इतिहासात प्रथमच आठ दिव्यांगांचा गौरव

Your Content Goes Here
पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थांगवेलू याला खेलरत्न हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार National Sports Awards 2020 | जाहीर झाला आहे. इतिहासात प्रथमच थांगवेलूसह आठ जणांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत.
देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार मिळविणारा मरियप्पन भारतातील तिसरा पॅरा खेळाडू आहे.
त्याच्याआधी माजी पॅरालिम्पिक विजेता देवेंद्र झाझरिया आणि दीपा मलिक यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
National Sports Awards 2020 | पॅरा खेळाडू संदीप चौधरी, पॅरा नेमबाज मनीष नरवाल आणि पॅरा जलतरणपटू सुयश जाधव यांनाही अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने २१ ऑगस्ट २०२० रोजी ही घोषणा केली.
आतापर्यंत एकूण ३० पॅरा खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. १९६१ पासून सुरू झालेल्या या पुरस्कार योजनेत आतापर्यंत एकूण ४७ पॅरा खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पॅरा बॅडमिंटन प्रशिक्षक गौरव खन्ना यांच्यामुळे गेल्या काही वर्षांत भारतीय पॅरा बॅडमिंटनने यशाचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे यंदा त्यांचं नाव द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट झालं.
भारतीय पॅरा पॉवरलिफ्टिंगचे संस्थापक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक विजय मुनीश्वर यांना क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
National Sports Awards 2020 | पुरस्कारांच्या यादीत रंजीत कुमार आणि सत्यप्रकाश तिवारी (ध्यानचंद) यांचाही समावेश करण्यात आला आहे.
‘‘हा सन्मान देशातील पॅरालिम्पिक चळवळीला दिशा देण्यासाठी प्रेरणादायी आहे. आमच्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना पॅरालिम्पिक स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी हे पुरस्कार अगदी योग्य वेळी आले आहेत. पुरस्कार मिळविणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा.
– दीपा मलिक, अध्यक्षा, भारतीय पॅरालिम्पिक समिती
चोवीस वर्षीय मरियप्पनने जेव्हा २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. उंचउडीत ‘टी ४२’ वर्गात त्याने ही कामगिरी केली होती.
गेल्या वर्षी २०१९ मध्ये दुबईमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते.
अर्जुन आणि पद्म हे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळविणाऱ्या मरियप्पनसाठी हा खेलरत्न पुरस्कार टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी प्रेरक ठरेल.
संदीप चौधरीने २०१८ मध्ये इंडोनेशियात झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्यामुळेच भारताच्या खात्यात पहिले पदक जमा झाले.
२०१९ मध्ये दुबईत पुरुष गटातील भालाफेक ‘एफ ६४’ गटात स्वत:चाच विक्रम मोडीत काढत विश्व चॅम्पियन झाला. टोकियो ऑलिम्पकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी तो भारताचा प्रबळ दावेदार आहे.
National Sports Awards 2020 | अठरा वर्षीय नरवाल अर्जुन पुरस्कार मिळविणारा दुसरा पॅरा नेमबाज असेल. यापूर्वी १९९७ मध्ये नरेश कुमारने हा पुरस्कार मिळविला होता. या पुरस्कारामुळे निश्चितच या तरुण खेळाडूला प्रेरणा मिळेल.
नरवालने गेल्या तीन वर्षांत १९ राष्ट्रीय, तर १७ आंतरराष्ट्रीय पदके जिंकत सनसनाटी निर्माण केली होती.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे मानकरी
खेलरत्न पुरस्कार : थांगवेलू मरियप्पन (पॅरा अॅथलीट) Mariyappan Thangavelu |
अर्जुन पुरस्कार ः संदीप चौधरी (पॅरा अॅथलीट), मनीष नरवाल (पॅरा नेमबाज), सुयश जाधव (पॅरा जलतरणपटू)
द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार : विजय मुनीश्वर (पॅरा पॉवरलिफ्टिंग)
ध्यानचंद पुरस्कार : जे रंजित कुमार (पॅरा अॅथलेटिक्स), सत्यप्रकाश तिवारी (पॅरा बॅडमिंटन)
दिव्यांगांना सहानुभूती नको, सन्मान हवा!
मध्य प्रदेशातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिव्यांग जलतरणपटू सतेंद्रसिंह लोहिया याला प्रतिष्ठित तेन्झिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार-२०२० जाहीर झाला आहे.
करोना महामारीमुळे यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा National Sports Awards 2020 | राष्ट्रीय क्रीडादिनी २९ ऑगस्टमध्ये व्हर्च्युअल होणार आहे.
हा पुरस्कार मिळविणारा सतेंद्रसिंह देशातील पहिलाच दिव्यांग खेळाडू आहेत. इंदूरमध्ये व्यावसायिक कर विभागात कार्यरत असलेला सतेंद्र म्हणाला, ‘‘मी माझ्या अडचणींनाच ताकद बनवले. दिव्यांगांना सहानुभूती नको, तर मदत आणि सन्मानाची गरज आहे.’’
National Sports Awards 2020 | ग्वाल्हेर जिल्ह्यात ग्रामगाता येथील रहिवासी असलेले सतेंद्र याचे वडील गयाराम लोहिया सध्या ग्वाल्हेरमध्ये सुरक्षा रक्षक आहेत.
अमेरिकेतील ४२ किलोमीटरची केटलिना खाडी सतेंद्र याने अवघ्या ११:३४ तासांत पार केली होती. अशी कामगिरी करणारा सतेंद्र आशियातील पहिला जलतरणपटू आहे.
दिवसा वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी सतेंद्र याने ही खाडी रात्रीच पार केली. ही खाडी पोहणे हेच त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान होते.
Very nice