• Latest
  • Trending
गुलाबी चेंडू का वापरतात डे-नाइट क्रिकेट सामन्यात?

गुलाबी चेंडू का वापरतात डे-नाइट क्रिकेट सामन्यात?

December 25, 2021
क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
स्पेन फुटबॉल चुंबन

चुंबन भोवले स्पेन फुटबॉल प्रशिक्षकाला

September 12, 2023
नेब्रास्का व्हॉलिबॉल

विक्रमी गर्दीत नेब्रास्का व्हॉलिबॉल

September 12, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
क्रिकेट जानेवारी 2023

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

July 7, 2023
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
Thursday, September 28, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

गुलाबी चेंडू का वापरतात डे-नाइट क्रिकेट सामन्यात?

गुलाबी चेंडू का वापरतात डे-नाइट क्रिकेट सामन्यात? क्रिकेटच्या इतिहासात तीन रंगांचे (लाल, पांढरा व गुलाबी) चेंडू आतापर्यंत वापरले गेले आहेत.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 25, 2021
in All Sports, Cricket
0
गुलाबी चेंडू का वापरतात डे-नाइट क्रिकेट सामन्यात?
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

भारत आणि बांगलादेश दरम्यान कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर 22 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी एक वाजता ऐतिहासिक कसोटी सामना सुरू झाला. गुलाबी चेंडूवर (Pink Ball, गुलाबी गेंद) खेळविला जाणारा हा भारतातील पहिला कसोटी सामना आहे. त्यामुळेच हा सामना ऐतिहासिक मानला जात आहे. सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध प्रकाशझोतात (day-night) खेळत आहेत. त्यामुळे या पिंक बॉलविषयी अनेकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. क्रिकेटप्रेमींनाच नव्हे, तर दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीलाही कुतूहल आहे. तो म्हणाला, की गुलाबी चेंडूने खेळणं प्रचंड आव्हानात्मक आहे. वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्याइतकंच ते थरारक असेल. त्यामुळे या गुलाबी चेंडूविषयी (Pink Ball) औत्सुक्य निर्माण होत आहे. काय आहे या गुलाबी चेंडूचे रहस्य?

आशिया खंडात क्रिकेटची एक ग्लॅमरस इमेज आहे. ही छबी कायम राहण्यासाठी क्रिकेटमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. टी-20 क्रिकेट त्यातूनच पुढे आलेली संकल्पना. क्रिकेट सामन्याला प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी टी-20 संकल्पना कमालीची यशस्वी ठरली. झटपट क्रिकेट एकीकडे लोकप्रिय होत असताना कसोटी क्रिकेट रटाळ झाली. प्रेक्षकांची संख्याही रोडावत चालली. प्रेक्षकांनी कसोटी सामन्यांकडेही वळावे, यासाठी प्रकाशझोतातील सामने खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. हेतू हाच, की लोकांना आपली सगळी कामे संपवून कसोटी सामना पाहता यावा.

गुलाबी चेंडू का?

हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र, हे उत्तर शोधण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले. यापूर्वी पिवळा आणि केशरी रंगाच्या चेंडूंचा प्रयोग करण्यात आला. आपण चित्र काढताना काळ्या रंगावर पिवळा किंवा केशरी रंग दिला तर अधिक उठून दिसतो. कदाचित रात्रीच्या क्रिकेट सामन्यात या रंगाचे चेंडू वापरणे अधिक योग्य ठरेल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला वाटले असेल. पण छे… हा प्रयोग फसला. कारण टीव्ही कॅमेऱ्यात हे चेंडू व्यवस्थित दिसत नव्हते. त्यानंतर गुलाबी चेंडूची संकल्पना पुढे आली आणि ती यशस्वी ठरली.

गुलाबी चेंडूवर खेळले गेलेले आतापर्यंतचे सामने

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूवर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. केवळ सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमच नाही, तर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण पाच सामने गुलाबी चेंडूवर खेळले आहेत आणि या पाचही सामन्यांत ऑस्ट्रेलियाच विजयी ठरली आहे. गुलाबी चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळविण्यात आलेले आतापर्यंतचे 11 सामने असे…

