• Latest
  • Trending

Coronavirus : आयपीएल क्रिकेटलाही बाधा!

March 13, 2020
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
Tuesday, May 30, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

Coronavirus : आयपीएल क्रिकेटलाही बाधा!

Mahesh Pathade by Mahesh Pathade
March 13, 2020
in coronavirus, Cricket
0
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email
ipl 2020,coronavirus,coronavirus in india,ipl,ipl 2020 coronavirus,coronavirus india,coronavirus update,coronavirus news,coronavirus outbreak,coronavirus in delhi,coronavirus pandemic,coronavirus effect on ipl,coronavirus effect on ipl criket,bcci on ipl,ipl 2020 news coronavirus,ipl news,ipl postpond for coronavirus,ipl 2020 postponed due to coronavirus,coronavirus in hindi,corona virus,india coronavirus, कोरोना विषाणू,कोरोना,कोरोना व्हायरस,कोरोनाविषाणू,करोना विषाणू,कोरोना बाधित,कोरोना आजार,केरळ,भारत,मुंबई विमानतळ,मंत्रिमंडळ बैठक,भारतीय विद्यार्थी,महाराष्ट्र,आयपीएल,विषाणू
Coronavirus : Indian Premier League

kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

इंडियन प्रीमियर लीग Indian Premier League | IPL | ही भारतातील व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा सध्या करोना विषाणूच्या विळख्यात सापडली आहे. मुंबई येथे २९ मार्चपासून ही स्पर्धा होणार होती. मात्र, सरकारने ही स्पर्धा प्रेक्षकांविना आयोजित करण्याची सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली आहे. करोनाच्या धास्तीने भारताने १५ एप्रिलपर्यंत कोणालाही व्हिसा मंजूर न करण्याचे धोरण स्वीकारल्याने परदेशी खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच ती स्थगित झाली. अखेर १५ एप्रिलपासून ही स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नेहमीपेक्षा स्पर्धेची लांबी कमी होण्याचे संकेत आहेत. त्याचे सूतोवाच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केले आहे. या स्पर्धेचा घटनाक्रम पाहिला तर या स्पर्धेला पाच मार्चपासूनच करोनाचे ग्रहण लागले आहे.

आयपीएल सामन्यांत कपात करण्याचा पर्याय

१४ मार्च : बीसीसीआय आणि आयपीएलच्या आठ फ्रँचाइजी संघमालकांमध्ये मुंबई येथे झालेल्या बैठकीत इंडियन प्रीमयर लीगच्या सामन्यांमध्ये Indian Premier League | कपात करण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. त्यामुळे संघमालकांमध्ये प्रचंड धाकधूक सुरू आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया यांना तर स्पर्धा केव्हा सुरू होईल याबाबतच साशंकता आहे. भारत सरकारने प्रवासबंदीवर निर्बंध लादल्यानंतर बीसीसीआयने तीन राज्यांत सामने घेण्यास नकार दिल्यानंतर आयपीएलचे सामनेही २९ मार्चऐवजी १५ एप्रिलपर्यंत निलंबित केले आहेत. याचबरोबर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिकाही रद्द केली होती. 

आयपीएल संघमालकांची बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणन सचिव जय शहा यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर नेस वाडिया यांनी सांगितले, ‘‘आम्ही कोणीही हे सांगू शकत नाही, की स्पर्धा केव्हा सुरू होईल. आम्ही दोन-तीन आठवड्यांनंतर त्याची समीक्षा करू. आशा आहे, की तोपर्यंत सर्व काही सुरळीत होईल.’’

संघमालकांच्या बैठकीत अनेक पर्यायांवर चर्चा झाली. बीसीसीआयच्या सूत्रांनी गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले, ‘‘संघमालक आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या बैठकीत सहा-सात पर्यायांवर चर्चा झाली. यात सामन्यांमध्ये कपात करण्याचाही एक पर्याय होता. सध्या आरोग्यासंबंधी प्राधान्याने उपाय करणे आवश्यक आहे. भारतात करोना विषाणूंचा संसर्ग ८० पेक्षा अधिक लोकांना झाला आहे. यात रोज नव्या रुग्णांची वाढ होत आहे. 

