• Latest
  • Trending
या 12 क्रिकेटपटूंना मैदानावर गमवावे लागले प्राण!

या 12 क्रिकेटपटूंना मैदानावर गमवावे लागले प्राण!

December 22, 2021
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 2, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

या 12 क्रिकेटपटूंना मैदानावर गमवावे लागले प्राण!

ऐन तारुण्यात क्रिकेटपटूचा मृत्यू चाहत्यांसाठी चटका लावणारा आहे. असेच काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांचा मृत्यू क्रीडाविश्वात धक्कादायक ठरला आहे.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 22, 2021
in All Sports, Cricket
0
या 12 क्रिकेटपटूंना मैदानावर गमवावे लागले प्राण!
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

क्रिकेट असो वा अन्य कोणताही खेळ, त्यात जखमी होणे विशेष नाही. किंबहुना ते खेळाडूंनी गृहीतच धरलेले असते. आता तर इतकी सुरक्षा साधने आली आहेत, की खेळाडू निर्धोकपणे खेळू शकतात. असे असले तरी काही क्रिकेटपटूंना चेंडू लागल्याने मैदानावरच प्राण सोडावे लागले आहेत. ऐन तारुण्यात क्रिकेटपटूचा मृत्यू चाहत्यांसाठी चटका लावणारा आहे. असेच काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांचा मृत्यू क्रीडाविश्वात धक्कादायक ठरला आहे.

1. फिलिप ह्यूज, ऑस्ट्रेलिया (वय 25)

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू फिलिप ह्यूज याचा 2009 मधील मृत्यू धक्कादायक ठरला. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज फिलिप ह्यूज (Phillip Joel Hughes) याचा मृत्यू क्रिकेटविश्वाला चटका लावून गेला. प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात फलंदाजी करताना त्याच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने तो मैदानावरच कोसळला. ह्यूजने कसोटी क्रिकेटमध्ये 2009 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी पदार्पण केले होते. शेफिल्ड शील्ड या प्रथम श्रेणी स्पर्धेतील सामन्यात 63 धावांवर खेळत असताना सिन एबॉटच्या बाऊन्सरवर ह्यूज जखमी झाला. त्याच्या डोक्याला चेंडू इतक्या वेगाने आदळला की तो कोमात गेला. दोन दिवस तो कोमात होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याचा वाढदिवस 30 नोव्हेंबरला होता. त्याच्या तीन दिवसांपूर्वीच त्याने वयाच्या 25 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने ह्यूजला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केला. एडिलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 408 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. हा ह्यूजचा टेस्ट कॅप क्रमांक होता. कारण कसोटी सामन्यात पदार्पण करणारा ह्यूज 408 वा खेळाडू होता. याशिवाय बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध खेळताना ह्यूजला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली होती. ऑस्ट्रेलिया संघ केवळ दहा खेळाडूंसह मैदानात उतरला. अकरावा खेळाडू ह्यूजचा समावेश केला होता. यापूर्वी क्रिकेटच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात 0/1 अशी होती. म्हणजे डावाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने एक गडी गमावलेला असेल. जी विकेट गमावली ती फिलिप ह्यूजची होती. त्यामुळे फिलिप ह्यूज क्रिकेटप्रेमींच्या कायमचा लक्षात राहिला.

2. डॅरिन रेंडॉल, दक्षिण आफ्रिका (वय 32)

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डॅरिन रँडल याचा मृत्यू धक्कादायक ठरला. उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक डॅरिन रँडल (Darryn Randall) याचा मृत्यू मैदानावरच झाला. त्या वेळी तो अवघ्या 32 वर्षांचा होता. दोन डिसेंबर 1980 मध्ये जन्मलेल्या डॅरिनने 2009 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. इस्टर्न केपमधील अ‍ॅलिस शहरात 27 ऑक्टोबर 2013 रोजी झालेल्या एका सामन्यात पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात डोक्याला चेंडू लागल्याने डॅरिन मैदानावर कोसळला. हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 

