• Latest
  • Trending
फिफा वर्ल्ड कप

2018 च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत क्रोएशिया का जिंकू शकला नाही?

January 5, 2022
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
Thursday, June 1, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

2018 च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत क्रोएशिया का जिंकू शकला नाही?

जगभराचं लक्ष लागलेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. प्रत्येक लढत डोळ्यात साठवत फुटबॉल-प्रेमी स्पर्धेचा आनंद

Mahesh Pathade by Mahesh Pathade
January 5, 2022
in All Sports, FIFA WC 2018, Football
0
फिफा वर्ल्ड कप
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

रशियन भूमीत 2018 चं फुटबॉल महायुद्ध रंगलं. जगभराचं लक्ष लागलेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. प्रत्येक लढत डोळ्यात साठवत फुटबॉल-प्रेमी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा आनंद लुटत होता. मात्र, सर्वांत औत्सुक्याच्या ठरलेल्या लढती म्हणजे दोन सेमिफायनल आणि फायनल. यावर केलेले विश्लेषण फेसबुकवर शेअर केले होतेच. त्याला दादही भरभरून मिळाली. अनेकांनी हे विश्लेषण एकत्रित वाचायला मिळावं म्हणून आग्रहही धरला. त्यामुळे ब्लॉगवर या तिन्ही महत्त्वाच्या लढतींचे विश्लेषण देत आहे… आवडले तर लाइक जरूर करा…

kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549


बेल्जियम सीईटीत नापास…(पहिली सेमिफानल : बेल्जियम वि. फ्रान्स)

फिफा वर्ल्ड कप

फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये बेल्जियमची अवस्था मात्र बारावीत 100 टक्के गुण मिळवूनही सीईटीत अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यासारखी झाली. म्हणजे बघा ना, गटात एक नंबर, तसेच बाद फेरीत जपानला, तर उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला शिकस्त देऊनही बेल्जियम फायनलमध्ये अ‍ॅडमिशन काही घेऊ शकला नाही. कारणही बारावीतल्या विद्यार्थ्यांसारखंच… फ्रेंच पेपर अवघड गेला आणि गुणवत्ता घसरली. इतकी, की आता कुठेच अ‍ॅडमिशन नाही. घरीच बसायचं…

चीनच्या भिंतीसारखा गोलपोस्टसमोर उभा राहणारा बेल्जियन गोलकीपर कुटुवा एकटाच लढत होता…वेगवान खेळाने लक्षवेधी कामगिरी करणारा लुकाकू आज मात्र लकाकला नाही… आघाडीचे सैनिक जिथे निष्प्रभ ठरले तिथे कुटुवा मात्र निकराने गोल थोपवत होता… दुसरीकडे फ्रान्सचा गोलकीपर लॉरिसनेही बेल्जियम आक्रमणे रोखताना दोन अप्रतिम गोल अडवले. खरी लढाई याच दोन गोलकीपरमध्ये पाहायला मिळाली… फ्रान्सच्या उमिटीटीने हेडरने गोल केल्यानंतर अपवाद वगळता बेल्जियन त्राणच गळाले. अखेरचा अवांतर सहा मिनिटांचा वेळ निव्वळ बेल्जियमच्या समाधानासाठी होता असंच म्हणायला हवं.

थोडक्यात म्हणजे, फिफा वर्ल्ड कप उपांत्य फेरीत बेल्जियमचा 1-0 पराभव अजिबात रुचला नाही… खेळले चांगले, पण ही लढत उपांत्य फेरीतली होती. इथे दर्जा चांगला असून चालत नाही तर तो उत्तमच असावा लागतो… आणि समोर फ्रान्स असेल तर गाफील राहून कसं चालेल…

या पराभवाने बेल्जियन फारच निराश झाले असतील.

बेल्जियममध्ये दर वर्षी चॉकलेटचे उत्पादन सव्वादोन लाख टन होते, तसेच बीअर म्हणे, 800 वेगवेगळ्या प्रकारच्या बनतात. कालपर्यंत विजयाच्या वार्ता कानी पडत होत्या, तेव्हा लोकांनी चॉकलेट नक्कीच वाटले असतील… कुणीही रिता राहणार नाही म्हणून उत्पादनही वाढवले असेल, पण आजच्या पराभवाने बेल्जियम पाठीराख्यांना बीअर रिचवण्याशिवाय पर्याय नाही… कदाचित ती कमी पडेल, पण पराभवाच्या वेदना कमी होणार नाहीत…
असो…

