• Latest
  • Trending
कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

स्त्रीशक्तीची सुवर्णपकड घट्ट करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

January 4, 2022
क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
क्रिकेट जानेवारी 2023

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

July 7, 2023
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
Thursday, September 28, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

स्त्रीशक्तीची सुवर्णपकड घट्ट करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन यांचं कर्तृत्व बेदखल करणारी भारतीय क्रीडाव्यवस्था आणि इराणी महिलांचं अस्तित्व नाकारणारी इराणी शासनव्यवस्था...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
January 4, 2022
in All Sports, Inspirational Sport story, Kabaddi
0
कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन यांचं कर्तृत्व बेदखल करणारी भारतीय क्रीडाव्यवस्था आणि इराणी महिलांचं अस्तित्व नाकारणारी इराणी शासनव्यवस्था या दोन्ही व्यवस्थांना दखल घेण्यास भाग पाडलं ते शैलजा जैन यांनीच. रचना क्लब ते थेट इराण कबड्डी संघाचे प्रशिक्षकपद हा जैन यांचा प्रवासच थक्क करणारा आहे.

kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549


एकीकडे महिलांचं अस्तित्व नाकारणारी इराणी शासनव्यवस्था, तर दुसरीकडे कर्तृत्व सिद्ध करूनही तिची दखल न घेणारी भारतीय क्रीडाव्यवस्था. तिचं अस्तित्व नाकारणाऱ्या या दोन्ही व्यवस्था सारख्याच. मात्र, या दोन्ही व्यवस्थांना तिच्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली. त्यामागे होती एक भारतीय महिला. त्या म्हणजे इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन. एशियाड क्रीडा स्पर्धेत इराणने भारताला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

इराणमध्ये महिलांवर किती तरी बंधने. अगदी घराबाहेर पडायचे म्हंटले, तरी नखशिखांत वेशभूषा करायची. पुरुषांचे सामने पाहण्याचीही जिथे चोरी, त्या देशातील महिलांचे जगणे कसे असेल…? अशा देशातील महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणे म्हणजे धाडसच म्हणावे लागेल. पण 61 वर्षीय जैन यांनी ते स्वीकारले. इराणमध्ये कोणीही पाहुणा आला, मग तो राष्ट्राध्यक्ष का असेना, त्यांचे ‘मिस्टर अब्बास’ या नावानेच स्वागत केले जाते. महिला असेल तर ‘मिस’. शैलजा यांनी इराणमध्ये पाऊल ठेवले तेव्हा त्यांना ‘मिस जैन’ म्हणूनच संबोधले गेले.

रचना क्लब ते थेट इराण कबड्डी संघाचे प्रशिक्षकपद

तालुका क्रीडाधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या शैलजा जैन मूळच्या नागपूरच्या. लग्नानंतर त्या नाशिककर झाल्या. लग्नानंतर त्यांनी कबड्डी आणि खो-खोचा एनआयएस प्रशिक्षण कोर्सही पूर्ण केला. जैन यांनी तीनशेपेक्षा अधिक राष्ट्रीय कबड्डीपटू घडवले. कबड्डीत दबदबा निर्माण करणाऱ्या नाशिकच्या रचना क्लबचे नाव आजही अनेकांच्या ओठी आहे. याच क्लबने भक्ती कुलकर्णी, निर्मला भोईसारख्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू दिल्या. त्यांच्या प्रशिक्षकही याच शैलजा जैन. हा काळ कापरासारखा उडून गेला. आपल्याकडे विस्मरण फार लवकर होते. 2014 मध्ये त्या निवृत्त झाल्या. अगदी इराणी यशापर्यंत जैन हे नाव कुणाच्या गावीही नव्हतं. जैन यांचं कर्तृत्व बेदखल करणारी भारतीय क्रीडाव्यवस्था आणि इराणी महिलांचं अस्तित्व नाकारणारी इराणी शासनव्यवस्था या दोन्ही व्यवस्थांना दखल घेण्यास भाग पाडलं ते मिस जैन यांनीच. रचना क्लब ते थेट इराण कबड्डी संघाचे प्रशिक्षक पद हा शैलजा जैन यांचा प्रवासच थक्क करणारा आहे.

निवृत्तीनंतर 2017 मध्ये शैलजा जैन इराणच्या महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षक पद स्वीकारले. इराणमध्ये पाऊल ठेवताना त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते. एक तर कायद्याची बंधने. इराणमध्ये पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी आलेल्यांनी त्यांना पहिल्यांदा स्कार्फ दिला. महिलेने हिजाब परिधान करणे इराणमध्ये अपरिहार्य. त्यात कोणतीही तडजोड नाही. अशा देशात जैन यांना महिलांना कबड्डी शिकवायची होती. हिजाबाचं इतकं बंधन, की कबड्डी खेळताना झटापटीत हिजाब निघाला तर इराणी खेळाडू आधी हिजाब सांभाळतील, मग मध्य पाटीला स्पर्श करतील!