आयपीएलबाबत या पर्यायांवर सुरू आहे विचार

  1. सामन्यांत कपात
  2. संघांची विभागणी केवळ दोनच ग्रुप करून अव्वल स्थानावरील चार संघ प्लेऑफमध्ये खेळविणे
  3. रोज दोन सामने खेळविणे
  4. सर्व सामने केवळ दोनच केंद्रावर निश्चित करणे, तसेच खेळाडू, सहयोगी स्टाफ आणि टीव्ही प्रसारण संघाच्या सदस्यांचा वावर कमी करणे
  5. रिकाम्या स्टेडियममध्ये सर्व ६० सामने आयोजित करणे

या पर्यायांबरोबरच आणखी एका पर्यायाची चर्चा होती. ती म्हणजे ही स्पर्धा भारताबाहेर आयोजित करणे. मात्र, त्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. आयपीएल ही संपूर्ण व्यावसायिक स्पर्धा आहे. त्यात अनेक कंपन्या, प्रायोजकांनी पैसा गुंतवला आहे. जर प्रेक्षकांविना, तसेच सामन्यांमध्ये कपात करून स्पर्धा आयोजित केली तर यात प्रचंड नुकसान होईल. मात्र, वाडिया यांनी सांगितले, की या स्थितीत बीसीसीआय, आयपीएल आणि स्टार स्पोर्ट्सने आम्ही नुकसानीचा विचार करीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. बैठकीत मानवाचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे, नंतर आर्थिक बाब हे सर्वांनी मान्य केले आहे. आम्ही सर्वच सरकारच्या सूचनांचे पालन करणार आहोत. असे असले तरी संघमालकांना वाटत नाही, की मार्चअखेरपर्यंत यावर काही निर्णय होऊ शकेल. थांबा आणि वाट पाहा असेच धोरण सर्वांनी स्वीकारले आहे. 


वाडिया म्हणाले, की जोपर्यंत आयपीएलच्या कार्यक्रमांबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय होऊ शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी मात्र बैठकीतील चर्चेबाबत काहीही स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. 

आयपीएलला धोका नसल्याचा दावा

5 मार्च ः कमी देशांमध्ये क्रिकेट खेळले जाणे इंडियन प्रीमियर लीगच्या Indian Premier League | IPL | पथ्यावर पडण्याची आशा आयोजकांना आहे. कारण घातक करोना विषाणूच्या संसर्गामुळे टी-२० लीग नियोजित कार्यक्रमानुसार सुरू होणार नसल्याची चर्चा होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयपीएलवरही या विषाणू संसर्गाचा प्रभाव पडू शकतो. मात्र, तसे काही घडू शकेल अशी शक्यता नसल्याचे आयोजकांना वाटते. कारण कमी देशांमध्ये क्रिकेट खेळले जाते. त्यात विदेशी खेळाडूंची संख्याही कमी आहे. आयपीएल IPL | स्पर्धा २९ मार्चपासून मुंबई येथे सुरू होणार आहे. भारतात पाच मार्चपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या २९ होती. त्यापैकी १६ परदेशी नागरिक आहेत. आयपीएल IPL | स्पर्धेतील आठही फ्रँचाइजी संघांमध्ये असलेल्या परदेशी खेळाडूंना आतापर्यंत भारत दौरा करण्यात कोणतीही शंका व्यक्त केलेली नाही.

आयपीएल नियोजित कार्यक्रमानुसारच : गांगुली

6 मार्च ः बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले होते, की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) Indian Premier League | IPL | पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होईल आणि करोना विषाणूंचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. मुंबईत २९ मार्च रोजी आयपीएल स्पर्धेचा नियोजित कार्यक्रम आहे. गांगुलीने सांगितले, की आयपीएल IPL | पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच होईल. अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. इंग्लंडचा संघ श्रीलंकेत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. कोणतीही अडचण येत नाही. कौंटी संघ जगभर दौरे करीत आहे. ते खेळण्यासाठी अबुधाबी, दुबई जात आहेत. त्यामुळे कोणतीही समस्या नाही, असे गांगुलीने स्पष्ट केले. गांगुली म्हणाला, की आम्ही सर्व उपाययोजना करू. मला माहीत नाही, की अतिरिक्त उपाय काय आहेत? तपासणी पथकच याबाबत माहिती देऊ शकेल. सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी तपासणी पथक रुग्णालयांच्या संपर्कात आहेत. ते जसे सांगतील तशा उपाययोजना केल्या जातील.

प्रेक्षकांविना आयपीएल स्पर्धा घेण्याचा मानस होता. मात्र, आता तारीखही पुढे ढकलावी लागली आहे. 

प्रेक्षकांविना आयपीएल

11 मार्च ः इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 11 मार्चपर्यंत २९ मार्चपासूनच होणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र या स्पर्धेवर करोनाचे सावट पसरल्यानंतर अनेक शक्यता पडताळून पाहिल्या जात होत्या. क्रीडा मंंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक परिषदेसह इतर राष्ट्रीय महासंघांना स्पष्टपणे सूचना केली, की कोणत्याही स्पर्धा आयोजित करताना त्या प्रेक्षकांविनाच घ्याव्या लागतील. ही सूचना अर्थातच आयपीएललाही लागू होते. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी आयएनएसशी बोलताना स्पष्ट केले, की जर एखादी क्रीडा स्पर्धा टाळता येणार नसेल तर ती बंद दरवाजातच घ्यावी लागेल. एकही प्रेक्षक येऊ शकणार नाही याची काळजी आयोजकांना घ्यावी लागेल.

