Delhi vs punjab in IPL 2020 | दिल्लीचं पारडं जड
दिल्लीचं पारडं जड
[jnews_footer_social social_icon=”circle”]
रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेलसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांमुळे दिल्ली कॅपिटल्सचं पारडं किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचं पारडं जडच म्हणावं लागेल. Delhi vs punjab in IPL 2020 |
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रविवारी, 20 सप्टेंबर 2020 रोजी दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामना रंगणार आहे. Delhi vs punjab in IPL 2020 | हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या दोन्ही संघांचा यंदाच्या आयपीएलमधला हा दुसरा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांच कौशल्य पणास लागलेलं असेल.
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यांना भविष्यातील भारतीय संघाच्या कर्णधारच्या रूपाने पाहिले जात आहे.
एवढेच नाही, तर दोन्ही संघांचे प्रशिक्षक जागतिक स्तरावरील खेळाडू राहिले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांची मैदानावरील रणनीती बघण्यासारखी असेल.
किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू अनिल कुंबळे यांच्याकडून प्रेरणा घेऊ पाहतील, तर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू रिकी पाँटिंगच्या योजनांनुसार मैदानावर उतरतील, यात शंका नाही.
Delhi vs punjab in IPL 2020 | दोन्ही संघांत फलंदाजांची फळी जवळपास सारखीच आहे. मात्र, संयुक्त अरब अमिरातीत संथ खेळपट्ट्या आहेत. या खेळपट्ट्यांवर आर. अश्विन, मिश्रा आणि अक्षर ही तिकडी पंजाबच्या संघावर भारी पडू शकते.
फलंदाजांची फळी पाहिली तर दिल्ली कॅपिटल्समध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सुंदर मिलाफ आहे. यात पृथ्वी साव, अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन यांच्यासह वेस्ट इंडीजचा शिमरोन हेटमायरचा समावेश आहे.
ही फळी पाहिली तर भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (120 पेक्षा कमी स्ट्राइक रेट) याला कदाचित संधी मिळू शकणार नाही. संघाने त्याला राजथान रॉयल्सकडून आपल्याकडे खेचले होते.
Delhi vs punjab in IPL 2020 | किंग्स इलेव्हनजवळ ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल आणि स्वत: राहुलसारखे उत्तुंग फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत.
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 108 धावांची शतकी खेळी साकारत संघाला विजय मिळवून देणारा मॅक्सवेल याचा आत्मविश्वास बराच उंचावलेला असेल.
त्याने 2014 मध्ये जेव्हा आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळविण्यात आले होते, तेव्हा त्याने शानदार कामगिरी केली होती. मॅक्सवेलने त्या मोसमात 16 सामन्यांत 552 धावा केल्या होत्या.
किंग्ल इलेव्हनकडेही षटकारांचा बादशाह ख्रिस गेल आणि राहुल ही सलामीची जोडी दिल्लीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यानंतर मयंक अग्रवाल आहे.
दिल्ली कॅपिटल्स कॅगिसो रबाडाऐवजी डॅनियल सॅम्सला अंतिम संघात स्थान देऊ शकेल. कारण डॅनियलने बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. कदाचित यामुळे ईशांत शर्मालाही बाहेर बसावे लागू शकते.
Delhi vs punjab in IPL 2020 | किंग्स इलेव्हन पंजाबसाठी मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल, तर फिरकी गोलंदाजीची धुरा अफगाणिस्तानचा मुजीब जदरान याच्यावर असेल.
अश्विन गेल्या मोसमातील ‘मांकेडिंग’ वाद विसरून मिश्रासोबत जोडी जमवेल. मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये 157 विकेट आहेत. तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
Delhi vs punjab in IPL 2020 | गेल्या पाच सामन्यांत पंजाब संघाने चार सामने जिंकले आहेत. मात्र, दोन्ही संघांमध्ये सध्या तरी दिल्लीचं पारडं जड आहे.
दिल्ली कॅपिटल्स | किंग्स इलेव्हन पंजाब |
श्रेयस अय्यर (कर्णधार) |
लोकेश राहुल (कर्णधार) |
रविचंद्रन अश्विन | मयंक अग्रवाल |
शिखर धवन | शेल्डन कॉटरेल |
पृथ्वी साव | ख्रिस गेल |
शिमरोन हेटमायर | ग्लेन मॅक्सवेल |
कॅगिसो रबाडा | मोहम्मद शमी |
अजिंक्य रहाणे | मुजीब उर रहमान |
अमित मिश्रा | करुण नायर |
ऋषभ पंत (यष्टिरक्षक) |
निकोलस पानन (यष्टिरक्षक) |
इशांत शर्मा | जेम्स नीशम |
अक्षर पटेल | ईशान पोरेल |
संदीप लामिचाने | अर्शदीप सिंह |
किमो पॉल |
मुरुगन अश्विन |
डॅनियल सॅम्स |
कृष्णप्पा गौतम |
मोहित शर्मा |
हरप्रीत बरार |
एनरिच नोर्जे |
दीपक हुड्डा |
अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक) |
सिमरन सिंह (यष्टिरक्षक) |
आवेश खान |
सरफराज खान |
तुषार देशपांडे |
मनदीप सिंह |
हर्षल पटेल |
दर्शन नलकंडे |
मार्कस स्टोइनिस |
रवी बिश्नोई |
ललित यादव |
ख्रिस जॉर्डन |
जगदीश सुचित |
|
तजिंदर सिंह |
|
हार्डस विलजोन |
आजचा सामना (१९ सप्टेंबर २०२०) |
दिल्ली कॅपिटल्स |
विरुद्ध |
किंग्स इलेव्हन पंजाब |
वेळ : सायं. ७.३० |
ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम |
सामना कुठे पाहाल? |
Star Sports 1 | Star Sports 2 | Star Sports 1 (Hindi) |