All SportsCricket

जयसूर्या-मुरलीधरनचा हा विश्वविक्रम मोडणे कठीण!

श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी ४०८ सामने एकत्र खेळले असतानाही एकमेकांसोबत फलंदाजी केलेली नाही. हा एक प्रकारे विश्वविक्रम असून, अद्याप तो कोणालाही मोडता आलेला नाही. विशेष म्हणजे या विक्रमाच्या जवळपास एकही फलंदाज नाही.

श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन

ला विज्ञान फारसं कळत नाही, पण पृथ्वीवरील काही ग्रहणं शंभर वर्षांतून एकदा तरी पाहण्याचे दुर्मिळ योग येतात. म्हणजे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी जेव्हा सरळ रेषेत येतात तेव्हा अशी काही ग्रहणं पाहायला मिळतात. मग ते सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण. मात्र क्रिकेटविश्वात एकाच संघात खेळूनही काही खेळाडू असेही आहेत, ज्यांची फलंदाजीसाठी कधीच जोडी जमलेली पाहायला मिळालेली नाही. आता हेच बघा ना, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन हे दोन्ही खेळाडू एकाच संघात थोडीथोडकी नाही, तर तब्बल 408 सामने खेळले आहेत. मात्र, एकदाही ते एकमेकांच्या साथीने फलंदाजी करू शकलेले नाहीत. म्हणजे खेळपट्टीवर एका सरळ रेषेत उभे राहिलेले कुणीच पाहिलेले नाहीत. कारण तसा योगच आलेला नाही. क्रिकेटविश्वातील हा अजब विश्वविक्रम नोंदला गेलेला आहे. आता हीच स्थिती इतर संघांतही आहे. मात्र, ते या श्रीलंकन जोडीच्या आसपासही नाहीत. आपल्या भारतीय क्रिकेटबाबतच बोलायचे झाले तर भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघे आतापर्यंत ९८ सामने सोबतीनेच खेळले आहेत. मात्र, त्यांची फलंदाजीत कधीच जोडी जमली नाही. रोहितची फलंदाजी अखेरपर्यंत टिकली तरच हे शक्य आहे किंवा बुमराहने तरी वरच्या क्रमांकावर खेळावे. मात्र, कधी तरी ते सोबतीने फलंदाजी करतील अशी अपेक्षा बाळगणाऱ्या क्रिकेटप्रेमींना सध्या तरी त्यांना एकत्र फलंदाजी करताना पाहायला मिळालेले नाही. क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आणि गोलंदाज असतील त्यांना एकमेकांसोबत कधीच फलंदाजी करता आलेली नाही. यात श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरनचे नाव घेता येईल. त्यांनी ४०८ सामने एकत्र खेळले असतानाही एकमेकांसोबत फलंदाजी केलेली नाही. हा एक प्रकारे विश्वविक्रम असून, अद्याप तो कोणालाही मोडता आलेला नाही.

रोहितबुमराहही मागे


भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आतापर्यंत 98 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. मात्र, एकमेकांच्या साथीने फलंदाजी करण्याचा योग एकदाही येऊ शकलेला नाही. हे सांगायचा मुद्दा म्हणजे, श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज सनथ जयसूर्या आणि फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन या दोघांनीही 408 सामने खेळले असून, एकदाही ते एकमेकांच्या साथीने खेळलेले नाहीत. त्यामुळे क्रिकेटविश्वात हा विश्वविक्रम नोंदला गेला आहे. सध्या हे दोन्ही खेळाडू निवृत्त आहेतसध्या जगभरात करोना विषाणू संसर्गाची महामारी असल्याने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. यातून विश्व सहिसलामत बाहेर पडल्यास पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होईल. त्या वेळी रोहितबुमराह ही जोडी शंभरपेक्षा अधिक सामने खेळतील. रोहित आणि बुमराह यांनी आतापर्यंत चार कसोटी, 55 वनडे आणि 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने सोबत खेळले आहेत. रोहित 2013 पासून सलामी फलंदाज म्हणून आपली भूमिका पार पाडत आहे, तर बुमराहने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत 128 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 42 वेळा फलंदाजी केली आहे. यातील 34 डावांत तो 11 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. जे 98 सामने रोहित आणि बुमराहने खेळले आहेत, त्यातील १०१ डावांत बुमराहला केवळ २३ डावांत फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे.गंमत म्हणजे, ज्या २३ डावांत बुमराहला खेळण्याची संधी मिळाली, त्या सर्व सामन्यांत रोहितची फलंदाजी ढेपाळलेली पाहायला मिळाली आहे. म्हणजे तो लवकर बाद झाला आहे. मोठी धावसंख्या रचण्यात वाकबगार असलेल्या रोहितला या २३ डावांत के‌वळ एक शतक आणि दोन अर्धशतकेच झळकावता आली आहेत. यातील १८ डावांत तर तो १५ धावांपेक्षा अधिक धावाही करू शकलेला नाही.