तारीख सामना विजयी संघ
27 ते 29 नोव्हेंबर 2015 ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, अ‍ॅडीलेड ऑस्ट्रेलिया तीन गडी राखून विजयी
13 ते 17 ऑक्टोबर 2016 पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई पाकिस्तान 56 धावांनी विजयी
24 ते 27 नोव्हेंबर 2016 ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, अ‍ॅडीलेड ऑस्ट्रेलिया सात गडी राखून विजयी
15 ते 19 डिसेंबर 2016 ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया 39 धावांनी विजयी
17 ते 19 ऑगस्ट 2017 इंग्लंड वि. वेस्ट इंडीज, बर्मिंगहॅम इंग्लंड एक डाव आणि 2019 धावांनी विजयी
6 ते 10 ऑक्टोबर 2017 पाकिस्तान वि. श्रीलंका, दुबई श्रीलंका 68 धावांनी विजयी
2 ते 6 डिसेंबर 2017 ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, अ‍ॅडीलेड ऑस्ट्रेलिया 120 धावांनी विजयी
26 ते 27 डिसेंबर 2017 दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे, पोर्ट एलिझाबेथ दक्षिण आफ्रिकेचा एक डाव 120 धावांनी विजय
22 ते 26 मार्च 2018 न्यूझीलंड वि. इंग्लंड, ऑकलंड न्यूझीलंडचा एक डाव 49 धावांनी विजय
23 ते 26 जून 2018 श्रीलंका वि. वेस्ट इंडीज, ब्रिज टाउन श्रीलंकेचा चार गडी राखून विजय
24 ते 26 जानेवारी 2019 श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा एक डाव 40 धावांनी विजयी

असा आहे क्रिकेट चेंडूंच्या रंगांचा इतिहास

कसोटी क्रिकेटमध्ये लाल रंगाचा चेंडू तुम्हाला माहितीच असेल. मात्र, कोणतेही बदल सहजासहजी झालेले नाहीत. यापूर्वी अगदी 1937 पर्यंत चेंडूचा रंग बदलण्यासाठी प्रस्ताव होता. मात्र, त्यात फारसे बदल झाले नाहीत. लाल रंगाव्यतिरिक्त पांढऱ्या रंगाच्या चेंडूने उसळी घेतली. अर्थात, हा पांढऱ्या रंगाचा चेंडू प्रकाशझोतातील एकदिवसीय सामन्यात (वन-डे) वापरला गेला. कारण फ्लडलाइटमध्ये तो अधिक स्पष्टपणे दिसू शकेल. प्रकाशझोतातील सामन्यांसाठी पांढऱ्या रंगाचा चेंडू ग्राह्य धरला गेला आणि नंतर तो प्रकाशझोतातील सर्वच व्यावसायिक वन-डे सामन्यांत वापरण्यात आला. पुढे पुढे तर तो दिवसाच्या सामन्यांतही वापरण्यात येऊ लागला. लाल आणि पांढऱ्या रंगाने क्रिकेटविश्वात स्थान मिळवले, पण या दोन्ही चेंडूंत कायम तुलना होत राहिली. म्हणजे पांढऱ्या रंगाच्या चेंडूबाबत असे म्हंटले जाते, की सामन्याच्या मध्यांतरापर्यंत हा चेंडू लाल रंगाच्या चेंडूपेक्षा अधिक स्विंग होतो आणि तेवढ्याच लवकर तो खालावतोही. चेंडू बनविणाऱ्या कंपन्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. असे कसे होऊ शकते, हा या कंपन्यांचा आश्चर्यमिश्रित प्रश्न. कारण लाल आणि पांढरा चेंडू बनविण्यासाठी कोणतीही वेगळी पद्धत वापरली गेलेली नाही. या दोन्ही चेंडूंसाठी एकच पद्धत आणि साहित्य वापरण्यात आले. लेदरही समान होेते. बदल फक्त रंगाचा होता. जर सारख्याच मटेरियलने दोन्ही चेंडू बनवले असतील तर दोघांच्या परिणामात फरक कसा होऊ शकतो, हे न उलगडणारे कोडे होते. पांढऱ्या रंगाच्या चेंडूबाबत आणखी एक तक्रार होती, की हा चेंडू लवकर खराब होतो. तो लवकर बदलावा लागतो. कारण 30-40 षटकांनंतर हा चेंडू फलंदाजाला स्पष्ट दिसतच नाही. हे लक्षात आल्यानंतर प्रत्येक इनिंगला नवा चेंडू वापरण्याचा निर्णय झाला.1992 आणि 1996 च्या वर्ल्डकपमध्ये नवा चेंडू वापरण्याची ही संकल्पना वापरण्यात आली. मात्र, एक अडचण उभी राहिली. ती म्हणजे एका इनिंगला नवा चेंडू वापरायचा म्हणजे, तो पुन्हा बदलता येत नव्हता. हा चेंडू 30 षटकांनंतर खूपच खराब व्हायचा. त्यामुळे चेंडूची अवस्था पाहून 34 व्या षटकानंतर अंपायरच्या परवानगीनंतर चेंडू बदलण्याची मुभा मिळाली. अर्थात, अंपायरला हे पटायला हवे, की चेंडू खराब आहे किंवा नाही.