3. झुल्फिकार भट्टी, पाकिस्तान (वय 22)

प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळताना चेंडू छातीवर लागल्याने पाकिस्तानातील क्रिकेटपटू झुल्फिकार याचा मृत्यूही धक्कादायक ठरला. झुल्फिकार अली भट्टी (Zulfiqar Bhatti) हा क्रिकेटपटू खेळपट्टीवरच कोसळला. त्याला तातडीने हॉस्टिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्या वेळी त्याचे वय होते अवघे 22 वर्षे. सिंध प्रांतातील सुक्कूर येथे बेगम खुर्शीद स्मृतीकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळताना चेंडू छातीवर लागला. हा चेंडू इतक्या वेगाने आदळला, की हृदयविकाराने त्याचा जागीच मृत्यू झाला. डॅरिनसारखाच पुल शॉट खेळताना ही घटना घडली. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी झुल्फिकारने 19 डिसेंबर 2013 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

4. रिचर्ड ब्यूमोंट, इंग्लंड (वय 33)

क्रिकेटच्या मैदानावर चेंडू डोक्याला किंवा छातीवर आदळून खेळाडूंचा मृत्यू झाले आहेत, पण रिचर्ड ब्युमाँटच्या (Richard Beaumont) मृत्यूला यापैकी कोणताही अपघात कारणीभूत ठरला नाही, तर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तो मैदानावरच कोसळला. पेडमोर क्रिकेट क्लब आणि आस्टवूड बँक क्रिकेट क्लब या दोन संघांदरम्यान सुरू असलेल्या सामन्यात तो क्षेत्ररक्षण करीत होता. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्याचा  5 ऑगस्ट 2012 रोजी मृत्यू झाला. त्या वेळी तो 33 वर्षांचा होता. ब्युमाँट हा पेडमोर संघाकडून खेळत होता. क्रिकेटपटू ब्युमाँटचा मैदानावरील मृत्यू क्रिकेटविश्वात धक्कादायक ठरला.  

5. एल्क्विन जेनकिन्स, इंग्लंड (वय 72)

मैदानावर खेळाडूंचाच मृत्यू झाला नाही तर अंपायरही या दुर्घटनेचे शिकार झाले आहेत. इंग्लंडचे अंपायर अल्क्विन जेनकिन्स (Alcwyn Jenkins) जुलै 2009 मध्ये लीग सामन्यात अपायरिंग करीत असताना एका क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू त्यांच्या डोक्याला लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा लीग सामना स्वान्सी (Swansea) विरुद्ध लँजेनेक (Llangennech) या दोन संघांदरम्यान सुरू होता. त्यांनी कारकिर्दीतली 25 वर्षे अंपायरिंग केली. अल्क्विन क्रिकेटपटू नव्हते, मात्र अंपायर असताना त्यांचा असा मृत्यू येणे धक्कादायक होते.

6. वसिम रजा, पाकिस्तान (वय 54)

वसिम हसन रजा (Wasim Raja) यांनी पाकिस्तान संघाकडून 1973 ते 1985 दरम्यान 57 कसोटी सामने आणि 54 एकदिवसीय सामने खेळले आहेत. रमीझ रजाचे ते मोठे बंधू. वसिम रजा पन्नाशीनंतरही क्रिकेट खेळत होते. 50 पेक्षा अधिक वयाच्या सरे क्रिकेट स्पर्धेत बकिंगहॅम्पशायरमधील मार्लो येथे झालेल्या सामन्यात खेळताना त्याना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा वयाच्या 54 व्या वर्षी 23 ऑगस्ट 2006 रोजी मृत्यू झाला.

