All Sportssports newsTennis

Roger Federer- ‘फेडएक्स’चा Tennis प्रवास थांबला…

रॉजर फेडरर- ‘फेडएक्स’चा प्रवास थांबला…

महान खेळाडू रॉजर फेडरर (Roger Faderer) याने 15 सप्टेंबर 2022 रोजी Tennis मधून निवृत्तीची घोषणा केली. त्याची निवृत्ती अनपेक्षित नव्हती, पण अपेक्षितही नव्हती. वयाच्या चाळिशीनंतरही त्याचा फॉर्म अगदीच काही ढासळलेला नव्हता. तीच चपळता, तोच जोश… त्यामुळे इतक्यात काही तो निवृत्त होण्याची चिन्हे नव्हती. मात्र, या स्विस वस्तादाने थांबण्याचा निर्णय घेतला. ‘फेडएक्स’ या टोपणनावाने ओळखला जाणारा रॉजर फेडरर अखेरची लेव्हर कप स्पर्धा खेळेल. त्यानंतर तो पुन्हा कोर्टवर दिसणार नाही. मात्र, त्याच्या आठवणी सतत जाणवत राहतील…

[jnews_element_embedplaylist scheme=”dark” playlist=”https://www.youtube.com/watch?v=40Qur4HijSM&t=43s” column_width=”4″]

पल्या निष्णात खेळामुळे ‘फेडएक्स’चं क्रीडाविश्वावर गारूड होतं. साधारणपणे कोणताही खेळाडू वयाच्या पस्तिशीपर्यंत खेळत असतो. मात्र, लिएंडर पेससारखे बोटावर मोजण्याइतके काही खेळाडू अपवादात्मक असतात. त्यापैकी रॉजर फेडरर एक. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही टेनिसमध्ये अंतिम फेरी गाठणारा रॉजर फेडरर हार मानणारा खेळाडू नव्हताच. मात्र, कुठे थांबायचं, याचा अंदाज खेळाडूलाच असतो. रॉजर फेडररला तो अंदाज आला. लेव्हर कप टेनिस स्पर्धेनंतर त्याने अखेर स्पर्धात्मक टेनिसचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला.

‘फेडएक्स’च्या (Roger Federer) निवृत्तीने Tennis मधील एका युगाचा अखेर होईल. कारण गेल्याच आठवड्यात त्याच्या पिढीतील सेरेना विल्यम्सनेही अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेद्वारे निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 2021 च्या विम्बल्डन स्पर्धेनंतर फेडरर टेनिस कोर्टवर परतला नाही. 41 वर्षीय फेडररने 20 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत.

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सेंटर कोर्टला जुलै 2022 मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त या ग्रँडस्लॅम स्पर्धेने हयात असलेल्या आपल्या सगळ्या विजेत्या टेनिसपटूंना निमंत्रित करण्यात आले होते. ही स्पर्धा आठ वेळा जिंकणारा रॉजर फेडररही या निमंत्रितांमध्ये होताच. पायाच्या दुखापतीवर उपचार घेत असल्याने त्याने 2022 या मोसमातल्या विम्बल्डन स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. जगभरातील निमंत्रितांमध्ये रॉजर फेडरर याने आवर्जून नमूद केले, की ‘मला या विम्बल्डन स्पर्धेच्या कोर्टवर पुन्हा खेळण्याची आस आहे.’ त्याच वेळी आपण स्विस इंडोअर स्पर्धेत खेळणार असल्याचेही फेडररने जाहीर केले होते. मात्र दुखापतीतून सावरण्यासाठी लागणारा वेळ, वाढते वय यामुळे फेडररने स्पर्धात्मक टेनिस थांबविण्याचा निर्णय घेतला. तसे ट्वीट करीत फेडररने संपूर्ण जगापुढे निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. पुढील आठवड्यात रंगणारी लेव्हर कप स्पर्धा फेडररची अखेरची एटीपी स्पर्धा असेल. लेव्हर कप ही सांघिक स्पर्धा असून, या स्पर्धेचे आयोजन फेडररचीच व्यवस्थापन कंपनी करते.

सात जुलै 2021 रोजी फेडरर व्यावसायिक खेळाडू म्हणून अखेरच्या सामन्यात खेळला. विम्बल्डन स्पर्धेच्या सेंटर कोर्टवर झालेल्या या उपांत्यपूर्व लढतीत हुबर्ट हुर्काझकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर लगेचच फेडररच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया झाली.

