All SportsYoga for Women

What is Pranayama | प्राणायाम

प्राणायाम

manali dev

ज आपण श्वसनाचे प्रकार किंवा प्राणायाम Pranayama | याबद्दल थोडी माहिती करून घेऊया…

 

What is Pranayama?

प्राणायाम Pranayama | म्हणजे खरं तर जाणीवपूर्वक श्वासावर लक्ष केंद्रित करून श्वास घेणे, सोडणे. योगिक भाषेत श्वास व प्रश्वास यांच्या गतीचा विच्छेद करणे म्हणजे प्राणायाम. अष्टांग योगातील चौथी पायरी म्हणजे प्राणायाम.

जी व्यक्ती रोज शास्त्रशुद्ध पद्धतीने प्राणायामचा Pranayama | अभ्यास करते त्यांना शारीरिक, मानसिकदृष्ट्या खूपच लाभ मिळतात. दररोजच्या धावपळीच्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी व स्वतःचे आरोग्य उत्तम करण्यासाठी काही प्रकारचे प्राणायाम किंवा श्वसनाचे प्रकार करणे खूप आवश्यक आहे.

शक्यतो दररोज पहाटे किंवा सकाळी प्राणायाम Pranayama | केल्याने खूप लाभ होतो. कारण हवा शुद्ध असते. मात्र सकाळी शक्यच नसेल तर दिवसभरात पोट रिकामे असताना प्राणायामचा अभ्यास करावा.

सध्याच्या कोविड-19 च्या परिस्थितीत बरेच जण मानसिकदृष्ट्या खचत आहेत. नकारात्मकता पसरत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. सहनशक्ती कमी होत आहे. मनमोकळेपणाने हसणे कमी होत आहे. चिडचिड वाढत आहे.

लहान मुले काय किंवा मोठी व्यक्ती, सर्वांच्या मनावर एक प्रकारची भीती, दडपण येत आहे. अॅग्रेसिव्ह होत आहेत. या सर्व व्याधी किंवा त्रासांपासून दूर राहायचे असेल तर प्राणायाम- योगाभ्यास खूपच आवश्यक आहे.

मागच्या भागात आपण हिवाळा व योगाभ्यास याबद्दल माहिती घेतली होती. आज आपण हिवाळ्यात कुठला प्राणायामचा Pranayama | अभ्यास करू शकतो हे बघूया.

खरं तर प्राणायामचे बरेच प्रकार आहेत. प्राणायाम करताना विविध मुद्राही केल्या जातात. मात्र, आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे खरंतर योग प्रशिक्षक/ शिक्षक यांच्याकडून घेऊनच मग सराव करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात खूप थंडीमुळे अंगातील उष्णता कमी होते. ती वाढविण्यासाठी पुन्हा शरीरात उष्णता निर्माण करणे आवश्यक आहे.

How to do Pranayama Breathing in Yoga?

How to do Pranayama Breathing in Yoga?

थंडीमुळे होणाऱ्या व्याधी प्राणायामाच्या अभ्यासाने कमी होतातच, पण त्याचबरोबर सूर्यनमस्कार, काही आसने करणेही आवश्यक आहे. जलद श्वसन, भस्त्रिका प्राणायाम कसे करतात ते आपण बघूया…

जलद श्वसन

कुठल्याही ध्यानस्थ स्थितीमध्ये किंवा खुर्चीवर बसावे.

एक नाकपुडी बोटाने बंद करून दुसऱ्या नाकपुडीने जलद श्वास घेऊन सोडावा. साधारण 10 ते 15 मिनिटे आवर्तने करावीत. एका बाजूने झाले की दुसरी बाजू.

जर कुणाला हृदयासंबंधी त्रास, घोळणा फुटण्याची वृत्ती, उच्च रक्तदाब असेल तर योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन घेऊन मगच सराव करावा.

भस्त्रिका प्राणायाम

जलद श्वसन व्यवस्थित जमू लागले, की याचा अभ्यास करावा. ताठ बसावे, हाताची ज्ञानमुद्रा असावी. दोन्ही नाकपुड्यांनी जलद श्वास घ्यावा व जलद श्वास सोडावा.

लोहाराच्या भात्याप्रमाणे श्वसन करताना हवा जोरात घेऊन जोरात सोडली जाते. साधारण दहा आवर्तने करावीत. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडावा.

सुरुवातीला फक्त पूरक-रेचकच करावे. त्याचा सराव झाला की दीर्घ श्वास घ्यावा. जेवढे शक्य आहे तेवढा श्वास रोखून धरावा व सावकाश सोडावा.

असे केल्याने दोन्ही नाकपुड्या व श्वसनमार्ग मोकऴा होतो. कफाचा त्रास जातो. अस्थमाचा त्रास कमी होतो. (मात्र, अस्थमा असलेल्यांनी जलद श्वसन/ भस्त्रिका मार्गदर्शनाखालीच करावे, अन्यथा त्रास होऊ शकतो.)

या प्राणायामच्या अभ्यासाने शरीरातील उष्णता वाढते व थंडीचा त्रास कमी होतो. नाडीशुद्धी होते. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. दम लागण्याचे प्रमाण कमी होते. मरगळ दूर होते.

काळजी

तीव्र अस्थमा, हृदयाचे त्रास, उच्च रक्तदाब वा कुठली शस्त्रक्रिया, ताप, उष्णतेचे विकार, तीव्र डोकेदुखी असणाऱ्यांनी प्राणायाम करू नये.

पुढच्या भागात प्राणायामचे उर्वरित भाग जाणून घेऊ…

[jnews_block_22 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1238″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!