7. रमण लांबा, भारत (वय 38)

भारताचा फलंदाज रमण लांबा (Raman Lamba) यांचा जन्म 2 जानेवारी 1960 रोजी मेरठमध्ये झाला. त्यांनी भारताकडून चार कसोटी आणि 32 एकदिवसीय सामने खेळले आहेत. उजव्या हाताचे फलंदाज असलेले रमण लांबा यांचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करताना त्यांनी कधीच हेल्मेट परिधान केलेले नाही. अनेकांनी त्याला हेल्मेट परिधान करण्याचा सल्ला दिला, तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलं. हेल्मेटशिवाय फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करण्याचं त्यांचं हेच वैशिष्ट्य त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं. 1998 मध्ये ढाक्यात एका क्लब मॅचदरम्यान फिल्डिंग करताना लांबा यांच्या डोक्याला चेंडू लागला. या गंभीर आघाताने लांबा तीन दिवस बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर ते कधीच शुद्धीवर आले नाहीत. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांचा मृत्यू क्रिकेटविश्वाला चटका लावून गेला.अबाहानीचा कर्णधार खालिद मसूदने लांबाला शॉर्ट लेगवर फिल्डिंगसाठी नेमले होते. षटकातील तीन चेंडू बाकी असताना मसूदने लांबाला हेल्मेट परिधान करण्यास सांगितले. मात्र, लांबा म्हणाला, की आता केवळ तीनच चेंडू बाकी आहेत. त्या वेळी गोलंदाज सैफुल्लाह खानने चेंडू टाकला. तो आखूड टप्प्याचा होता. फलंदाज मेहराब हुसेनने या आखूड टप्प्याच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना खणखणीतपणे तो टोलवला. जवळच उभ्या असलेले लांबाच्या डोक्याला लागून यष्टिरक्षक मसूदकडे गेला. त्यानंतर तीन दिवस लांबा बेशुद्धच होता. त्यातच त्याचा 23 फेब्रुवारी 1998 रोजी मृत्यू झाला.

8. इयान फोली, इंग्लंड (वय 30)

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डर्बिशायर संघाकडून खेळताना 1993 मध्ये इयान फोली (Ian Folley) याला डोळ्याच्या खाली चेंडू लागला. अवघ्या तिशीतला फोली या चेंडूमुळे गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने तेथेच त्याचा मृत्यू झाला. वर्किंगटन संघाविरुद्ध तो खेळत होता. इंग्लंडमध्ये जन्मलेला इयान उजव्या हाताचा फलंदाज होता. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला 1982 मध्ये एक गोलंदाज म्हणूनच सुरुवात झाली होती.

9. विल्फ स्लॅक, इंग्लंड (वय 34)

विल्फ स्लॅक (Wilf Slack) मूळचा सेंट विन्सेंट या बेटावरचा. ट्रौमॅका गावात जन्मलेल्या स्लॅकने इंग्लंड संघाकडून तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. डाव्या हाताचा फलंदाज असलेला स्लॅक सलामीचा फलंदाज. 1989 मध्ये गांबियातील प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात खेळता खेळताच तो मैदानावर कोसळला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा वयाच्या 34 व्या वर्षी मृत्यू झाला. स्लॅक यापूर्वीही मैदानावर चार वेळा बेशुद्ध पडला होता. वैद्यकीय तपासण्यांनंतरही स्लॅकच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

10. अब्दुल अजिज, पाकिस्तान (वय 18)

भारताइतकंच पाकिस्तानात क्रिकेटप्रेम शिखरावर आहे.  कराचीत 1959 मध्ये झालेल्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात फलंदाजी करताना अब्दुल अजिज (Abdul Aziz) याच्या डोक्याला चेंडू लागला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा 17 जानेवारी 1959 रोजी मृत्यू झाला. तो अवघ्या 18 वर्षांचा होता. तो पाकिस्तान स्टेट बँकेत नोकरीला होता. उजव्या हाताची फलंदाजी, तसेच यष्टिरक्षक म्हणून ओळखला जाणारा अब्दुल अजिज कारकिर्दीत आठ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत.

