IPL 2020 spectator
आयपीएल टी-20 स्पर्धेचा मार्ग मोकळा झाल्याने बीसीसीआयचा जीव भांड्यात पडला आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (UAE) होण्याची शक्यता आहे. अमिराती क्रिकेट बोर्डाचे (Emirates Cricket Board) सचिव मुबाशशिर उस्मानी यांनी 31 जुलै 2020 रोजी सांगितले, की जर सरकारने मंजुरी दिली तर आम्ही स्टेडियममध्ये 30 ते 50 टक्के प्रेक्षकांना IPL 2020 spectator | परवानगी देऊ.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) तारखा जाहीर करताना आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी सांगितले, की 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत होणारी टी-20 स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात परवानगी देण्याचा निर्णय IPL 2020 spectator | संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारद्वारे घेतला जाईल.
हेही वाचा
80-90 च्या दशकात आयपीएल असती तर…
बीसीसीआय तोडणार का चिनी कंपनीशी करार
आयपीएल स्पर्धेच्या तारखांची घोषणा तर केली, पण भारतीय क्रिकेट बोर्डाला (बीसीसीआई) अद्याप भारत सरकारची परवानगी मिळालेली नाही. अर्थात, संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा होणार हे जवळपास निश्चित आहे. IPL 2020 spectator |
उम्मानी यांनी दूरध्वनीवर सांगितले, ‘‘आयपीएल स्पर्धा आमच्या देशात होण्यासाठी फक्त बीसीसीआयकडून मंजुरी मिळायला हवी. ती मिळाली, की आम्ही आमच्या सरकारकडे प्रेक्षकांबाबतचा प्रस्ताव ठेवू.’’
उस्मानी म्हणाले, ‘‘या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आम्ही उत्सुक आहोत. मात्र हा पूर्णपणे सरकारचा निर्णय असेल. इथे प्रेक्षकांची संख्या साधारणपणे 30 ते 50 टक्केच असते आणि आम्हाला एवढ्याच संख्येची अपेक्षा आहे.’’
उस्मानी म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या सरकारच्या मंजुरीची अपेक्षा आहे. ’’
संयुक्त अरब अमिरातीत करोना महामारीमुळे सहा हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. या देशात करोनाचा प्रसार जवळपास नियंत्रित आहे.
संयुक्त अरब अमिरातीतच यंदाची नोव्हेंबर 2020 मध्ये होणारी दुबई रग्बी सेवन्स स्पर्धा करोना महामारीमुळेच रद्द करण्यात आली होती. यूएईला 1970 नंतर प्रथमच ही स्पर्धा रद्द करावी लागली आहे.
आयपीएलच्या सुरक्षेबाबत व्यक्त होणाऱ्या चिंतेबाबत ते म्हणाले, ‘‘यूएई सरकारने करोना रुग्णांची संख्या कमी करण्यात उत्तम उपाययोजना केल्या आहेत. आम्ही काही नियम आणि प्रोटोकॉलचे पालन करूनच सामान्य जीवन जगत आहोत.’’
उस्मानी म्हणाले, ‘‘अद्याप आयपीएलला वेळ आहे. तोपर्यंत आमच्या देशाची स्थिती नक्कीच उत्तम असेल.’’
2 Comments