Sports Interview

National sports awards committee

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीत सेहवाग, सरदारसिंग

नवी दिल्ली ः राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाने 31 जुलै 2020 रोजी निवड समिती National sports awards committee | जाहीर केली आहे. या समितीत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि हॉकी संघाचे माजी कर्णधार सरदारसिंग यांचा समावेश आहे.

अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या या प्रतिष्ठेच्या क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडून समिती जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. अखेर 31 जुलैला ही समिती National sports awards committee | जाहीर करण्यात आली.

समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मुकुंदकम शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समिती सदस्यांमध्ये माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, सरदारसिंग (हॉकी), मोनालिसा बरूआ मेहता (टेबल टेनिस), दीपा मलिक (पॅरा अॅथलेटिक्स) आणि वेंकटेशन देवराजन (बॉक्सिंग) यांचा समावेश आहे.

याशिवाय प्रसिद्ध क्रीडा समालोचक मनीष बटाविया, क्रीडा पत्रकार अलोक सिन्हा आणि नीरू भाटिया यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महानिदेशक संदीप प्रधान, क्रीडा विभागाचे संयुक्त सचिव एल. एस. सिंह आणि टारगेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राजागोपालन हेदेखील समितीत असतील.

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी समितीच्या अध्यक्षांना दोन अतिरिक्त सदस्यही नियुक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र हे सदस्य द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त असावेत, ही अट आहे. ही समिती राजीव गांधी खेलरत्न Rajiv Gandhi Khel Ratna |, द्रोणाचार्य पुरस्कार Dronacharya Awards |, अर्जुन पुरस्कार Arjuna Awards |, ध्यानचंद पुरस्कार Dhyan Chand Awards|, राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी विजेत्यांची निवड करेल.

हे पुरस्कार 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी प्रदान केले जातात.

अशी आहे समिती


अध्यक्ष

  • मुकुंदकम शर्मा (Mukundakam Sharma ), निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय

सदस्य

  • वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), माजी क्रिकेटपटू

  • सरदारसिंग(Sardar Singh), माजी कर्णधार, भारतीय हॉकी संघ

  • मोनालिसा बरुआ मेहता (Monalisa Baruah Mehta), टेबल टेनिस

  • दीपा मलिक (Deepa Malik), पॅरा अॅथलेटिक्स

  • वेंकटेशन देवराजन (Venkatesan Devarajan), बॉक्सिंग

  • संदीप प्रधान (Sandip Pradhan), महानिदेशक, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)

  • एल. एस. सिंह (LS Singh), संयुक्त सचिव, क्रीडा विभाग

  • कमांडर राजेश राजागोपालन (Rajesh Rajagopalan), मुख्य कार्यकारी अधिकारी, (TOPS)

  • मनीष बटाविया (Manish Batavia), क्रीडा समालोचक

  • अलोक सिन्हा (Alok Sinha), क्रीडा पत्रकार

  • नीरू भाटिया (Neeru Bhatia)

हेही वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!