Tennis

Tennis star Ashleigh Barty Will Skip U.S. Open

स्टार टेनिसपटू अॅश्ले बार्टीची अमेरिकन ओपनमधून माघार


रोना महामारीमुळे विंडीजच्या तीन खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यानंतर आता टेनिसमध्येही ऑस्ट्रेलियाच्या स्टार महिला खेळाडूने अमेरिकन ओपन US Open | नकार दिला आहे. ही खेळाडू आहे जगातील अव्वल टेनिस Tennis | स्टार अॅश्ले बार्टी. Ashleigh Barty Tennis |

जोखमीचा प्रवास नको

जगातील अव्वल महिला टेनिसपटू अॅश्ले बार्टी Ashleigh Barty Tennis | हिने प्रतिष्ठेच्या अमेरिकी ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. करोना महामारीमुळे अमेरिकन ओपनसाठी प्रवास करणे प्रचंड जोखमीचे आहे. त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा…
विम्बल्डन रद्द झाल्याने या तीन खेळाडूंच्या मनसुब्यांवर पाणी

माघार घेणारी पहिली हायप्रोफाइल टेनिसपटू


ऑस्ट्रेलियाची चोवीस वर्षीय अश्ले बार्टी Ashleigh Barty Tennis | हिने हा निर्णय घेतल्याने टेनिस चाहत्यांना धक्का बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान अमेरिकन ओपन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून माघार घेणारी अश्ले बार्टी Ashleigh Barty Tennis | ही जगातील सर्वांत हायप्रोफाइल खेळाडू ठरली आहे.

यंदा कुठेही प्रवास करणार नाही


बार्टीने ३० जुलै २०२० रोजी ई-मेलद्वारे सांगितले, की ‘‘माझा संघ आणि मी स्वत: हा निर्णय घेतला आहे. आम्ही वेस्टर्न एंड सदर्न ओपन आणि अमेरिकी ओपनसाठी या वर्षी कोणताही प्रवास करणार नाही.’’

संकटकाळात धोका नको


ती म्हणाली, ‘‘मला या दोन्ही स्पर्धा खेळायला आवडते. त्यामुळेच हा निर्णय घेताना थोडेसे जडच गेले. मात्र, कोविड-19 मुळे Covid 19 | अद्याप प्रचंड जोखीम आहे. माझी टीम आणि मी स्वत: या संकटकाळात स्वत:ला झोकून देऊ शकत नाही.’’

फ्रेंच स्पर्धेबाबत निर्णय नाही


बार्टीने अद्याप फ्रेंच ओपनबाबतही निर्णय घेतलेला नाही. गेल्या वर्षी तिने ही स्पर्धा जिंकली होती. आता ती या किताबाचे संरक्षण करेल किंवा नाही, यावर तिने कोणतेही भाष्य केलेले नाही.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!