Diwali Spacial 2019Jagjit Singh

जगमोहन ते जगजीत सिंग… एक समृद्ध गझल प्रवास

जगमोहन ते जगजीत सिंग… एक समृद्ध गझल प्रवास
गमोहन ते जगजीत सिंग हा प्रवास थक्क करणारा आहे. हा प्रवास घेऊन येताना माझ्या मनातील भावना मला व्यक्त कराव्याशा वाटतात. चाळिशीतल्या पिढीचं महाविद्यालयीन जीवन खरोखर मंतरलेलं मी तरी मानतो. विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांचं तर विशेष कौतुक. कारण त्यांना सतत शहराचं औत्सुक्य असायचं. त्या काळात आजकालचे स्मार्टफोन अजिबात नव्हते. व्हिडीओ हॉलवर पिक्चर पाहणे किंवा कॅसेट आणून गाणी ऐकणे. त्या वेळी कोपरगाव सर्किटचे टेपरेकॉर्डर कमालीचे हिट होते. थोडीशी पदरमोड करून आम्ही असाच एक असेम्बल टेपरेकॉर्डर विकत घेतला. त्याला मोठे स्पीकर. मग वेगवेगळ्या पिक्चरच्या कॅसेट वाजवायचो. त्या तीस रुपयांपासून मिळायच्या. पण जगजीत सिंग यांच्या गझलेची कॅसेट 60 रुपयांच्या पुढेच मिळायची. मी चकित झालो. असं काय आहे या कॅसेटमध्ये? बरेच मित्र मला म्हणायचे, अरे जगजीत सिंगची कॅसेट आहे. स्वस्त कशी असेल? माझ्याकडून ही कॅसेट काही खरेदी करणं झालं नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीचं कुतूहल प्रचंड वाढलं.

लहानपणी दोन मुठी कोणी समोर धरल्या तर त्या मुठींमध्ये काय असेल याची उत्सुकता प्रचंड असायची. मग हळूच एक मूठ उघडून दाखवली की त्यात काहीही नसायचं. मग दुसऱ्या मुठीत काय असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचायची. मात्र ती मूठ न दाखवताच तो निघून गेला की मनात कायम सलत राहतं की काय असेल बरं त्या मुठीत. मग ती व्यक्ती जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मनी हूरहूर कायम राहते.

माझी जगजीत सिंग यांच्याविषयी जाणून घेण्याची हूरहूर अशीच त्या झाकलेल्या मुठीसारखी…

सहजपणे मी जगजीत सिंग यांच्याविषयी एकदा आंतरजालावर वाचलं तेव्हा मला त्यांच्याविषयीची उत्सुकता वाढतच गेली. अनेक ठिकाणी त्यांच्याविषयीचे संदर्भ पाहत गेलो. वाचत गेलो. तेव्हा मला हळूहळू जगजीत सिंग उकलत गेले. त्यांची गझल गायनापर्यंतची कहाणी प्रचंड संघर्षमय आहे. त्यांचे गायन क्षेत्रातील पाऊल क्रांतिकारकच म्हणावं लागेल. म्हणूनच त्यांच्यावर जगमोहन ते जगजीत सिंग हा गझल प्रवास लिहिण्याचं ठरवलं.

दहा ऑक्टोबर रोजी त्यांची पुण्यतिथी झाली. त्याच वेळी ठरवलं, की जगमोहन ते जगजीत सिंग हा गझल प्रवास आपणा सर्वांपर्यंत पोहोचवावा. दिवाळीनिमित्त त्यांच्याविषयीची माहिती आठ भागांत आपणासाठी घेऊन आलो आहे. २५ सप्टेंबर 2019 रोजी धनत्रयोदशीला गझल गायकीचे सम्राट जगजीत सिंग यांचा जीवनसंघर्ष घेेऊन आलो आहे. यातील प्रत्येक भाग म्हणजे मोरपीस आहे. प्रत्येक भाग वाचताना तुमची उत्सुकता वाढत जाईल, यात शंका नाही. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा. कदाचित अनेकांनी ही माहिती कुठे तरी वाचली असेल किंवा त्यातील काही माहितीत दुरुस्ती सुचवावीशी वाटली तर त्याचेही मोठ्या मनाने स्वागत आहे.

तर मित्रांनो,
दिवाळीनिमित्त खास तुमच्यासाठी…
जगमोहन ते जगजीत सिंग : एक समृद्ध गझलप्रवास

Follow on Twitter : @kheliyad

[jnews_block_22 first_title=”Jagmohan to Jagjit Singh” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”104″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!