NADA bans two-year ban on basketball player Bhamra | बास्केटबॉलपटू भामरावर दोन वर्षाची बंदी
बास्केटबॉलपटू भामरावर दोन वर्षाची बंदी
नवी दिल्ली, 24 डिसेंबर
एनबीए संघातील पहिला भारतीय खेळाडू सतनामसिंग भामरा (Satnam Singh Bhamra) याच्यावर राष्ट्रीय उत्तेजक द्रव चाचणी प्रतिबंधक संस्थेने (NADA) दोन वर्षांची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी डोपिंग चाचणीत तो दोषी आढळल्याने नाडाच्या (NADA) शिस्तपालन समितीने 24 डिसेंबर 2020 रोजी ही कारवाई केली. NADA bans two-year ban on basketball player Bhamra
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 25 वर्षीय भामरावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान त्याची उत्तेजक द्रव चाचणी घेण्यात आली होती.
भामरा एनबीएच्या संघात 2015 मध्ये सहभागी झाला होता. त्याने नाडाच्या आरोपांचे खंडन केले होते. मात्र, नाडाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर कारवाई करण्याचे त्याच वेळी संकेत दिले होते.
नाडाने गुरुवारी ट्वीट केले, की बास्केटबॉलपटू सतनामसिंग भामरा चाचणीच्या वेळी हिगेनामाइन बिटा-2-एगोनिस्टचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळला. नाडाच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे.
इसका मतलब है कि भामरा का निलंबन अगले साल 19 नवंबर को समाप्त होगा क्योंकि उनका प्रतिबंध 2019 में इसी दिन से शुरू हुआ था। नाडा ने कहा कि भामरा को हिगेनामाइन का पॉजिटिव पाया गया है जिसे विश्व डोपिंग रोधी एजेंसी (वाडा) की 2017 में प्रतिबंधित पदार्थों की सूची में शामिल किया गया था और यह टूर्नामेंट के अंदर और बाहर हर समय प्रतिबंधित है।
याचा अर्थ भामरावर आता पुढील वर्षी 19 नोव्हेंबरपर्यंत निलंबन असेल. कारण 2019 पासून याच दिवशी त्याच्यावर निर्बंधाची कारवाई झाली होती. 2017 मध्ये वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीने (डब्लूएडीए) बंदी घातलेल्या पदार्थांच्या यादीमध्ये हिगॅमेनाइनचा समावेश आहे. हा उत्तेजक द्रवपदार्थ घेतल्याप्रकरणी भामरा दोषी आढळला होता. नाडाने स्पष्ट केले, की या उत्तेजक द्रवपदार्थावर स्पर्धेच्या आत आणि बाहेर बंदी आहे.
पाच वर्षांपूर्वी डालास मेवरिक्स संघाने त्याला एनबीए ड्राफ्टमध्ये सहभागी करून घेतल्याने भामराने इतिहास रचला होता. त्यानंतर तो डालास मेवरिक्सच्या टेक्सास लिजेंड्ससोबत दोन वर्षांपर्यंत डेव्हलपमेंट लीग खेळला होता.
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]