All Sportssports newsswimming

हा खेळाडू म्हणतोय, जलतरण सराव तरी सुरू करा…

S P Likith swimming

 

30 May 2020
नयी दिल्ली
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे लॉकडाउन झाले आहे. त्यामुळे ना क्रीडा स्पर्धा होत आहेत, ना सराव. मात्र, काही देशांनी क्रीडा स्पर्धा सुरू केल्या आहेत, तर काही ठिकाणी सरावांनाही मुभा दिली आहे. त्यामुळे भारतानेही आता खेळाडूंसाठी सरावाची मुभा द्यायला हवी, अशी अपेक्षा भारताचा राष्ट्रीय जलतरणपटू एसपी लिकिथ S P Likith | याने शनिवारी व्यक्त केली.
100 ब्रेस्टस्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विजेता असलेला एसपी लिकिथ S P Likith | याने म्हंटले आहे, की इतर देशांनी जलतरणपटूंना जशी सरावाची मुभा दिली आहे, तशी भारतानेही द्यायला हवी. जलतरणपटूंना स्विमिंग पूल खुले करून द्यायला हवेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह काही देशांनी जलतरणपटूंना स्विमिंग पूल खुले केले आहेत. मात्र, भारतात लॉकडाउनमुळे जलतरण तलाव बंदच आहेत.
लिकिथने S P Likith | गेल्या वर्षी 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकचा बी क्लालिफिकेशन पूर्ण केली होती. लिकित म्हणाला, की ‘‘आपण आता प्रशिक्षणाकडे पुन्हा वळले पाहिजे. इतर देशांनी नियमांचे पालन करीत जलतरणपटूंसाठी प्रशिक्षण सुविधा सुरू केली आहे. आता आपण कोरोनासह जगायला शिकलं पाहिजे.’’ लिकिथने S P Likith | एका वेबिनारदरम्यान सांगितले, की ‘‘हो, जोखीम असेलच, पण आपण सतर्क राहू शकतो.’’ भारतीय जलतरण महासंघाने क्रीडा मंत्रालयाला प्रशिक्षण सुरू करण्याबाबत सुचवायला हवे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!