धोनी
(कर्णधार)
श्रेयस अय्यर
(कर्णधार)
मुरली विजय पृथ्वी साव
अंबाती रायुडू शिमरोन हेटमायर
फाफ डु प्लेसी कॅगिसो रबाडा
शेन वॉटसन अजिंक्य रहाणे
केदार जाधव शिखर धवन
ड्वेन ब्रावो रविचंद्रन अश्विन
रवींद्र जडेजा अमित मिश्रा
लुंगी एंगिडी ऋषभ पंत
(यष्टिरक्षक)
दीपक चहर इशांत शर्मा
पीयूष चावला अक्षर पटेल
इम्रान ताहिर संदीप लामिचाने
मिशेल सेंटनेर किमो पॉल
जोश हेजलवूड डॅनियल सॅम्स
शार्दूल ठाकूर मोहित शर्मा
सॅम कुरेन एनरिच नोर्जे
एन. जगदीशन एलेक्स कॅरी
(यष्टिरक्षक)
के. एम. आसिफ आवेश खान
मोनू कुमार तुषार देशपांडे
आर साई किशोर हर्षल पटेल
ऋतुराज गायकवाड मार्कस स्टोइनिस
कर्ण शर्मा ललित यादव

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!