जुलानिया यांनी सांगितले, की बीसीसीआयसह सर्व क्रीडा महासंघांना हा निर्णय लागू राहणार आहे. त्याला कोणतीही संघटना अपवाद नसेल. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक आहे.

जुलानिया यांनी असेही सांगितले, की राज्य सरकारने प्रेक्षकांवर बंदी घालणे आवश्यक आहे. महामारी आजार अधिनियमानुसार (१८९७ ची महामारी अधिनियम) ही सूचना करण्यात आलेली आहे. सरकारच्या या निर्णयानुसार स्पष्ट आहे, की आयपीएल प्रथमच प्रेक्षकांविना होईल.

परदेशी खेळाडूंबाबत प्रश्नचिन्ह

१२ मार्च ः घातक करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने व्हिसाबंदीचा निर्णय घेतल्याने आयपीएलच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे एकही परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही. यापूर्वीच आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना आयोजित करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण २९ मार्चपासून मुंबईत आयपीएल स्पर्धा सुरू होणार असून, पहिल्या टप्प्यात ६० परदेशी खेळाडू उपलब्ध होऊ शकणार नाहीत. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, की ‘‘आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू बिझनेस व्हिसा श्रेणीत येतात. सरकारच्या सूचनेनुसार ते १५ एप्रिलपर्यंत उपलब्धच होऊ शकणार नाहीत.’’

आयपीएलबाबत १४ मार्च रोजी निर्णय

आयपीएल स्पर्धा घ्यावी की स्थगित करावी, याबाबतचा निर्णय मुंबईत १४ मार्च रोजी होणार आहे.  आयपीएलचे सर्व निर्णय संचालन परिषद घेते. त्यामुळे या परिषदेच्या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भारतात करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने सध्या १५ एप्रिलपर्यंत व्हिसा निलंबित केले आहेत. भारतात ६० जणांना करोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे. जगभरात आतापर्यंत चार हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

परदेशी खेळाडूंविना स्पर्धा?

सध्या सरकारच्या सूचनेनुसार प्रेक्षकांविना स्पर्धा घेण्याबाबत विचार सुरू आहे, तसेच परदेशी खेळाडू उपलब्ध होणार नसतील तर त्यांच्याशिवाय स्पर्धा घेण्याचाही एक पर्याय संचालन परिषदेसमोर आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना बसणार आर्थिक फटका?

19 मार्च : करोना विषाणूच्या धास्तीमुळे आयपीएल धोक्यात आल्यानंतर क्रिकेटविश्वात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अॅरोन फिंच Aaron Finch | याने सांगितले, की जर कोविड-19 महामारीमुळे आयपीएल आणि स्थानिक क्रिकेट सत्राचे आयोजन झाले नाही तर देशातील क्रिकेटपटूंना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल आणि नाइलाजाने हे स्वीकारावे लागेल. कारण या महामारीला सामोरे जाताना ‘आम्ही सर्व सोबत आहोत.’
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने Cricket Australia | आधीच सांगितले आहे, की आयपीएलसाठी खेळाडूंना दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राचा NOC |  आम्ही पुनर्विचार करू. आता तर सरकारने निर्बंधही घातल्याने आयपीएलमध्ये सहभाग घेणेही खेळाडूंना शक्य होणार नाही. यापूर्वी आयपीएल 29 मार्च रोजी सुरू होणार होती. मात्र, आता ती 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. ऑस्ट्रेलियातील कमीत कमी 17 क्रिकेटपटूंचा आयपीएलशी करार आहे. याशिवाय इतर लोकही या स्पर्धेशी संबंधित आहेत. ऑस्ट्रेलियाला या वर्षअखेरीस कसोटी मालिका आणि टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतात यावे लागणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू संघात फिंचचा समावेश आहे. आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला सर्वाधिक किमत मिळाली होती. स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेललाही घसघशीत रक्कम मिळाली होती. रिकी पॉंटिंग दिल्ली डेअरडेव्हिल्सचा, तर अँड्र्यू मॅकडोनाल्ड राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक आहे. माजी कसोटी फलंदाच सायमन कॅटिच आरसीबीचा प्रशिक्षक आहे. त्याचा सहाय्यक अॅडम ग्रिफिथ आहे.


Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

Coronavirus : टोकियो ऑलिम्पिक अखेर स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!