CricketIPL

Raina will return in IPL? रैनाची आयपीएल कारकीर्दही संपुष्टात?

 

Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएलमधून अचानक माघार घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. असं म्हणतात, की सुरेश रैनाचा इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. Raina will return in IPL? |

तो पुन्हा आयपीएलमध्ये परतणार का, या प्रश्नाभोवती चर्चा केंद्रित झाल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीसारखी बाल्कनीची रूम न मिळाल्याने त्याने तडकाफडकी लीगमधूम माघार घेतली होती. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचे मालक श्रीनिवासन यांनीही कठोर शब्दांत रैनावर तोंडसुख घेतले होते.

Raina will return in IPLRaina will return in IPL? | अर्थात, माघारीचे कारण वैयक्तिक असल्याचे सुरेश रैनाने (Suresh Raina) सांगितले असले तरी चेन्नई सुपरकिंग्ससोबतचा (CSK) त्याचा दीर्घ प्रवास आता जवळजवळ संपल्यात जमा आहे.

कारण फ्रँचायजी 2021 च्या सत्रापूर्वीच सुरेश रैनाशी असलेला करार संपुष्टात आणू शकते. चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) टीम सध्ये दुबईत आहे. या संघातील 13 जणांना करोनाची बाधा झाली आहे. यात वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड़ यांचाही समावेश आहे.

आयपीएलच्या IPL | सूत्रांनुसार सुरेश रैनाने (Suresh Raina) अचानक घेतलेल्या माघारीमुळे त्याचा आयपीएलमधील प्रवासही जवळपास संपुष्टातच आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही नुकतीच निवृत्ती घेतली आहे. आता आयपीएलची कारकीर्दही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. Raina will return in IPL? |

माघारीमुळे संघव्यवस्थापनाची नाराजीही बत्तीस वर्षीय सुरेश रैनाने (Suresh Raina) ओढवून घेतली आहे. सीएसकेचे (CSK) मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासनही त्याच्यावर प्रचंड नाराज आहेत.

आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले, की ‘‘सीएसकेच्या (CSK) नियमानुसार प्रशिक्षक, कर्णधार आणि व्यवस्थापकाला कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यासाठी सूट्स मिळतात. मुद्दा इतकाच होता, की रैनाच्या रूमला बाल्कनी नव्हती.’’

Raina will return in IPL? | सूत्रांनी सांगितले, ‘‘हा केवळ एक मुद्दा होता. संघात करोनाची बाधा झाल्याचेही कारण या माघारीत असू शकते.’’

एकूणच परिस्थिती पाहता रैनाने एप्रिल 2021 पासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सीएसके संघातून रैनाची गच्छंती अटळ आहे.

रैनाचे पुनरागमन होऊ शकते?


Raina will return in IPL? | आता प्रश्न हा उपस्थित होत आहे, की रैनाची ही माघार केवळ 2021 च्या आयपीएलपुरतीच मर्यादित असू शकते का? कदाचित परिस्थिती बदलल्यानंतर रैनाची कदाचित वापसीही होऊ शकेल. मात्र, श्रीनिवासन यांच्या ट्वीटमुळे हे प्रश्न आता मागे पडले आहेत.

सूत्रांनी सांगितले, ‘‘रैनाची आयपीएलमध्ये वापसी होऊ शकणार नाही. सीएसकेने जे अधिकृत मत व्यक्त केले आहे, त्यातून हे स्पष्ट होत आहे, की रैनासाठी सीएसकेचे दरवाजे जवळजवळ बंद झाले आहेत. काही अशाही गोष्टी आहेत, ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजिबातच रुचलेल्या नाहीत.’’

Raina will return in IPL? | एक मात्र होऊ शकते. रैना सीएसकेमधून जरी बाहेर पडला तरी त्याला इतर संघांचे दरवाजे खुले असतील. अर्थात, त्याला पुन्हा आयपीएलच्या लिलावात सबभाग घ्यावा लागेल.

सीएसकेने ऋतुराज गायकवाडवर मोठी बोली लावली होती. करोनाची बाधा झाल्याने सीएसकेला धक्का बसला असला तरी त्यांना आशा आहे, की तो यातून लवकरच निगेटिव्ह येईल आणि सरावात सहभाग घेऊ शकेल.

सध्या तरी सीएसकेने रैनाच्या (Suresh Raina) जागेवर कोणत्याही खेळाडूची मागणी केलेली नाही. अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मात्र अशी अटकळे बांधली जात आहे, की रैनाने जैव सुरक्षा (Bio Bubble) वातावरणाचं उल्लंघन केलं होतं. या प्रकरणात रैनाने माफी मागितली तरी सीएसकेवर त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. कारण सीएसके आता भविष्याचाच अग्रक्रमाने विचार करेल.