वेगवेगळ्या रंगांचे चेंडू कुठे वापरले जातात?

क्रिकेटच्या इतिहासात तीन रंगांचे चेंडू आतापर्यंत वापरले गेले आहेत- लाल, पांढरा व गुलाबी. या तिन्ही रंगांचे चेंडू क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वापरले जातात.
लाल चेंडू दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी हा चेंडू वापरला जातो.
पांढरा चेंडू  हा चेंडू एकदिवसीय (वन-डे) व टी-२० सामन्यांसाठी वापरला जातो.
गुलाबी चेंडू  प्रकाशझोतातील (day-night) कसोटी सामन्यांसाठी या चेंडूचा उपयोग केला जातो.

या सामन्यात गुलाबी चेंडूचा सर्वप्रथम उपयोग

लाल, पांढऱ्या चेंडूंनंतर तिसऱ्या रंगाने क्रिकेटमध्ये रंग भरले ते म्हणजे गुलाबी चेंडूने (Pink ball). हा चेंडू 2000 मध्ये तयार करण्यात आला. या चेंडूचे वैशिष्ट्य म्हणजे, तो प्रकाशझोतातील सामन्यांसाठी वापरण्याची मुभा मिळाली. विशेषतः कसोटी व प्रथमश्रेणीतील सामन्यांसाठी. कारण लाल रंगाचा चेंडू प्रकाशझोतातील सामन्यांसाठी अजिबात उपयोगाचा नव्हता. फलंदाजाला तो स्पष्टपणे दिसत नव्हता हे त्याचे प्रमुख कारण होते. पांढरा चेंडूही प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी फारसा फायदेशीर नव्हता. कारण तो फारच लवकर खराब व्हायचा. असे असले तरी 80 षटकांपर्यंत तो बदलायचा नाही हा नियम अडचणीचा ठरायचा. यावर गुलाबी चेंडू हा उत्तम पर्याय म्हणून पुढे आला. गुलाबी चेंडूचा उपयोग सर्वांत प्रथम जुलै 2009 मधील आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये करण्यात आला. हा सामना इंग्लंडमधील वोर्म्सली येथे 2009 मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांत प्रकाशझोतात झाला.

गुलाबी चेंडूवरील पहिला कसोटी सामना कोणता?

गुलाबी चेंडूवर आतापर्यंत 11 सामने खेळविले गेले आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश हा बारावा कसोटी सामना असेल, जो गुलाबी चेंडूवर खेळविला जाईल. 2010 मध्ये गुलाबी चेंडूवर पहिला सामना त्रिनिदाद अँड टोबॅगो विरुद्ध गयानामध्ये खेळविण्यात आला होता. हा सामना ड्रॉ झाला. मात्र, हा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना होता. त्यामुळे या सामन्याची नोंद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतली गेली नसेल.

चेंडू केव्हा बदलतात?

मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात चेंडू बदलण्याचे काही नियम आहेत. साधारणपणे दोन डावांची सुरुवात नव्या चेंडूने केली जाते. म्हणजे प्रत्येक डावासाठी नवा चेंडू. एक डाव संपेपर्यंत हा चेंडू बदलता येत नाही. तो बदलायचा असेल तर त्यासाठी क्रिकेटचे तीन नियम आहेत. या तीन नियमांव्यतिरिक्त कोणत्याही स्थितीत चेंडू बदलता येत नाही. अगदी प्रेक्षकांमध्ये चेंडू गेला आणि हरवला तरीही चेंडू बदलता येत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी कोणत्याही परिस्थितीत चेंडू परत करणे अनिवार्य आहे.

चेंडू बदलण्यासाठी हे तीन नियम आहेत…
1. जर चेंडू खराब झाला किंवा तो फुटला तर…
2. खेळाडूने चेंडू कुरतडला असल्यास
3. कसोटी क्रिकेटमध्ये 80 षटकांनंतर चेंडू बदलता येतो. हा चेंडू बदलण्याचा पर्याय क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधारावर अवलंबून असतो.

खेळाडूला चेंडूला पॉलिश करता येते, पण ती पॉलिश कशी असायला हवी?

