100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे?
100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे?
आपल्याला वारा जाणवतो, पण तो कधी दिसत नाही. तो पाहायचा असेल, तर मी शंभर मीटर शर्यत सुचवेन. बंदुकीतून गोळी सुटावी तसे शंभर मीटर शर्यतीत धावपटू स्टार्टिंग ब्लॉकवरून फिनिशिंग लाइनचा वेध घेत सुटतात. डोळ्यांची पाती लवते न लवते तोच 100 मीटर शर्यत संपलेली असते. या शंभर मीटर शर्यतीत अफाट वेगाने काही धावपटूंनी विक्रम रचले, तसे ते मोडीतही निघाले. मैदानी खेळातील अशाच विश्वविक्रमांच्या प्रश्नांचा वेध घेणारी ही मालिका खास खेळियाडच्या वाचकांसाठी.
स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ही विशेष उपयोगी ठरणारी मालिका आहे. तर जाणून घेऊया 2021 पर्यंत 100 मीटर शर्यतीत महिला व पुरुष गटातील विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे? Who holds the world record in the 100 meter race?
महिला गटात 32 वर्षांपासून विश्वविक्रम
अमेरिकेची फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनर (Florence GRIFFITH-JOYNER) हिने 16 जुलै 1988 रोजी 100 मीटरमध्ये 10.49 सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे गेल्या 32 वर्षांत एकाही महिला धावपटूला हा विश्वविक्रम मोडीत काढता आलेला नाही. जॅकी जॉयनर-कर्सी ही फ्लोरेन्सची नणंद. दोघीही एकाच ऑलिम्पिकमध्ये खेळल्या आहेत.
यापूर्वी 1984 मध्ये अमेरिकेच्याच एव्हलिन अॅशफोर्ड हिच्या नावावर १०० मीटरचा विक्रम होता. चार वर्षांनी फ्लोरेन्सने एव्हलिनपेक्षा 0.27 सेकंद कमी वेळ नोंदवत 10.49 सेकंदांचा नवा विश्वविक्रम रचला. सर्वाधिक काळ विक्रम अबाधित राहणे हाही एक विक्रमच म्हणावा लागेल.
पुरुष गटात 12 वर्षांपासून विश्वविक्रम
पुरुष गटात तरी 2009 मध्ये उसेन बोल्टने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला होता. बर्लिनमध्ये 2009 मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्टने 9.58 सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम रचला. अमेरिकेचा टायसन गे हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 9.71 सेकंदांची वेळ नोंदवली. उसेन बोल्टपेक्षा तो तब्बल 13 सेकंदांनी मागे राहिला. टायसनची ही दुसऱ्या क्रमांकाची वेळ असली तरी ती कामगिरी अमेरिकेतला नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून गेली. असो.. पण काहीही असो उसेन बोल्टचा विश्वविक्रम 12 वर्षांपासून कोणताही धावपटू मोडू शकलेला नाही. उसेन बोल्ट 11 वेळा जागतिक विजेता (World Champion) आहे. त्याने 2009 ते 2015 अशी सलग सात वर्षे 100 मीटर, 200 मीटर आणि 4 × 100 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदके जिंकली आहेत.
शंभर मीटर शर्यतीचा थोडक्यात इतिहास
ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यत सुरुवातीला पुरुषांसाठीच होती. 1896 पासून यात पुरुष खेळाडूच सहभाग घेत होते. मात्र, 1928 मध्ये या इव्हेंटमध्ये महिलांनाही प्रवेश देण्यात आला. 1928 पासून आजतागायत महिला धावपटूही या शर्यतीत आपले कौशल्य सिद्ध करीत आहेत. या 100 मीटर शर्यतीच्या जागतिक स्पर्धेला (World Championships) मात्र 1983 पासून सुरुवात झाली.
ही शर्यत सुरू होण्यासाठी तीन सूचना खेळाडूला दिल्या जातात. या तीन सूचना अशा : 1. ऑन युवर मार्क्स (on your marks), 2. सेट (set), 3. तिसऱ्या सूचनेला पिस्तुलातून फायरिंग केली जाते. (Firing of the starter’s pistol)
ऑन युवरर मार्क्स अशी सूचना कानी पडताच धावपटू स्टार्टिंग ब्लॉक्सवर सिद्ध होतात. दुसरी सूचना ‘सेट’ अशी कानी पडताच धावपटू आपल्या जागेवर धावण्याच्या स्थितीत येतात. तिसऱ्या सूचनेत पिस्तुलाच्या फायरिंगचा आवाज कानावर पडताच धावपटू ट्रॅकवर धावू लागतात.
Follow us :
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]