CricketIPL

Suresh Raina IPL 2020 | या कारणामुळे रैनाची आयपीएलमधून माघार

 

या कारणामुळे रैनाची आयपीएलमधून माघार

Follow us

[jnews_footer_social social_icon=”rounded”]

चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) हरहुन्नरी खेळाडू सुरेश रैना याने २९ ऑगस्ट रोजी ‘वैयक्तिक कारणास्तव’ इंडियन प्रीमियर लीगमधून Suresh Raina IPL 2020 | माघार घेतली आहे. मात्र, यामागे करोनाचा प्रादुर्भाव हे एकमेव कारण नाही, तर अन्य कारणेही आहेत.

सुरेश रैनाच्या माघारीमागे एक धक्कादायक कारण पुढे आले आहे. वरकरणी करोना आणि कौटुंबिक कारण त्याच्या माघारीशी जोडले जात होते. मात्र, माघारीमागे ही कारणे अजिबातच नाहीत.

आयपीएलसाठी रवाना झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघातील खेळाडूंना ज्या रूम दिल्या आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या रूमला बाल्कनी आहे. मात्र सुरेश रैनाच्या रूमला बाल्कनी नाही. त्यामुळे आपल्यालाही बाल्कनी असलेलीच रूम हवी, असा हट्ट सुरेश रैनाने धरला होता.

त्यावर धोनीने रैनाला समजावण्याचा प्रयत्नही केला. मात्र, रैनाने कोणाचेही ऐकले नाही. आयपीएल बायो बबलमध्ये राहणे रैनाला भीतिदायक वाटत होते. म्हणूनच रैनाने बाल्कनी असलेल्या रूमची मागणी केली होती.

बाल्कनी असलेली रूम न मिळाल्यानेच रैनाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय़ घेतला असल्याची चर्चा आहे. या चर्चेला पुष्टी मिळाली, ती सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या ट्वीटमुळे.

रैनाच्या डोक्यात हवा गेलीय!

सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी ट्वीटवर आपले मत व्यक्त केल्यानंतर चर्चेला उधाण आले. श्रीनिवासन यांनी ट्वीटवर म्हंटले, “रैनाची माघारी धक्कादायक आहे. यातून संघ बाहेर येईल, अशी आशा आहे.”

यापुढे श्रीनिवासन म्हणतात, “यशस्वी झाल्यानंतर काहींचे पाय जमिनीवर राहत नाहीत. त्यांच्या डोक्यात हवा जाते. हा प्रकारही त्यातलाच आहे. मात्र, धोनी सक्षम आहे. तो परिस्थिती नियंत्रणात आणेल. सीएसके एक कुटुंब आहे. संघातील ज्येष्ठ खेळाडू एकमेकांशी जुळवून घेतील. लवकरच रैनाला उपरती होईल, की त्याने किती मोठे आर्थिक नुकसान केले आहे.”

सीएसकेमध्ये करोनाचा शिरकाव

फ्रँचायजीने सांगितले, की सीएसकेचा आणखी एक खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा खेळाडू फलंदाज आहे. तो भारतीय संघाचाही खेळाडू आहे. मात्र त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाहीत. या खेळाडूने रणजी ट्रॉफीत खोऱ्याने धावा केल्या आहेत. 

यापूर्वी टी-20 चा मध्यमगती गोलंदाज आणि सीएसकेच्या पथकातील १२ जण पॉजिटिव्ह आढळले होते. रैनाने आयपीएलमधून माघार Suresh Raina IPL 2020 | घेतल्याची माहिती फ्रँचायजीने २९ ऑगस्ट रोजी दिली. 

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी ट्वीटवर सांगितले, ‘‘सुरेश रैना वैयक्तिक कारणास्तव भारतात परतला आहे. आयपीएलच्या उर्वरित सत्रात तो आता सहभागी होणार नाही. चेन्नई सुपरकिंग्स या दरम्यान सुरेश रैना आणि त्याच्या परिवाराच्या पाठीशी राहील.’’

करोनाच्या प्रादुर्भावानंतर रैनाची माघार

करोनाच्या संसर्गामुळे सीएसकेचे खेळाडू आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ चिंतीत आहे. रैनाने आयपीएलच्या Suresh Raina IPL 2020 | माघारीचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळेच माघार घेतल्याची चर्चा आहे. 

फ्रँचायजीशी संबंधित सूत्रांनी सांगितले, की रैनाला आपल्या परिवाराला वेळ देण्याची गरज होती. त्याने १५ ऑगस्ट रोजीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. 

एकापाठोपाठ संघातील १३ जण पॉझिटिव्ह आढळल्याने सीएसकेने क्वारंटाइनचा कालावधी एक सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. सुरेश रैनाच्या माघारीचा सीएसकेला मोठा धक्का आहे. कारण तो आयपीएलमधील आघाडीचा खेळाडू आहे.

रैनाच्या माघारीचे कारण अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे तो चिंताग्रस्त होता. त्याच्या कुटुंबातील कुणाला तरी या समस्येचा सामना करावा लागला आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

असेही म्हंटले जात आहे, की करोनाच्या संकटकाळात सुरैश रैना आयपीएल Suresh Raina IPL 2020 | खेळण्यास अजिबात उत्सुक नव्हता. त्याला आपल्या मुलांची ओढ लागली होती. 

काकांच्या मृत्यूनंतर अस्वस्थ

अशीही माहिती समोर आली आहे, की पठाणकोटमधील थारियाल गावात त्याच्या काकांच्या घरी दरोडा पडला होतात. त्याला विरोध करताना त्याचे ५८ वर्षीय काका अशोक कुमार यांचा खून झाला होता. त्यामुळे सुरेश रैनावर दु:खाचे सावट होते. त्याचे चार नातेवाईकही जखमी झाले आहेत. ही घटना १९-२० ऑगस्टदरम्यान घडली होती. 

अर्थात, त्याच्या माघारीचे हे एकमेव कारण नसावे, असे सूत्रांनी सांगितले. ही घटना घडली त्या वेळी सुरेश रैना चेन्नईत होता. मात्र, त्या वेळी त्याचं लक्ष क्रिकेटवर अजिबातच नव्हतं. करोनामुळे आयपीएल संकटात नसली तरी सीएसके ‘कोविड-19 हॉटस्पॉट’ झाली आहे. बीसीसीआयसाठीही ही घटना चिंताजनक आहे. 

एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘जर एका आयपीएल संघातच १३ जण पॉझिटिव्ह असतील तर ते गंभीर आहे. सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, या घटनेने इतर विदेशी खेळाडू भीतीच्या सावटाखाली येतील. कारण करोनाच्या संकटकाळात विदेशी खेळाडू खूप सतर्क असतात.’’

[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ post_offset=”8″ include_category=”65,87″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!