इराणमधील आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात जैन यांना पहिल्यांदा इराणी महिला समजून घ्यावी लागली, मग प्रशिक्षणाची दिशा ठरवावी लागली. आपल्याकडे पुरुषांची कबड्डी महिलांना सहजपणे पाहता येते. तेथे मात्र तसे नाही. महिलांना पुरुषांचा खेळ पाहण्यास बंदी आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा इराण वि. स्पेन हा सामना महिलांना पाहता यावा यासाठी इराण सरकारला बहुमत घ्यावे लागले होते. हा अपवाद वगळला तर महिलांना पुरुषांचे आणि पुरुषांनाही महिलांचे सामने पाहण्यास अजिबात मुभा नाही. अगदी काही काम असेल तरी ते महिलांच्या मैदानावर येऊ शकत नाहीत. मुळात महिलांचे सामनेही लाइव्ह दाखविले जात नाहीत. सुवर्णपदक जिंकल्यानंतरही या महिलांचा कबड्डी सामना टीव्हीवर दाखविण्यात आलेला नाही. महिलांवर बंधने असली तरी ती आपल्याला जाचक वाटतील; पण इराणी महिलांना त्याचे काहीही वाटत नाही. इराणमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात भरचौकात फाशी दिली जाते. त्यामुळे तिथे महिला इतक्या सुरक्षित आहेत, की रात्री बारा वाजताही रस्त्यावरून एकटी महिला जात असेल तरी तिला भीती वाटत नाही. इराणच्या सुरेख मेहमाननवाजीने (आतिथ्यशीलता) मिस जैन भारावल्याच. रस्त्यावरून फिरताना त्यांचे हिंद हिंद म्हणून कौतुकाने स्वागत व्हायचे. जैनही त्यांना सलाम ठोकायच्या.

जैन यांच्यापुढे एकच आव्हान होते, ते म्हणजे महिलांना प्रशिक्षण देणे. इराणने तर त्यांच्या हाती 45 महिला सोपवल्या. हा असा संघ ज्याला कबड्डीची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तरीही त्यांच्या नसानसांत कबड्डी! यातून जैन यांना अंतिम 12 जणींचा संघ निवडण्याचे अधिकार देऊन टाकले. यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असंही त्यांना सांगितलं. जैन दचकल्याच. बापरे…! एक तर इथले कायदे इतके कडक, त्यात संघ एकटीनेच निवडायचा म्हणजे अग्निपरीक्षाच. एक अनामिक भीती त्यांच्या मनात दाटली होती.

इराणी महिलांचा फिटनेस उत्तम

इराणी महिलांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा फिटनेस अप्रतिम. संघात दोन विवाहित महिलाही होत्या. एक ३६ वर्षांची, तर दुसरी २७ वर्षांची. पण फिटनेस इतका उत्तम होता, की भारतीय कबड्डी संघात तशा खेळाडू शोधून सापडणार नाहीत. स्पोर्ट ड्रेसही नखशिखांत परिधान केला जातो. खेळतानाही त्यांना या कपड्यांनी अवघडलेपण अजिबात जाणवत नाही. प्रशिक्षण शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या परिसरात एकही पुरुष दिसणार नाही. मॅनेजर, मानसशास्त्रज्ञ, फिजिओपासून तेथे लहानसान काम करणाऱ्यांपर्यंत सर्व महिलाच. अगदी मुलाखत घेण्यास पत्रकार येणार असेल तर तीही महिलाच. सर्व खेळाडू उच्चशिक्षित असल्या तरी एकीलाही इंग्रजी येत नव्हते. कारण त्यांचं शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालेलं होतं. इथे जैन यांच्यासमोर भाषेची मोठी अडचण होती. अगदी रन किंवा डाइव्ह मारायला सांगायचं असलं तरी जैन यांना ते कृती करूनच सांगावं लागायचं. हळूहळू त्यांनी फारसी शब्दाची माहिती घेतली. पुढे पुढे त्या खेळाडूंशी एकरूप होत गेल्या.

