म्हणून साक्षी आणि मीराबाईला अर्जुन पुरस्कार नाही!

Follow us
[jnews_footer_social social_icon=”rounded”]देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारांच्या यादीतून पहिलवान साक्षी मलिक आणि वेटलिफ्टिंगची खेळाडू मीराबाई चानू Mirabai Chanu | यांना यंदाच्या अर्जुन पुरस्कारातून वगळण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाने शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 रोजी हा निर्णय घेतला आहे.
क्रीडा मंत्रालयाने 21 ऑगस्ट रोजी एकूण 27 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना पुरस्काराच्या यादीतून वगळल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
क्रीडा मंत्रालयाने पाच खेळाडूंची खेलरत्न पुरस्कार देण्याची शिफारस यापूर्वीच केली होती. त्यांची नावे यादीत कायम ठेवत खेलरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यातच न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) मुकुंदकम शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी 29 खेळाडूंची नावे क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली होती.
साक्षी, मीराबाईला वगळण्याचा निर्णय क्रीडामंत्र्यांचा
अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna award) निवडलेल्या यादीत रिओ ऑलिम्पिकची कांस्य पदकविजेती पहिलवान साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि 2017 मध्ये जागतिक भारतोलन चॅम्पियन मीराबाई चानू यांच्याही नावांचा समावेश होता.
मात्र या दोन्ही खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करायचे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय क्रीडामंत्री किरेने रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आला होता. क्रीडामंत्र्यांनी साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना अखेर वगळण्याचा निर्णय घेतला.
साक्षी, मीराबाईला वगळण्यामागचे कारण
साक्षी (Sakshi) आणि मीराबाई Mirabai | या दोघींची नावे अर्जुन पुरस्कारांच्या यादीत आल्यापासूनच क्रीडा मंत्रालयावर टीका होत होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या दोन्ही खेळाडूंना यापूर्वीच देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
जर सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार मिळाला असेल तर या खेळाडूंना त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा अर्जुन पुरस्काराची Arjuna award | गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत होता.
साक्षीला 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, तर मीराबाईने 2018 मध्ये जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्याबद्दल खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळेच या दोन्ही खेळाडूंना अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
यंदाचे खेलरत्न मिळविणारे पाच खेळाडू
यंदा खेलरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, पहिलवान विनेश फोगाट, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही नावे जाहीर केली.
यंदा प्रथमच व्हर्च्युअल पुरस्कार वितरण
करोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. नियोजित तारखेप्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय क्रीडादिनी- 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.
असे असले तरी इतिहासात प्रथमच हे पुरस्कार वितरण व्हर्च्युअल होणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात आयोजित केला जात होता.
पुरस्कारासाठी चार वर्षांच्या कामगिरीचा विचार
अर्जुन व खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंच्या गेल्या चार वर्षांच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे.
मनिका बत्रावरही आक्षेप
पुरस्कार आणि वाद हे समीकरणच झाले आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारही याला अपवाद नाहीत. मनिका बत्राला खेलरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केल्यानेही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मनिकाने 2018 मध्ये गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. केवळ या एका कामगिरीच्या आधारावर तिची अर्जुन पुरस्कारासाठी केलेली शिफारस अनेकांना रुचलेली नाही.
कारण राष्ट्रकुल स्पर्धेनंतर तिने कोणतीही उल्लेखनीय कामगिरी केलेली नाही. त्यामुळे जागतिक क्रमवारीत ती 63 स्थानावर घसरली आहे. असे असतानाही क्रीडा मंत्रालयाने तिच्या नावाची शिफारस केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राणी रामपालवरही प्रश्न
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आल्याने अनेकांनी टीका केली आहे. अर्थात, तिच्यामुळेच भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला आहे.
एवढेच नाही तर तिच्याच नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने 2019 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. मात्र, ही सांघिक कामगिरी असून, त्यासाठी राणी रामपालचेच नाव अर्जुन पुरस्कारासाठी का निवडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सारिका काळेचे कौतुक
शीतकालीन ऑलिम्पिकचा खेळाडू शिवा केशवनची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाचे कौतुकही होत आहे. शिवाने 1998 ते 2018 पर्यंत सहा वेळा शीतकालीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकेही जिंकली आहेत.
खो-खोचे पुनरागमन
क्रीडा मंत्रालयाने देशी खेळांनाही मान्यता दिली आहे. यापूर्वीही खो-खोचा क्रीडा पुरस्कारांमध्ये समावेश होता. मात्र, नंतर तो रद्द करण्यात आला होता. मोठ्या कालखंडानंतर खो-खोने पुरस्कारांच्या यादीत वापसी केली आहे.
त्यामुळे अर्जुन पुरस्काराच्या यादीत महाराष्ट्राची खो-खोपटू सारिका काळे हिला स्थान मिळाले आहे.
[table id=20 /] [table id=21 /] [table id=22 /] [table id=23 /] [table id=24 /]
One Comment