फ्रेंचांना आता जेतेपदाची जेईई मेन द्यावी लागणार आहे… बघूया त्यांच्यासमोर क्रोएशियन पेपर वाट्याला येतो, की इंग्लिश पेपर…

क्रोएशियनांचा म्युझिक फेस्टिव्हल (दुसरी सेमिफायनल : इंग्लंड वि. क्रोएशिया)

 

फिफा वर्ल्ड कप
Croatia supporter

क्रोएशियातील अनेक उत्सवांपैकी एक म्हणजे ‘म्युझिक फेस्टिव्हल’. हा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात होतो. विशेष म्हणजे हा उत्सव याच महिन्यापासून म्हणजे जुलैपासूनच सुरू होतो. क्रोएशियाची टीम लुझनिकी स्टेडियमवर जणू काही म्युझिक फेस्टिव्हलच खेळत होती.. फरक इतकाच, की डीजेऐवजी त्यांनी आज इंग्लडचे डबे बडवले…!!!

‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीचा अनुभव जर्मनीपासून घेतल्यानंंतरही आम्ही मात्र साहेबांच्या पाठीशी राहिलो… काय करणार, आपण क्रिकेटवेडे भारतीय. ”तूही तो जन्नत मेरी, तूही मेरा जुनून…” इतकं हे पराकोटीला गेलेलं वेड. आपल्याच साहेबांची मेहेरबानी. त्यामुळे फुटबॉलशी नसले, तरी क्रिकेटच्या नात्याने पाठिंबा मग साहेबांनाच… तिकडे ते थेम्स काठावरून, इकडे आम्ही गंगा-गोदा काठावरून… पण सगळाच भ्रमनिरास… सागरांनी वेढलेल्या क्रोएशियनांच्या लाटांपुढे साहेबांचा काही निभाव लागला नाही.

इंग्लंडने पहिल्या पाच मिनिटांतच गोल केला… हे पहिले झटपट यश मिळवून दिले किरेन ट्रिपिअरने. त्याची फ्री किक जबराच. अगदी ख्रिस्तियानो रोनाल्डोची आठवण करून देणारी. या गोलने इंग्रजांना कमालीचा आनंद झाला.. जणू हा गोल स्विस बँकेत ठेवत त्याच्या व्याजावरचे ते मध्यांतरापर्यंत खेळत राहिले… पण सेकंड हाफमध्ये 68 व्या मिनिटाला पेरिसिचने मार्शल आर्ट स्टाइलने गोल केल्यानंतर सामन्याचे चित्र बदलले. उत्कंठा शिगेला पोहोचली. अवांतर 30 मिनिटे वांझोटीच गेली. नंतरची अवांतर 15 मिनिटेही अशीच संपणार की काय, असे वाटत असतानाच क्रोएशियाच्या मँड्झुकिचने इंग्लंडवर दुसरा आणि निर्णायक गोल साकारला. तेव्हा इंग्लंडकडे केवळ पाच मिनिटे उरली होती. क्रोएशियनांनी बचाव भक्कम करीत अखेर ऐतिहासिक विजय साकारला. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ते अंतिम फेरीत थडकले…

इंग्लंडचं दुर्दैव पाहा… यापूर्वी 1990 मध्ये इंग्लंडची टीम अंतिम फेरीत धडकली होती, त्या वेळी क्रोएशियाचा जन्मही झालेला नव्हता. या देशाकडून झालेला पराभव पचवणे इंग्लंडला तसे जडच जाणार.

इंग्लंडने अनेक खेळांचे शोध लावले (क्रिकेटबरोबरच फुटबॉलचा शोधही इंग्लंडचाच.). सँडविचचाही शोध याच देशाचा. पण आज क्रोएशियनकडून इंग्लंडचंच सँडविच झालं… नव्या दमाच्या क्रोएशियन टीमला फ्रेंच पेपरसाठी शुभेच्छा…

अपेक्षित जगज्जेता…(अंतिम फेरी : क्रोएशिया वि. फ्रान्स : ४-२)

 

फिफा वर्ल्ड कप


अशक्य माझ्या शब्दकोशात नाही… असं सांगणारा नेपोलियन आपल्या उण्यापुऱ्या 45 वर्षांच्या आयुष्यात 52 लढाया लढला. मात्र, एकच हरला, ती म्हणजे वॉटर्लूची लढाई. आज नेपोलियन असता तर तो या पराभवाच्या वेदनाही विसरला असता. कारण तसेच आहे… सपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या फुटबॉल महायुद्धाचे जगज्जेतेपद याच नेपोलियनच्या फ्रेंच सेनेने जिंकले.