11. अँड्र्यू ड्युकाट, इंग्लंड (वय 56)

इंग्लंड आणि सरे संघाचे क्रिकेटपटू अँड्र्यू ड्युकाट (Andy (Andrew) Ducat ) यांचे लॉर्ड्सवर 1942 मध्ये एका सामन्यात मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. सरे संघटना पन्नाशी ओलांडलेल्या खेळाडूंचे सामने आयोजित करते. ड्युकाट यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते क्रिकेटपटूच नव्हे, तर उत्तम फुटबॉलपटूही होते. लंडनमधील ब्रिक्स्टनमध्ये जन्मलेले ड्युकाट यांनी कारकिर्दीत 429 प्रथम श्रेणीतील सामने खेळले आहेत, तर 1 आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला आहे. त्यांनी 1931 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते पाच वर्षे एका महाविद्यालयीन संघाचे प्रशिक्षकही होते. डेली स्केच या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले होते. 1942 मध्ये सरे संघाकडून खेळताना सामन्याच्या मध्यांतराला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. ड्युकाट एकमेव खेळाडू आहेत, ज्यांचा लॉर्ड्सवर सामना खेळताना मृत्यू झाला.

12. जॉर्ज समर्स, इंग्लंड (वय 25)

इंग्लंडचे जॉर्ज समर्स (George Summers) आज असते तर त्यांचे वय 175 असते! रमण लांबा असो वा अन्य खेळाडू, ज्यांना सुविधा असतानाही चेंडूचा फटका बसल्याने जीव गमवावा लागला. विचार करा, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी क्रिकेटच्या सुरक्षा साधनांबाबत काय स्थिती असेल? उजव्या हाताचे फलंदाज जॉर्ज समर्स प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळत होते. 1870 मध्ये एमसीसी संघाविरुद्ध नॉटिंगहॅमशायर संघाकडून फलंदाजी करीत असताना एमसीसीचे वेगवान गोलंदाज जॉन प्लॅट्स यांचा उसळता चेंडू जॉर्ज यांच्या डोक्याला लागला. चेंडूचा तो गंभीर मार असला तरी जॉर्ज यांनी कोणतेही उपचार घेतले नाहीत. ते घरी परतले. त्यांना वाटले, होईल सगळे ठीक. अखेर चार दिवसांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जॉर्ज यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या वेळी लॉर्ड्सची खेळपट्टी अतिशय निकृष्ट दर्जाची होती. जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर लॉर्ड्सची खेळपट्टी सुधारण्यात आली. नंतर वेगवान गोलंदाजी करण्याची कोणीही हिंमत केली नाही, एवढा मोठा धक्का त्या वेळी जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर खेळाडूंनी घेतला होता. रिचर्ड डाफ्ट यांनी जॉर्ज यांच्या मृत्यूचा इतका धसका घेतला होता, की वेगवान गोलंदाजीचा निषेध म्हणून डोक्याला टॉवेल गुंडाळूनच ते मैदानावर उतरले होते.

सुमो पहिलवानाच्या मृत्यूने क्रीडाविश्वाला धक्का

Follow on Facebook Page kheliyad

Read more at:

महिला क्रिकेट वर्ल्ड कप
All Sports

महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 2, 2023
भारतीय क्रिकेट 2022
All Sports

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे वेळापत्रक
All Sports

टी 20 वर्ल्ड कप 2022 स्पर्धेचे वेळापत्रक

October 30, 2022
वर्ल्ड कप वेस्ट इंडीज
All Sports

टी-20 वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज संघाच्या पराभवाची कारणे

October 22, 2022
आशिया कप
All Sports

आशिया कप- भूक पोटाची नि विजयाची!

October 22, 2022
टी 20 विश्वचषक
All Sports

मिशन टी 20 विश्वचषक- भारत 13 वर्षांपासून वंचित

October 19, 2022

Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
गोदा स्वच्छतेचा मंत्र देणारा ‘पंडित’!

गोदा स्वच्छतेचा मंत्र देणारा ‘पंडित’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!