• Latest
  • Trending
शतकांचे महाशतक

शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?

December 10, 2021
क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
क्रिकेट जानेवारी 2023

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

July 7, 2023
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
Wednesday, September 27, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?

शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी, याचं उत्तर सचिनशिवाय दुसरा कोणीच देऊ शकणार नाही. महाशतकाला 16 मार्च 2021 रोजी नऊ वर्षे झाली.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 10, 2021
in All Sports, Cricket, Sachin Tendulkar
4
शतकांचे महाशतक
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी, याचं उत्तर सचिन तेंडुलकर याच्याशिवाय दुसरा कोणीच देऊ शकणार नाही. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या महाशतकाला 16 मार्च 2021 रोजी नऊ वर्षे झाली. या शतकांच्या महाशतकाकडे पाहिलं तर त्याच्यासाठी हा अतिशय अवघड टप्पा होता. कदाचित तो या शतकांच्या महाशतकापासून century of centuries | वंचितही राहिला असता. सचिनने आठ वर्षांपूर्वी शेर–ए–बांग्ला स्टेडियममध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र, या महाशतकी शतकासाठी त्याला एक वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली होती.

शतकांचे महाशतक

सचिनने अनेक शतके लीलया केली आहेत. त्यासाठी त्याला वाट पाहण्याची कधी गरज भासली नाही. मात्र, हे पहिलेच शतक होते ज्याला गवसणी घालण्यासाठी त्याला एक वर्ष वाट पाहावी लागली. अर्थात, सचिनला यापूर्वीही एका शतकासाठी 315 दिवस वाट पाहावी लागली होती. मात्र, शंभराव्या शतकापर्यंत पोहोचण्यासाठी सचिनला जो मोठा कालावधी लागला तो क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला. त्यावरून तो अनेकांच्या टीकेचेही लक्ष्य बनला. त्यामुळेच हे शतक त्याच्यासाठी सर्वांत कठीण शतक मानले जाते. त्याला कारणेही तशीच आहेत.

आशिया कप स्पर्धेत 16 मार्च 2012 रोजी भारताचा अंतिम सामना बांग्लादेशविरुद्ध होता. ढाक्यातील शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये हा सामना होता. हा सामना क्रिकेटविश्वासाठी दोन कारणांसाठी महत्त्वाचा होता. एक तर आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना होता, तर दुसरे म्हणजे 99 शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकर आपले शंभरावे शतक पूर्ण करण्याच्या ईर्षेने खेळणार का, याचीही उत्सुकता होती. सचिनने चाहत्यांना निराश केले नाही. त्याने 114 धावांची शतकी खेळी रचत शतकांचे महाशतक साजरे केले आणि चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अर्थात, सचिनने आपले 99 वे शतक 12 मार्च 2011 रोजी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याला सहा वेळा शतक करण्याची संधी होती. शतकाजवळ century of centuries | पोहोचूनही त्याला शतकाने हुलकावणीच दिली. दोन वेळा तर तो ‘नर्व्हस नाइंटीज’चा शिकार झाला.

”हे माझ्या सर्वच शतकांमध्ये सर्वांत कठीण शतक होते. कारण मी कुठेही गेलो तर लोक याच विषयावर चर्चा करायचे. कोणीच माझ्या ९९ शतकांविषयी बोलत नव्हते.”

2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मोहाली येथे उपांत्य फेरीचा सामना होता. त्या वेळी तर क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची ठोके कमालीची धडकत होती. का नाही धडकणार, कारण त्या वेळी सचिन 85 धावांवर होता. शतकाला अवघ्या 15 धावांची गरज होती. समोर सईद अजमल गोलंदाजी करीत होता. त्याच्या एका चेंडूवर चेंडू हवेत उडाला आणि शाहीद आफ्रिदीने तो झेप घेऊन झेल टिपला.

