Cricket

कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम डावखुरे फलंदाज

कसोटीतील सर्वोत्तम डावखुरे फलंदाज

डाव्यांचाही दिवस असतो हे जेव्हापासून कळलं तेव्हापासून या डाव्यांची माहिती घेत होतो. अर्थात, ही माहिती राजकारणातील डाव्यांची नाही, तर डाव्या हाताच्या लोकांविषयीची आहे. कसोटी क्रिकेटचा आत्मा आहे. म्हणून याच कसोटीतील सर्वोत्तम पाच डावखुऱ्या फलंदाजांविषयी… आवडली तर नक्की शेअर करा..

Mahesh Pathade
Sports Journalist

Follow us

आज 13 ऑगस्ट. अर्थात, डावखुऱ्यांचा दिवस. जगभरात उजव्या हाताची लोकं खोऱ्याने आढळतील. मात्र, तुलनेने डावखुरे अगदीच कमी आहेत. मात्र, या डावखुऱ्यांनीही जगात आपली एक छाप सोडली आहे. खेळात असो वा अन्य क्षेत्रांत. कसोटीतही डावखुऱ्या फलंदाजांनी अशीच अमीट छाप सोडली आहे. कसोटी जगातील सर्वोत्तम डावखुरे…

top 5 greatest left-handed batsmen |


top 5 greatest left-handed batsmen

ब्रायन लारा

विंडीजचा एकेकाळचा स्टायलिश डावखुरा फलंदाज. त्रिनिनादमध्ये 2 मे 1969 रोजी जन्मलेल्या ब्रायन लाराला “प्रिन्स” या टोपणनावानेही ओळखले जाते.

जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या ब्रायन लाराने 131 कसोटी सामन्यांत 11,953 धावा केल्या आहेत. यात 34 शतकांचा समावेश आहे, तर त्याच्या फलंदाजीची सरासरी आहे 52.88.

शतकांचे काय घेऊन बसला, त्याने एका सामन्यात त्रिशतक, तर एकदा चौशतकी म्हणजे 400 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिडनीतील त्याची 277 धावांची द्विशतकी खेळी आणि 153 धावांची सामना जिंकून देणारी दीडशतकी खेळी अविस्मरणीय आहे. केवळ फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही त्याने अनेक फलंदाजांना जेरीस आणले आहे.

शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरनइतकाच तो उत्तम फिरकी गोलंदाजही होता.

[table id=13 /]

top 5 greatest left-handed batsmen

गॅरी सोबर्स

डावखुऱ्या कसोटी क्रिकेटपटूंमध्ये गॅरी सोबर्सचंही नाव आवर्जून घेतलं जातं. हाही विंडीजचाच माजी क्रिकेटपटू.

सर गारफिल्ड सोबर्स यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी बार्बाडोसमध्ये झाला. विंडीज संघाकडून ते 1954 ते 1974 दरम्यान खेळले आहेत.

उत्तम फिरकी गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवलीच, शिवाय ते उत्तम क्षेत्ररक्षकही होते.

विंडीजच्या भात्यातला हुकमी अष्टपैलू म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. ते जेव्हा क्रिकेटमधून निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या नावावर नाबाद 365 धावांचा विक्रम होता, शिवाय कसोटीमध्ये सर्वोच्च 8,032 धावांचा विक्रमही त्यांच्याच नावावर होता.

[table id=14 /]

top 5 greatest left-handed batsmen

अॅलन बोर्डर

80 च्या दशकात ऑस्ट्रेलिया संघातील माजी क्रिकेटपटू अॅलन रॉबर्ट बोर्डर यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. न्यू साउथ वेल्समधील क्रीमोर्न येथे जन्मलेले बोर्डर सध्या समालोचक म्हणूनही काम करीत आहेत.

उत्तम फलंदाज असलेले बोर्डर अनेक वर्षे ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारही होते. एबी या टोपणनावाने ते ओळखले जात. ते कारकिर्दीत 156 कसोटी सामने खेळले आहेत. हा एक विक्रम होता.

नंतर स्टीव वॉने त्यांचा विक्रम मोडीत काढला. बोर्डर यांनी सलग 153 कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही नोंदवला होता. नंतर हा विक्रम 2018 मध्ये अॅलेस्टर कूकने मोडला. कर्णधारपदावर सर्वाधिक काळ विराजमान होणारे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे क्रिकेटपटू आहेत.

80 च्या दशकात ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम संघ घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी कारकिर्दीत 156 सामन्यांत 11,174 धावा केल्या आहेत.

[table id=15 /]

top 5 greatest left-handed batsmen

ग्रॅमी स्मिथ

दक्षिण आफ्रिकेचे ग्रॅमी क्रेग स्मिथ यांचाही दबदबा अनेकांनी पाहिला असेलच. नव्या पिढीला ग्रॅमी स्मिथची ओळख नव्याने सांगण्याची गरज नाही.

जोहान्सबर्गमध्ये 1 फेब्रुवारी 1981 रोजी जन्मलेले स्मिथ सध्या समालोचक आहेत. सहा वर्षांपूर्वीच म्हणजे 2014 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटच्या सर्वच प्रकारांत त्यांनी आपली छाप सोडली आहे.

2003 मध्ये त्यांची दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. त्या वेळी ते अवघ्या 22 वर्षांचे होते. कसोटी संघाच्या कर्णधारपदावर ते निवृत्त होईपर्यंत विराजमान होते.

त्यांनी 117 कसोटी सामन्यांत 9,265 धावा केल्या आहेत. यात 27 शतके आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील 277 ही त्यांची कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या.

[table id=16 /]

top 5 greatest left-handed batsmen

कुमार संगकारा

श्रीलंकेतील उत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून कुमार संगकाराचा उल्लेख आवर्जून करायला हवा. माटेलमध्ये 27 ऑक्टोबर 1977 रोजी जन्मलेल्या संगकाराची क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात यष्टिरक्षक फलंदाज म्हणूनच झाली.

त्याच्या पिढीतला तो उत्तम फलंदाज होता. सर्वोच्च धावसंख्या करणारा तो श्रीलंकेतील एकमेव फलंदाज आहे.

कसोटीत 10 हजार क्लबमध्ये स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये संगकाराची सरासरी सर्वाधिक आहे. त्याने 134 कसोटी सामन्यांत 12 हजार 400 धावा केल्या आहेत.

[table id=17 /]


edit post


top 5 greatest left-handed batsmen

Cricket

कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम डावखुरे फलंदाज

August 14, 2020

edit post



Cricket

Mitchell Starc settlement | स्टार्कची विमा कंपनीशी तडजोड

August 11, 2020

edit post


Jhulan Goswami | आता लक्ष्य २०२२ च्या विश्वकरंडकावर!

Cricket

Jhulan Goswami | आता लक्ष्य २०२२ च्या विश्वकरंडकावर!

August 11, 2020

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!