निरोप घेताना…

‘तुम्ही सगळेच (पाठीराखे, मीडिया) गेल्या तीन वर्षांतील माझा संघर्ष जाणता. गेल्या दीड वर्षांत दुखापती, शस्त्रक्रिया यांची आव्हाने समोर उभी ठाकली होती. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करण्याचा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला. मात्र मला माझ्या क्षमता, मर्यादा ठाऊक आहेत. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, एवढे या खेळाने मला भरभरून दिले. मी आता 41 वर्षांचा झालो आहे. मलाही कळते की, कुठे थांबायचे आहे. पुढील आठवड्यात लंडनला रंगणारी लेव्हर कप ही स्पर्धा माझ्या कारकिर्दीतील अखेरची एटीपी स्पर्धा असेल. यापुढेही मी खूप टेनिस खेळणार आहे. मात्र ग्रँडस्लॅम किंवा एटीपी स्पर्धांमध्ये मी नसेन.’ निरोप घेण्यापूर्वी रॉजर फेडरर याची ही भावनिक पोस्ट टेनिसप्रेमींना सद्गदित करून गेली.

Roger Federer याची Tennis विश्वातील कामगिरी

  • 20 ग्रँडस्लॅम : वीस ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या फेडररच्या पुढे आता फक्त नदाल (22) आणि जोकोविच (21). 1,251 लढती जिंकल्या. एटीपी टूरच्या 103 विजेतीपदे पटकावली.
  • 310 आठवडे अव्वल : एटीपी रँकिंगमध्ये एकूण 310 आठवडे अव्वल क्रमांकावर. 2 फेब्रुवारी 2004 ते 8 ऑगस्ट 2008 असे सलग 237 आठवडे पहिला क्रमांक राखला.
  • खेळाडूंच्या कौन्सिलचे अध्यक्षपद : 2008 ते 2014 आणि 2019 ते 2022 या कालावधीत एटीपीच्या खेळाडूंच्या कौन्सिलचे अध्यक्षपद भूषविले. खेळाडूंची बक्षीस रक्कम वाढावी यासाठी पाठपुरावा केला.
  • एटीपी फायनल्स : स्वित्झर्लंडच्या बॅसेलचा रहिवासी असलेल्या फेडररने मानाची एटीपी फायनल्स ही स्पर्धा विक्रमी सहा वेळा जिंकली आहे. एटीपीची 40 बक्षिसे जिंकली.
  • एकाच मोसमात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धेत तीन वेळा अंतिम फेरी : एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत फेडरर तीन वेळा पोहोचला आहे. अशी कामगिरी त्याने 2006, 2007 आणि 2009 मध्ये केली आहे.
  • सर्वाधिक वयाचा विश्व क्रमवारीत अव्वल : जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू. वयाच्या 36 व्या (36 वर्षे, 320 दिवस) वर्षापर्यंत अव्वल.
  • विम्बल्डन स्पर्धेत आठ वेळा जेता : विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे सर्वाधिक आठ वेळा जेतेपद पटकावले आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीचे 100 सामने जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू.

सेरेना म्हणाली, ‘निवृत्ती क्लबमध्ये स्वागत!’

‘फेडरर, तुझे निवृत्ती क्लबमध्ये स्वागत…!,’ अशा शब्दांत अमेरिकेची Tennis Star सेरेना विल्यम्सने स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर (Roger Federer) याच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर फेडररबद्दल अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. वय हा केवळ आकडा आहे, हे फेडररने वेळोवेळी आपल्या खेळातून दाखवून दिले. यानंतर या वर्षीच्या विम्बल्डनमध्येही फेडररने पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे फेडरर तडकाफडकी निवृत्ती जाहीर करील, यावर कोणाचाही विश्वास नव्हता. ‘मला हे सांगण्याचा आणखी चांगला मार्ग हवा होता. मात्र, तू अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. अर्थात, तुझ्या कारकिर्दीप्रमाणे तू हे कामही लीलया पार पाडेल. मी नेहमीच तुझ्याकडे बघत आले आणि नेहमीच तुझे कौतुक वाटले. आपल्या वाटा नेहमीच सारख्या राहिल्या होत्या. तू अगणित, असंख्य लोकांना प्रेरणा दिली. अगदी माझ्यासह. तुझे हे योगदान आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुझे कौतुक आहेच. भविष्यात तू काय करणार, याची उत्सुकताही आहे. निवृत्त लोकांच्या क्लबमध्ये तुझे स्वागत आहे,’ अशी भावनिक पोस्ट सेरेनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सेरेनानेही लवकरच निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. महिला एकेरीत सेरेनाच्या नावावर 23 ग्रँड स्लॅम विजेतीपदे आहेत.

