MS Dhoni interesting story | महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती घेतल्यानंतर अनेकांना धक्का बसला. त्याच्या प्रेरणादायी क्रिकेट प्रवासातील न ऐकलेल्या गोष्टींवर टाकलेला प्रकाश…
गोलरक्षक ते यष्टिरक्षक
महेंद्रसिंह धोनीचं शालेय शिक्षण रांचीत झालं. रांची येथे जवाहर विद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने पहिल्यांदा बॅट हातात घेतली. ही गोष्ट आहे 1992 ची. त्या वेळी धोनी सहावीत होता. त्या वेळी तो फुटबॉल खेळायचा. त्या वेळी तो गोलरक्षक (गोलकीपर) असायचा. त्या वेळी शाळेला एका यष्टिरक्षकाची (विकेटकीपर) गरज होती. धोनीला गोलरक्षकाचाच अनुभव होता. मात्र, नंतर तो क्रिकेटचाही यष्टिरक्षक झाला.
शालेय शिक्षणानंतर धोनी जिल्हास्तरीय क्रिकेट क्लबकडून खेळू लागला. त्यानंतर तो सेंट्रल कोल फिल्ड लिमिटेड संघाकडूनही क्रिकेट खेळला.
तिकीट तपासनीस
धोनीने वयाच्या 18 व्या वर्षीच रणजी सामना खेळला होता. त्या वेळी तो बिहार रणजी संघाकडून तो खेळायचा. याच दरम्यान धोनीला नोकरी लागली. ती होती तिकीट तपासनिसाची. त्याची पहिली नियुक्ती होती पश्चिम बंगालच्या खडगपुरात. 2001 ते 2003 पर्यंत तो खड़गपुरच्या स्टेडियमवरही क्रिकेट खेळला. अर्थात, धोनीचं नोकरीत मन काही रमलं नाही. त्याच्या मनात वेगळंच सुरू होतं. नंतर धोनी रेल्वे संघाकडून खेळू लागला.
अशी झाली टीम इंडियात निवड
धोनीची निवड भारत अ संघाकडून झाली. ते वर्ष होतं 2003-04. ही निवड होती झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यासाठी. या दौऱ्यात धोनी संघाचा विकेट कीपर होता. या दौऱ्यात त्याची कामगिरी होती, सात झेल आणि 4 यष्टिचीत.
हेही वाचा…
जेव्हा कॅप्टन कूल धोनीला संताप येतो…
फलंदाजीतही छाप सोडली. त्याने सात सामन्यांत 362 धावा केल्या. धोनीची उल्लेखनीय कामगिरी पाहता भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने त्याला संघात घेण्याचा सल्ला दिला.
2004 मध्ये धोनीने पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळवले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याची कामगिरी बहरतच गेली. MS Dhoni interesting story |
वन-डे कर्णधारपदाची धुरा सप्टेंबर 2007 मध्ये
धोनी प्रथमच भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार झाल. त्यानंतर 2007 मध्ये त्याची वन-डे संघाच्या कर्णधारपदाचीही जबाबदारी मिळाली. वर्षभरानंतर 2008 मध्ये तो कसोटी संघाचाही कर्णधार झाला.
अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध
धोनीने भारतीय संघाकडून अखेरचा सामना आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळला आहे. उपांत्य फेरीचा हा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला गेला होता. या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
656 दिवस अव्वल स्थानी
- 2006 ते 2010 दरम्यान धोनी 656 दिवस आयसीसी एकदिवसीय खेळाडूंच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी राहिला आहे.
- 2008 आणि 2009 मध्ये आयसीसीचा वर्षातला सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटूचा बहुमान मिळवला आहे.
- 2006, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013 आणि 2014 मध्ये आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम वन-डे संघ आणि 2009, 2010, 2012 आणि2013 मध्ये आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघात धोनीचा समावेश राहिला आहे.
- 2011 मध्ये आयसीसीच्या स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आले आहे.
[table id=18 /] [table id=19 /] [jnews_block_24 first_title=”Read also” header_text_color=”#ff0000″ header_line_color=”#ff0000″ post_offset=”2″ include_category=”65″]
7 Comments