खेळाडूंना शिकवताना आणखी एक अडचण उभी ठाकली. ते म्हणजे या महिला संघाला आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस निवासी प्रशिक्षण देता येत नव्हते. कारण मुली जास्त दिवस घराबाहेर राहू शकत नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्या ‘होमसीक’ होऊ नये! पण जैन यांना कशीबशी 15 दिवसांच्या निवासी प्रशिक्षणाची परवानगी मिळाली. इराणमध्ये महिलांवर जाचक बंधने आहेत, असे आपल्याला वाटते; पण तसे तेथे अजिबात जाणवले नाही, असे जैन ठामपणे सांगतात. उलट प्रशिक्षणाच्या कालावधीत स्विमिंग टँकपासून सोना बाथपर्यंत अनेक उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा खेळाडूंना दिल्या जात होत्या. साल्टरूम (मिठाची खोली) ही सुविधा तर जैन यांनी नव्यानेच अनुभवली. संपूर्ण खोली मिठाने व्यापलेली. भिंती, छत, फरशी मिठाची. स्विमिंग झाल्यानंतर ओलेत्या कपड्याने या मिठाच्या खोलीत यायचं. खोलीत निवांतपणे पहुडल्याने शरीराला आराम मिळतो, तसेच हा व्यायाम अस्थमासाठीही चांगला असतो. त्यामुळे संपूर्ण वेदनादायी शरीर पुन्हा ठणठणीत व्हायचं.

सर्व महिला आर्थिकतेत संपन्न. शिबिर घरापासून जवळ असेल तर बहुतांश खेळाडू स्वत:च्या कारनेच यायच्या. लांब असेल तर स्वत: पैसे खर्चून विमानाने येत. शिबिर इराणच्या विविध शहरांत झाले. त्यामुळे निम्मा इराण मिस जैन यांनी या शिबिरांतच पालथा घातला.

मिस जैन शुद्ध शाकाहारी. इराणी माणूस मात्र मांसाहाराशिवाय जेवणाची कल्पनाच करू शकत नाही. अशा परिस्थितीत जैन यांची कसोटी लागायची. अगदी कोशिंबीरमध्येसुद्धा मांसाचे तुकडे असायचे. इराणी महिला तर आश्चर्याने म्हणायच्या, “मिस जैन, तुम्ही अंडीपण खात नाहीत?” जेवणाचा इतका मोठा प्रश्न जैन यांच्यापुढे असायचा, की कधी कधी त्या उपाशीच राहत. ड्रायफ्रूट्सचाच काय तो दिलासा.

इराणने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

इराणी महिला संघाचा सराव मात्र कसून घेतला. फिटनेस चांगला असल्याने हार्डवर्क करण्यात एकही इराणी महिला मागे हटत नव्हती. जैन यांनी वाळूवर, तसेच समुद्राच्या पाण्यातही प्रशिक्षण घेतले. शैलजा जैन यांच्या या मेहनतीचे फलित म्हणजे एशियाड स्पर्धेत इराणने जिंकलेले ऐतिहासिक सुवर्णपदक. मिस जैन यांच्या चेहऱ्यावर आनंद-दु:खाच्या छटा एकाच वेळी उमटून गेल्या. कारण एक त्यांची टीम होती जी सुवर्णपदकाचं सेलिब्रेशन करीत होती, तर दुसरा मायदेशाचा संघ, जो पदक हुकल्यानं हिरमुसलेला त्या पाहत होत्या. इराणमध्ये कारून ही एकमेव अधिकृत नदी आहे. ज्या वेळी इराणने भारताला पराभूत करून सुवर्ण जिंकले तेव्हा जैन यांच्या एका डोळ्यांत ‘कारून’च्या आनंदधारा, तर दुसऱ्या डोळ्यांत मायदेशाप्रती कारुण्यधारा वाहत होत्या…

पुन्हा अनुभवले 2016 मधील कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेचे सुवर्णक्षण

Follow on Facebook Page : kheliyad

Follow on Twitter @kheliyad

वर्ल्ड कप कबड्डी 2016
All Sports

पुन्हा अनुभवले 2016 मधील कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेचे सुवर्णक्षण

December 5, 2021
कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन
All Sports

स्त्रीशक्तीची सुवर्णपकड घट्ट करणाऱ्या कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन

January 4, 2022
फिदा कुरेशी
All Sports

फिदा कुरेशी- संगीतकला जोपासणाऱ्या घराण्यातील एकमेव कबड्डीपटू

January 5, 2022
कबड्डीचा आत्मा
All Sports

तीस का दम

November 22, 2021
नाशिक-कबड्डी
All Sports

नाशिक कबड्डी : साठी ओलांडली तरी…!

November 25, 2021
Truth about North Maharashtra Kabaddi To get energy
All Sports

Truth about North Maharashtra Kabaddi To get energy | उत्तर महाराष्ट्राच्या कबड्डीला ऊर्जा मिळेल?

April 28, 2021
Tags: इराण कबड्डीशैलजा जैन
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
ई स्पोर्टस खेळाची दस्तक!

ई स्पोर्टस खेळाची दस्तक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story
marathiblogs

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!