रैना माफी मागेल किंवा नाही हा सध्याचा विषय अजिबातच नाही. मात्र सीएसके नव्या दमाच्या ऋतुराज गायकवाडला सक्षमपणे उभं करण्याचा प्रामुख्याने विचार करेल. धोनी आणि मुख्य प्रशिक्ष स्टीफन फ्लेमिंग अशाच नव्या दमाच्या खेळाडूंसाठी रणनीती तयार करतील.

रैनाने सीएसकेकडून 164 सामने खेळले आहेत. त्यात त्याच्या सर्वाधिक 4,527 धावा आहेत. आयपीएलच्या एकूण कारकिर्दीत त्याच्या नावावर 5,368 धावा आहेत. टी-20 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (5,412) नंतर त्याचा दुसरा क्रमांक लागतो.

रैनाला काय वाटते?


सुरेश रैनाच्या (Suresh Raina) माघारीनंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. रैनानेही माघारीनंतर स्पष्टीकरण न दिल्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. मात्र 2 सप्टेंबर रोजी रैनाने आपली चुप्पी तोडली.

सुरेश रैनाने सांगितले, की मी माझ्या कुटुंबासाठी लीगमधून माघार घेतली आहे. मात्र, 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी पुन्हा सीएसकेत सहभागी होऊ शकतो.

महेंद्रसिंह धोनीसोबत 15 ऑगस्ट रोजी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर त्याचे फ्रँचायजीशी वाद झाल्याचे वृत्त होते. मात्र, रैनाने या वृत्ताचे खंडन केले.

Raina will return in IPL? | सीएसकेच्या पथकात 13 जण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे त्याने माघार घेतल्याचे म्हंटले जात होते.

यावर रैनाने ‘क्रिकबज’ला सांगितले, ‘‘हा माझा पूर्णपणे वैयक्तिक विषय होता. माझ्या कुटुंबासाठी मला माघार घ्यावी लागली आहे. घरात असे काही प्रश्न होते, ज्यासाठी मला घरी परतणे आवश्यक होते. सीएसकेही माझं कुटुंबच आहे आणि माही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. अशा वेळी माझा हा निर्णय खूप कठीण होता’’

आपल्या वादाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर तो म्हणाला, ‘‘सीएसके आणि माझ्यात कोणतेही वाद नाहीत. कोणीही 12.5 कोटी रुपयांना पाठ दाखवू शकत नाही. काही महत्त्वाचे कारण असल्याशिवाय कोणीही माघार घेऊ शकत नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेतली आहे. मात्र मी अजूनही तरुण आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये मला अजूनही चार-पाच वर्षे खेळण्याची इच्छा आहे.’’

मी अजूनही दुबईत जाऊन सीएसकेसोबत राहू शकतो, असे रैनाने ठामपणे सांगितले. ‘‘मी दिल्लीतही सराव करीतच आहे. कदाचित तुम्ही मला पुन्हा सीएसकेच्या शिबिरात पाहू शकाल,’’ असेही रैनाने सांगितले.

Raina will return in IPL? | सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांना रैनाच्या भविष्याबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले, की संघ सर्व खेळाडूंचं समर्थन करते.

ते म्हणाले, ‘‘रैनाने सांगितले, की मी या सत्रात उपलब्ध होऊ शकत नाही. आम्ही नेहमीच आमच्या खेळाडूंना मदत करतो. रैनाने वैयक्तिक कारण सांगितले होते. त्यामुळे जेव्हा तो तंदुरुस्त होईल तेव्हा तो संघात परत येऊ शकतो. आम्हाला असंच वाटतं, की त्याने यावं.’’

Raina will return in IPL? | काशी विश्वनाथन म्हणाले, ‘‘आम्ही कधीच खेळाडूविरुद्ध नाही. पुढच्या सत्रात कोणत्याही अडचणी नाही. कारण आम्ही नेहमीच आमच्या खेळाडूंचे समर्थन केले आहे.’’

संघमालक श्रीनिवासन मात्र रैनावर प्रचंड नाराज आहेत. त्यावर त्यांनी केलेल्या ट्वीटवर रैना म्हणाला, की श्रीनिवासन माझ्यासाठी पितृतुल्य आहेत आणि त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे.

[jnews_block_18 first_title=”Read more…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ post_offset=”8″ include_category=”65,60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!