भुवनेश्वर कुमारही आयपीएलबाहेर | Bhuvneshwar Kumar out of IPL with thigh muscle injury
Bhuvneshwar Kumar out of IPL with thigh muscle injury | भुवनेश्वर कुमारही आयपीएलबाहेर
Follow us
[jnews_footer_social social_icon=”rounded”]दुबई | जांघेतील मांसपेशी ताणल्याने thigh muscle injury | सनरायजर्स हैदराबादचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार Bhuvneshwar Kumar | इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळू शकणार नाही. ही दुखापत त्याला आणखी वेदनादायी ठरणार आहे. कारण भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचे त्याचे मनसुबेही धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध 2 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या सामन्यात 19 वे षटक टाकताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. Bhuvneshwar Kumar out of IPL with thigh muscle injury | या षटकातील पहिला चेंडू फेकल्यानंतर त्याच्या जांघेतील मांसपेशी ताणल्या गेल्या. त्यामुळे लंगडतच त्याला मैदान सोडावे लागले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘भुवनेश्वर कुमार जांघेतील मांसपेशी ताणल्याने आयपीएलमधून बाहेर पडला आहे. ही दुखापत ग्रेड एक किंवा दोनची असण्याची शक्यता आहे. असे असेल तर त्याला कमीत कमी सहा ते आठ आठवड्यापर्यंत क्रिकेटपासून लांब राहावे लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनही त्याला वंचित राहावे लागू शकते.’’
यंदाच्या आयपीएल मोसमात भुवनेश्वर कुमारची Bhuvaneshwar Kumar IPL | कामगिरी यथातथाच राहिली आहे. त्याने षटकामागे सातपेक्षा कमी धावा दिल्या आहेत. असे असले तरी एकूण चार सामन्यांत त्याला फक्त चार विकेट मिळवता आल्या.
भुवनेश्वरची Bhuvneshwar thigh muscle injury | दुखापत सनराइजर्ससाठी मोठा धक्का आहे. कारण भुवनेश्वर एकमेव अनुभवी गोलंदाज होता. डेथ ओव्हरमध्ये तोच एकमेव उत्तम व हुकमी गोलंदाज होता. आता तो आयपीएल खेळू शकणार नसल्याने सनरायजर्सला ही उणीव भासत राहील.
आयपीएल खेळू शकणार नसला तरी भुवनेश्वर तूर्तास संयुक्त अरब अमिरातीतच थांबण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल बीसीसीआयच्या BCCI | वैद्यकीय पथकासोबत तेथेच राहणार आहेत. भारताचा करारबद्ध खेळाडू असल्याने भुवनेश्वरची संपूर्ण जबाबदारी बीसीसीआयवर आहे.
Bhuvneshwar Kumar out of IPL with thigh muscle injury | गेल्या वर्षापासून भुवनेश्वरला दुखापतींचा सामना करावा लागत आहे. मांसपेशी ताणल्याने बऱ्याच कालावधीपासून तो संघाबाहेर राहिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येच त्याने क्रिकेटमध्ये वापसी केली होती.
तो वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यावरही जाऊ शकला नव्हता. वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
[jnews_block_23 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”87″]