रोहितचहलही स्पर्धेत?


रोहितसोबत फलंदाजी करण्याची संधी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहललाही मिळालेली नाही. चहलसोबत आतापर्यंत तो 80 आंतरराष्ट्रीय सामने (47 वनडे, 33 टी20) खेळले आहेत. मात्र, या दोघांनाही एकदाही एकमेकांसोबत फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि चहल हे दोघेही आतापर्यंत ६४ सामने (39 वनडे, 25 टी20) खेळले असले तरी एकमेकांसोबत फलंदाजी करू शकलेले नाहीत. असे असले तरी एकमेकांसोबत फलंदाजी न करण्याचा विक्रम श्रीलंकेचा जयसूर्या आणि मुरलीधरन यांच्या नावावर कायम आहे. या दोघांनी एकूण 408 सामने (90 कसोटी, 307 एकदिवसीय आणि 11 टी20) खेळले आहेत. एवढे सामने खेळूनही या दोघांना एकमेकांसोबत फलंदाजी करण्याची संधी न मिळणे ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. जयसूर्याने करिअरची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली आहे. नंतर त्याने सलामीचा फलंदाज म्हणून आपली जागा पक्की केली. मुरलीधरनचे तसे नाही. तो सुरुवातीपासूनच तळातला फलंदाज राहिला आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये 10 व्या किंवा 11 व्या क्रमांकावरच फलंदाजी केली आहे. पाच डावांत तो आठव्या आणि 45 डावांत तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. या एकूण 408 सामन्यांपैकी 267 डावांत मुरलीधरनच्या वाट्याला फलंदाजी आली आहे. मात्र, या २६७ डावांत जयसूर्या लवकर बाद झाला आहे. त्यामुळेच मुरलीधरनला त्याच्यासोबत फलंदाजीची संधी मिळालेली नाही.

जयसूर्या मुरलीधरन यांची थोडक्यात चुकामूक!


काही असे प्रसंग आले होते, ज्या वेळी जयसूर्या खेळपट्टीवर असताना मुरलीधरनला फलंदाजीची संधी मिळाली असती. कसोटी सामन्यात ही संधी मिळू शकली असती. कारण मुरलीधरनने आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा जयसूर्या सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. मात्र, अशाही परिस्थितीत मुरलीधरनला जयसूर्यासोबत फलंदाजी करण्याची संधी मिळू शकली नाही हे विशेष. कारण मुरलीधरन तेव्हा 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. जयसूर्या झटपट बाद झाल्याने त्याला मुरलीधरनसोबत फलंदाजीत जोडी जमवता आलेली नाही. जयासूर्याबाबत बोलायचे झाले, तर मुरलीधरन संघात असताना त्याने 468 डाव खेळले आहेत. त्यात त्याने 15,964 धावा केल्या आहेत. यात 32 शतके आणि 87 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, तो जगातील अव्वल फिरकी गोलंदाजासोबत फलंदाजीत जोडी जमवू शकलेला नाही. जयसूर्याने मुरलीधरनच्या उपस्थितीत झालेल्या सामन्यांत तब्बल 39 जोड़ीदारांसोबत भागीदाऱ्या रचल्या आहेत. सर्वाधिक 219 वेळा मर्वन अटापट्टू आणि 101 वेळा रोमेश कालुविथरनासोबत जयसूर्याची जोडी यादगार ठरलेली आहे. गंमत पाहा, मुरलीधरनने कालुविथरनासोबत चार वेळा आणि अटापट्टूसोबत दोन वेळा फलंदाजी केली आहे; पण जयसूर्यासोबत फलंदाजी करण्याची संधी त्याला कधीच मिळाली नाही.

आता जयसूर्या आणि मुरलीधरनची फलंदाजीची अपेक्षा करताही येणार नाही. कारण त्यांचा अध्याय संपलेला आहे. मात्र, रोहित शर्माबुमराहसारख्या जोड्यांबाबतची ग्रहणं पाहण्याचे कदाचित योग येतीलहीतसे झाले तर तो खरोखर दुर्मिळ योग म्हणावा लागेल आणि नाहीच आला तर ते भविष्यात जयसूर्यामुरलीधरनचा विक्रम मोडू शकतील का, हेही पाहणे औत्सुक्याचे असेल. अर्थात, त्याला मोठा काळ ओसरण्याइतपत धैर्य ठेवावं लागेल.

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!