पुढे तंदुरुस्तीच्या कारणास्तव सचिनला वेस्ट इंडीज दौरा करता आला नाही. मात्र, इंग्लंड दौऱ्यात त्याला शतक झळकावण्याची नामी संधी होती. इग्लंडविरुद्धच्या या मालिकेत राहुल द्रविडवगळता कुणीच खेळपट्टीवर टिकू शकलं नाही. सचिनलाही केवळ ओव्हलच्या मैदानावरच लय सापडली. सामन्याच्या चौथ्या दिवशी सचिन 35 धावांवर खेळत होता. पाचव्या दिवशी त्याने केव्हिन पीटरसनला खणखणीत चौकार ठोकत नव्वदीपार खेळी साकारली. त्या वेळी तर चाहत्यांचे चेहरे खुलले होते.

घरच्या मैदानावरही हुलकावणी

सर्वांच्या मनात महाशतकाने उचल खाल्ली. मात्र, सचिनच्या दुर्दैवाचा फेरा संपलेला नव्हता. त्याच वेळी टिम ब्रेस्ननचा चेंडू असा आला, की तो पायावर आदळला. सचिन पायचीत झाला आणि पुन्हा एकदा तो नर्व्हस नाइंटीजचा शिकार होत महाशतकापासून वंचित राहिला. घरच्या मैदानावरही सचिनला महाशतकाने century of centuries | हुलकावणीच दिली. त्या वेळी वेस्ट इंडीज भारत दौऱ्यावर आला होता. दिल्लीतील एका सामन्यात 76, तर मुंबईतल्या घरच्या मैदानावर 94 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तर त्याच्या शतकांच्या महाशतकाच्या सन्मानार्थ एक विशेष ट्रॉफी तयार केली होती. सचिन जेथे खेळायला जायचा तेथे ही ट्रॉफी ठेवली जायची.

मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही सचिनची निराशा झाली. त्याने मेलबर्न (73) आणि सिडनी (80) येथेही त्याने महाशतकाची आशा जागवली. अखेर आशिया कप त्याच्यासाठी एक संधी घेऊन आला. बांग्लादेश दौऱ्यावर या वेळी सचिन आपली हेअर स्टाइलही बदलली होती. हा बदल त्याचे शतक आणि अंधश्रद्धेशी जोडला गेला होता. श्रीलंकेविरुद्ध सचिन केवळ सहा धावांवर बाद झाला. मात्र, बांग्लादेशविरुद्ध तो खेळपट्टीवर टिकून राहिला आणि याच चिकाटी खेळीमुळे त्या शतकांचे महाशतक century of centuries | साकारले. क्रिकेटच्या इतिहासात हे शतक अजरामर झाले. हा तो दिवस होता, ज्या वेळी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, सायंकाळपर्यंत या अर्थसंकल्पापेक्षा सचिनच्या महाशतकाचा century of centuries | संकल्प पूर्ण झाल्याचीच चर्चा अधिक होती. ही पहिलीच अशी घटना होती, की अर्थसंकल्पावर सचिनचं महाशतक भारी पडलं होतं.

”नेहमीच खेळाचा आनंद घ्या. स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. मी 22 वर्षे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची प्रतीक्षा केली आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.”

century of centuries

Read more at:

शतकांचे महाशतक
All Sports

शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?

December 10, 2021
कोरोना महामारीमुळे क्रिकेटला फटका
coronavirus

कोरोना महामारीमुळे क्रिकेटला असा बसला फटका

December 10, 2021
सचिन तेंडुलकर क्रिकेट
Cricket

सचिन तेंडुलकर याच्याविषयी न ऐकलेल्या क्रिकेट गोष्टी

February 23, 2023
सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण?
All Sports

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण?

December 27, 2021
Tags: century of centuriessachin tendulkarSachin Tendulkar 100th Centuryशतकांचे महाशतकसचिन तेंडुलकर
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
कोबे ब्रायंट

कोबे ब्रायंट : कुटुंबवत्सल पिता आणि महान खेळाडूची अकाली एक्झिट

Comments 4

  1. Unknown says:
    3 years ago

    सचिनच्या या महाशतकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

    Reply
  2. Mahesh Pathade says:
    3 years ago

    🙂

    Reply
  3. Pingback: सचिनला बाद देणे ही मानवी चूक... - kheliyad
  4. Pingback: सचिनची 42 रहस्ये, जी तुम्ही कधी वाचली नसतील... - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story
marathiblogs

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!