Roger Federer च्या Tennis प्रवासातील शिखरे

  • 20 एकूण ग्रँड स्लॅम
  • 103 एटीपी टूर किताब
  • 28 एटीपी मास्टर्स किताब
  • 06 एटीपी फायनल्स
  • 01 ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्ण (2008)
  • 03 होपमन कपची विजेतीपदे
  • 310 एटीपी क्रमवारीत 310 आठवडे अव्वल
  • 71 हार्ड कोर्टवरील स्पर्धेतील विजेतीपदे

रॉजर फेडरर टेनिसस्पर्धात्मक टेनिसमध्ये परतण्यासाठी बरीच मेहनत घेतली. मात्र, मला माझ्या शरीराची क्षमता अन् मर्यादा माहीत आहे. गेल्या 24 वर्षांत मी दीड हजारावर सामने खेळलो. या खेळाने मला भरभरून दिलं. आता कुठं, केव्हा थांबायचं हे मला कळायला हवं. त्या आकलनानंतर मी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, एवढे या खेळाने मला भरभरून दिले. मी आता 41 वर्षांचा झालो आहे. मलाही कळते की, कुठे थांबायचे आहे. लेव्हर कप ही माझ्या कारकिर्दीतील अखेरची एटीपी स्पर्धा असेल.

Roger Faderer, Tennis

रॉजर फेडरर टेनिसप्रिय रॉजर, माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी… हा दिवस कधीच येऊ नये, अशी माझी इच्छा होती. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आणि जगभरातील क्रीडा क्षेत्रासाठीसुद्धा हा एक दु:खद दिवस आहे. इतकी वर्षे तुझ्यासोबत घालविणे आनंददायी तर आहेच; शिवाय हा माझा बहुमान आणि विशेषाधिकारही आहे, असे मी समजतो. या काळात टेनिस कोर्टवरील आणि कोर्टच्या बाहेरीलसुद्धा अनेक आठवणी आहेत. भविष्यातही आपण अनेकदा एकत्र येऊ, आपल्याला आणखी बरेच काही करायचे आहे.

– Rafael Nadal, Tennis

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=1VS-8bmQJMo” column_width=”4″]

दिग्गज टेनिसपटूंच्या भावना

रॉजर फेडरर टेनिसहा चॅम्पियन्सचा चॅम्पियन आहे. त्याच्याकडे त्याच्या पिढीतील सर्वात परिपूर्ण खेळ आहे. आपल्या चपळतेने आणि शक्तिशाली टेनिसने जगभरातील हजारो क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. त्याची कारकीर्द ऐतिहासिक राहिली आहे. जी नेहमी स्मरणात राहील.

– बिली जीन किंग, अमेरिकेच्या माजी टेनिसपटू


रॉजर फेडरर टेनिसमाझ्या आदर्श खेळाडूंपैकी रॉजर एक आहे. माझ्यासाठी तो प्रेरणास्रोत आहे. या खेळासाठी तू जे काही केले आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला अजूनही तुझ्यासोबत खेळायचे आहे. भविष्यातील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.

– कार्लोस अल्कराझ, अग्रमानांकित स्पेनचा टेनिसपटू


रॉजर फेडरर टेनिसमी त्याला काही वर्षांपूर्वीच थांबण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या स्तरावरील अनेक टेनिसपटूंना चाळिशीत असा खेळ करता येत नाही; पण त्याला नेहमीच स्वतःला आव्हान देण्यात रस होता. अखेर पंधरापेक्षा जास्त सामने खेळून त्याने थांबण्याचा निर्णय घेतलाच.

– टॉनी गॉडसिक, फेडररचा एजंट


चीअर्स रॉजर. अनेक आठवणींसाठी तुला धन्यवाद. तुझ्यासोबत वेळ आणि अनुभव शेअर करता आला, हा माझा सन्मानच आहे. अनोळखी होऊ नको, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचा माजी टेनिसपटू <strong>अँडी रॉडिक याने व्यक्त केली, तर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रॉड लेव्हर म्हणाला, “रॉजर प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद. लवकरच भेटू. रॉकेट!

[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!