• Latest
  • Trending
ठाकरे सर नारळी व्यक्तिमत्त्व

ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व

November 26, 2021
क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
क्रिकेट जानेवारी 2023

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

July 7, 2023
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
Sunday, September 24, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व

धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर... असं हे धडकी भर‍वणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
November 26, 2021
in आठवणींचा धांडोळा
0
ठाकरे सर नारळी व्यक्तिमत्त्व
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर… असं हे धडकी भर‍वणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ठाकरे सर तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं! होय, नारळीच!! नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं.

एनसीसीतली एक छोटीशी आठवण आहे. एकदा माझी एनसीसीच्या कॅम्पसाठी निवड झाली नाही. ती कदाचित पुढच्या वर्षी झाली असती; पण सोबतीचे अनेक जण कॅम्पला जाणार म्हणून मलाही या कॅम्पला जाण्याची प्रचंड इच्छा झाली. मी त्यांना भेटलो. ‘‘सर, मला कॅम्पला यायचंय.’’ ते काहीसे कचाट्यात सापडल्यासारखे जाणवले. शेवटी त्यांनी सांगितलं, बरं ठीक आहे. कारण कॅम्पसाठी विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. मात्र, तरी त्यांनी माझी कॅम्पसाठी निवड केली. देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये कॅम्प धम्मालच झाला. कॅम्पचं सर्टिफिकेट सर्वांना मिळालं; पण मला काही मिळालं नाही. मला वाटलं, आपल्याला कॅम्पमध्ये बळेच घुसडलं म्हणून ते दिलं नसेल. पण त्यांना विचारण्याचीही हिम्मत झाली नाही. जाऊद्या, मला कॅम्पला पाठवलं, हेच माझ्यासाठी मोठं आहे म्हणून मी गप्प बसलो. पण आजही प्रश्न अस्वस्थ करतोय, की मला प्रमाणपत्र का दिलं नसेल?

बारावीनंतर मी केटीएचएममध्ये अॅडमिशन घेतली आणि गाव जवळजवळ सुटलंच. ठाकरे सरही दृष्टिपटलावरून जवळजवळ धूसरच झाले. ते आता गावात राहत नाहीत, हेही बरीच वर्षे माहीत नव्हतं. सोबतीचे मित्रंही विखुरले.  योगायोगाने दोन दिवसांपूर्वीच जुना सोबती अरविंद रोकडे भेटला. तब्बल २३ वर्षांनी! खूप गप्पा झाल्या. मित्रांच्या आठवणी निघाल्या. अनेक सरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अचानक म्हणाला, अरे ठाकरे सरही माझ्या घराजवळच राहतात. ठाकरे सर यांचं नाव निघताच एक नारळी व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर तरळून गेलं.

ठाकरे सर म्हंटल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या आठवणीतला संपूर्ण पट फ्लॅशबॅकसारखा झरझर तरळून गेला. ती एनसीसी, खाकी वर्दीतली रुबाबदार देहयष्टी, हजरजबाबी… इत्यादी इत्यादी. मी म्हंटलं, ‘‘मला भेटायचंय रे. असतात का घरी?’’ कारण रिटायर्ड माणसांचा काही नेम नसतो. घरात नेमक्या वेळेत सापडतीलच असं कधी होत नाही. पण अरविंद म्हणाला, की नाही असतात घरी.

फार विलंब न करता दुसऱ्याच दिवशी आम्ही सायंकाळी ठाकरे सरांच्या घरी. घरी गेल्याबरोबर त्यांच्या पत्नी समोर आल्या. मी म्हणालो, ‘‘सर आहेत का?’’

सौ. ठाकरे : ‘‘हो आहे. आपण कोण?’’

मी : मला ओळखा बरं. (सर आणि मी एकाच गल्लीच राहायचो. त्यामुळे सरांसह त्यांच्या घरातले सर्वच मला लहानपणापासून ओळखायचे.)

सौ. ठाकरे (कपाळावरील रेषा आखडून आठवण्याचा प्रयत्न करीत) : ‘‘नाही आठवलं. कोण?’’

मी : सरांना बोलवा. ते ओळखतात का बघू?

सौ. ठाकरे : तुम्ही बसा. ते येताहेत..

माझी उत्सुकता चाळवली. सर तसेच दिसत असतील का? मला ओळखतील का? (ओळख सांगितल्यानंतरही ओळखतील का, हाही प्रश्न चाटून गेला)

सर आले. चेहरा तसाच भेदक, शरीरयष्टीही तशीच मजबूत; पण उतारवयाच्या खुणा तेवढ्या नव्या होत्या. निदान माझ्यासाठी तरी. त्यांनी आम्हा दोघांकडेही पाहिलं. अरविंदला रोजच पाहत आले असल्याने त्याला न ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्याकडे मात्र ते प्रश्नांकित नजरेने पाहत होते. मी म्हंटलं, सर, नमस्कार. ओळखलंत का?

ते काहीसे माझा चेहरा वाचत होते; पण कुठेही ओळखीची खूण सापडेना. शेवटी मलाच वाटलं, की आता फार काही ओळख लपवू नये. मी त्यांना नाव सांगितलं नि ते आश्चर्यचकित मुद्रेने म्हणाले, ‘‘अरे, किती बदललास तू!’’ खूप उत्सुकतेने माझी ओळख जाणून घेण्यासाठी थांबलेल्या सौ. ठाकरेही म्हणाल्या, ‘‘अरे बापरे! ओळखूच येत नाही आता तू.’’

ठाकरे सरांसोबत खूप गप्पा झाल्या. वर्षा, दीदीची खुशाली कळली. त्यांची तिसरी मुलगी राणी फारशी आठवत नव्हती. पण ती म्हणे, की ‘गावातल्या सर्वांच्या आठवणी येथे निघतात.’ या गप्पांमध्ये एनसीसीचा विषय आला आणि मीही माझ्या मनातली खंत बोलून दाखवली… ‘‘सर, तुम्ही मला कॅम्पचं प्रमाणपत्रच दिलं नव्हतं!’’ सरांना आता एवढ्या वर्षांनंतर सगळंच काही आठवणार नव्हतंच… पण गप्पांच्या या ओघात मला सतावणारी खंत त्यांना भेटून मात्र कायमची पुसून गेली.

खूप वेळ झाला होता. गप्पा संपत नव्हत्या. आमचा आणखी एक मित्र प्रफुल्ल मुसळे आमची वाट पाहत होता. पाच मिनिटांत येतो, असं सांगितलं, पण दीड तास उलटला होता. आता त्याचा फार अंत पाहायचा नव्हता आणि सरांशी गप्पा मारण्याचा मोहही आवरायला हवा होता…. पुन्हा भेटू, असं म्हणत अखेर तेथून बाहेर पडलो; पण त्यांच्या भेटीच्या आनंदात गुरफटून गेलो होतो…

(भेट ः बुधवार, २२ जून २०१६)

Read more at:

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे
All Sports

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो
All Sports

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा
All Sports

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1
All Sports

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन
All Sports

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल
All Sports

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
Tags: ठाकरे सर ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
एक धाव स्त्री अस्तित्वासाठी

धावपटू द्युती चंद हिची एक धाव स्त्री अस्तित्वासाठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story
marathiblogs

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!