सामन्यात जेव्हा चेंडू वापरला जातो, त्या वेळी तो कुरतडणे गुन्हा आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण तो घासता येतो, म्हणजेच त्याला थोडे पॉलिशिंग करता येते. आपण अनेकदा पाहतो, की गोलंदाज मांडीजवळ पायघोळाच्या कपड्याला चेंडू घासत असतो. त्यामुळे त्या चेंडूचा रंग त्या पायघोळाला लागतो. त्याचे कारण म्हणजे चेंडू अधिक स्विंग व्हावा हेच आहे. चेंडू स्विंग होण्यासाठी खेळाडू आणखी एक ट्रिक वापरतात, ती म्हणजे आपली लाळ चेंडूला लावतात किंवा कपाळावरील घाम तेथे लावतात. तसे करणे क्रिकेटमध्ये ग्राह्य आहे.

क्रिकेटमध्ये चेंडू बदलताना काही बाबी विचारात घेतल्या आहेत. म्हणजे एखाद्यावेळी गोलंदाजाकडून चेंडू कुरतडला जाऊ शकतो किंवा चेंडू अधिक स्विंग व्हावा म्हणून त्यावर काही अनधिकृत प्रयोग होऊ शकतात. सामना निर्णायक स्थितीत असताना असे प्रकार घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अंपायर हा चेंडू अनेकदा तपासत असतो. त्याचे चेंडूच्या आकारावर विशेष लक्ष असते. जर त्यात त्याला आक्षेपार्ह आढळले तर अंपायर चेंडू बदलू शकतो. मात्र, चेंडू बदलताना किती षटके झाली आहेत, याचा विचार आवर्जून केला जातो. साधारणपणे 30 व्या षटकात जर चेंडू बदलण्याचा प्रसंग आला, तर नवा चेंडू दिला जात नाही. 30 षटके जुनाच चेंडू तेथे बदलला जातो.

चेंडूबाबत ही छेडछाड क्रिकेटच्या नियमानुसार गुन्हा ठरते…
चेंडू लाळ किंवा घामाव्यतिरिक्त इतर द्रवाचा उपयोग केल्यास…
चेंडू जमिनीवर घासल्यास
बोटाच्या नखाने चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न केल्यास..
चेंडूची शिवण उसवण्याचा प्रयत्न केल्यास

चेंडूनुसार गोलंदाजी परिणामकारक कशी ठरते?

चेंडूची स्थिती कशी आहे, यावर गोलंदाजीचं तंत्र अवलंबलं जातं. इथे कर्णधाराची भूमिका महत्त्वाची मानली जाते. साधारणपणे नवा चेंडू असेल तर असा चेंडू वेगवान गोलंदाजाच्या हाती सोपवणे केव्हाही उत्तम मानले जाते. कारण नव्या चेंडूला वेग अधिक मिळतो आणि लवकर उसळीही घेतो. नव्या चेंडूवर वेगवान गोलंदाजाचा सामना करणे फलंदाजाला बऱ्याचदा अवघड जाते. त्यामुळे अनेक सामन्यांमध्ये सलामीच्या जोडीतला एक तरी फलंदाज पहिल्या दोनपाच षटकांत बाद होतो, ते याच कारणामुळे. साधारणपणे पहिली दहा षटके वेगवान गोलंदाजांचीच असतात. नंतर हा चेंडू फिरकी गोलंदाजांच्या हाती सोपवला जातो. कारण चेंडू जुना झाल्याने त्याला वळण देणे सोपे जाते. काहीशी उसळीही असते. अशा चेंडूचा फायदा फिरकी गोलंदाज लवकर उठवू शकतात. साधारण आठ ते दहा षटकांनंतर हा चेंडू फिरकी गोलंदाजीकडे सोपविणे गरजेचे आहे. अनेकदा असे होते, की चेंडू जेव्हा फिरकीला पूरक ठरतो तेव्हा कर्णधार चेंडू बदलण्याचा पर्याय वापरण्यास विलंब करू शकतो.

तुम्हाला क्रिकेटचे किती नॉलेज आहे?

Facebook page kheliyad

Read more at:

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे
All Sports

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

September 15, 2023
बेसिल डी’ओलिव्हेरो
All Sports

वर्णद्वेषाविरुद्ध बंड पुकारणारा बेसिल डी’ओलिव्हेरो

September 14, 2023
डगआउट चंदना मास्टरमाइंड रणतुंगा
All Sports

‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा

September 14, 2023
दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1
All Sports

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

September 13, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट
All Sports

वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत

August 20, 2023
वेस्ट इंडीज क्रिकेट
All Sports

वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पात्र का ठरला नाही?

July 9, 2023
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
ग्रीन सोल्जर अजित टक्के

ग्रीन सोल्जर अजित टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story
marathiblogs

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!