एकवेळचा जगज्जेता असलेल्या संघासमोर अशा एका संघाचं आव्हान होतं, ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं. ज्या वेळी फ्रान्स 1998 मध्ये जगज्जेता होता त्या वेळी हाच क्रोएशिया तिसऱ्या स्थानी होता. हा अपवाद वगळला तर क्रोएशियन सेनेकडून फारशा अपेक्षा कोणीही केल्या नव्हत्या. 98 नंतर साखळीतच गारद होणारा क्रोएशियाने यंदा मात्र कमाल केली. प्रचंड तडफेने तो फ्रान्ससमोर उभा ठाकला होता.

हाच तो क्रोएशिया संघ, ज्याला पात्रता फेरी गाठण्याचीही आशा नव्हती, तो फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत होता. अशा स्थितीत मानसिक दडपण क्रोएशियावर नव्हे, तर फ्रान्सवर अधिक असायला हवं. कारण याच दडपणाखाली जेतेपदाचा दावेदार जर्मनी साखळीतच गारद झाला. अर्जेंटिना, ब्राझीलचेही आव्हान संपुष्टात आले. पण फ्रान्सच्या बाबतीत तसं काहीही घडलं नाही. कारण ही नेपोलियनची सेना होती. होय, ही नेपोलियनचीच सेना म्हणावी लागेल. नेपोलियन म्हणायचा, की रात्री अंगातले कपडे काढून फेकताना चिंताही फेकून द्या… क्रोएशियन सेनेचं वादळ घोंगावत असताना आदल्या दिवशी फ्रेंच सेनेनेही अशीच अंगातली कापडं काढून फेकावी तशी चिंता फेकून देत बिनघोर झोपली. दुसऱ्या दिवशी थेट मैदानात क्रोएशियन सैन्याचा सामना करण्यासाठीच उतरली… अगदी जेत्यांच्या थाटात. पुढे काय घडले, रिझल्ट तुमच्यासमोरच आहे.

1998 नंतर तब्बल 20 वर्षांनी जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या या फ्रेंच सेनेने कारकिर्दीत तीन वेळा फायनल गाठली. अंतिम फेरी गाठणारी ही फ्रेंच सेना हरली फक्त एकदाच.. 2006 मध्ये. इटलीविरुद्ध. यंदा मात्र अंतिम फेरी गमावली नाही….

लढावू क्रोएशियन

क्रोएशियाचा फुटबॉल प्रवास थक्क करणाराच आहे. पात्रताफेरी गाठण्याची आशा संपुष्टात आली असताना अखेरच्या टप्प्यात युक्रेनचा पराभव केला. म्हणून ही टीम फिफाच्या महायुद्धात आव्हान देऊ शकली. कोणताही स्टार खेळाडू नाही. मात्र, आपल्या सांघिक खेळाने स्टारपदाला जाऊन पोहोचलेली ही टीम म्हणूनच ग्रेट. अंतिम फेरी गाठून देणारा कर्णधार लुका मॉड्रिच, राकिटीच, इव्हान स्त्रिनिच,मँडझुविच, गोलकीपर सुबासिच, वेद्रान, कालिनिच ही तिशी पार केलेल्या तरुणांची फळी पुढची वर्ल्डकप कदाचित खेळणार नाही. मात्र, या टीमने ज्या तडफेने खेळ केला, त्याला तोड नाही. इंग्लंडसारखा 26 च्या आतला तरुणांचा संघही त्यांच्यापुढे तग धरू शकला नाही. म्हणूनच या झुंजारू संघाला तीनच शब्दफुले पुरेशी आहेत… दि ग्रेट क्रोएशियन…

कारण क्रोएशियात सम संख्येतील फुले समाधीवर चढवली जातात, तर विषम संख्येतील फुले शुभेच्छांसाठी दिली जातात…

मेस्सीचा अर्जेंटिना कोपा फुटबॉल स्पर्धेचा विजेता

Follow on facebook Page kheliyad

Read more at:

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष
All Sports

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?
All Sports

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा
All Sports

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
कतार फिफा वर्ल्ड कप
All Sports

कतार फिफा वर्ल्ड कप वेळापत्रक 2022

February 11, 2023
hand of god
All Sports

Hand of God देणार ३० लाख डॉलर!

November 17, 2022
इंडोनेशिया फुटबॉल मृत्यू
All Sports

इंडोनेशिया- फुटबॉल स्पर्धेत मृत्यू सामना

February 12, 2023

Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी नाशिकची ‘तुकाराम’गाथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!