या धावपटूवर गल्लोगल्ली भाजीपाला विकण्याची वेळ

कोरोना महामारीच्या संकटाचे भयावह coronavirus sports effect | परिणाम आता दिसू लागले आहेत. ज्या खेळावर करिअरचं स्वप्न पाहिलं त्याच खेळामुळे आज त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. झारखंडची खेळाडू गीता कुमारी अशाच संकटात सापडली आहे. तिच्यावर रामगड जिल्ह्यातील गल्लोगल्लीत भाजी विकण्याची वेळ आली आहे. coronavirus sports effect |
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हे समजल्यानंतर त्यांनी तातडीने तिची दखल घेतली आणि रामगड जिल्हा प्रशासनाने तिला 50 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. एवढेच नाही, तर अॅथलेटिक्समध्ये सराव करण्यासाठी तीन हजार रुपये तिला प्रतिमहिना मानधनही जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांना ट्विटरवरून गीता कुमारीच्या हलाखीच्या स्थितीची माहिती मिळाली. उदरनिर्वाहासाठी तिला गल्लोगल्ली भाजीपाला विकावा लागत असल्याचं समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने रामगडच्या उपायुक्तांना तिला आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले. यामुळे गीता कुमारीचे हाल थांबतीलही, पण देशभरात अशा किती तरी गीता कुमारी असतील, ज्यांची प्रशासनाला माहितीही नाही. coronavirus sports effect |
कोण आहे गीता कुमारी?
हजारीबाग जिल्ह्यातील आनंद महाविद्यालयात बीएच्या अंतिम वर्षात गीता कुमारी शिक्षण घेते. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला शिक्षण पुढे ठेवणे अवघड झालेच, शिवाय जगण्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकला. त्यामुळे नाइलाजाने तिला भाजीपाला विकावा लागत आहे. गीताने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आठ सुवर्णपदके जिंकली आहेत. तिने कोलकाता येथील स्पर्धेत एक रौप्य, तर एक कांस्य पदकही जिंकले होते.