Athletics
अॅथलेटिक्स (athletics) क्रीडा प्रकारातील विविध घडामोडींची माहिती देणारे दालन. जगभरातील खेळाडूंच्या कामगिरीचा वेध घेणारे हे दालन असून, यात अॅथलेटिक्स खेळाचे प्रकार, तसेच इतिहास, खेळाडूंची कामगिरी आदी माहितीचा अंतर्भाव या कॅटेगरीत आहे. अॅथलेटिक्समध्ये अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश होतो. या क्रीडा प्रकारांचे वेगवेगळे कौशल्य आहे. धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक अशा किती तरी क्रीडा प्रकारांचा समावेश अॅथलेटिक्समध्ये (athletics) येतो. या खेळांची माहिती बहुतांश मुलांना माहिती नाही. ही माहिती खेळियाडच्या पेजमध्ये तुम्हाला मिळेल. त्यासाठी आम्हाला लाइक जरूर करा.
अॅथलेटिक्स (athletics) स्पर्धात्मक धावणे, उडी मारणे, फेकणे आणि चालण्याच्या स्पर्धांचा एक विशेष संग्रह आहे. अॅथलेटिक्स अंतर्गत सामान्यपणे ट्रँक अँड फिल्ड, रोड रनिंग, क्रॉस कंट्री रनिंग आणि रेस वॉकिंग स्पर्धांचा समावेश केला जातो. संघटनात्मक अॅथलेटिक्स (athletics) स्पर्धांचे आयोजन इसवीसनपूर्व 776 मध्ये प्राचीन ऑलिम्पिक खेळांमध्ये होत आला आहे. त्यानंतर सर्वांत आधुनिक स्पर्धांचे आयोजन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनच्या (आयएएएफ) सदस्य क्लबद्वारे केला जातो. आधुनिक उन्हाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये आणि अन्य प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये जसे आयएएएफ जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा आणि जागतिक इंडोअर स्पर्धेचा अॅथलेटिक्स अभिन्न अंग आहे. उन्हाळी पॅरालिम्पिक आणि आयपीसी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत खेळाडू सहभाग घेतात. अॅथलेटिक्स (athletics) खेळाची सर्वोच्च संघटना इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स (athletics) फेडरेशन आहे.
[WPSM_COLORBOX id=6392]
-
ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अर्शद नदीम आणि पाकिस्तानातील श्रेयवादाची भालाफेक
ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अर्शद नदीम आणि पाकिस्तानातील श्रेयवादाची भालाफेक पंजाब प्रांतातील खानेवाल गावातला 27 वर्षीय अर्शद नदीम याने कमाल केली…
Read More » -
Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!
जेस्विन अल्ड्रिन (Jeswin Aldrin) याची लांब उडीत ((Long Jump)) 8.42 मीटर कामगिरी 2022 मध्ये फेडरेशन कपमध्ये श्रीशंकरने केलेला 8.36 मीटरचा…
Read More » -
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham) याची साहसी आणि प्रेरणादायी कहाणी अनेक पिढ्यांसाठी आदर्श आहे. आगीत…
Read More » -
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेत 1967 मध्ये पहिल्यांदाच एक महिला धावली. ती होती अमेरिकेची कॅथरिन स्वित्झर. या पुरुषप्रधान शर्यतीला कॅथरिनने जेव्हा तडा…
Read More » -
‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स
अमेरिकेच्या ‘ट्रॅक अँड फील्ड’च्या इतिहासात सर्वाधिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी एलिसन फेलिक्स (Allyson Felix) हिने निवृत्तीचे संकेत दिले. 2022 च्या मोसमानंतर…
Read More » -
धक्कादायक! इक्वाडोरच्या धावपटूला गोळ्या घातल्या!!!
इक्वाडोरच्या ३२ वर्षीय धावपटूची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अॅलेक्स क्विनोनेज असे या धावपटूचे नाव असून, त्याची बंदरगाह…
Read More » -
100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे?
100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे? आपल्याला वारा जाणवतो, पण तो कधी दिसत नाही. तो पाहायचा असेल, तर मी…
Read More »