• Latest
  • Trending
जर्मनीत ‘फाशिंग’

जर्मनीत ‘फाशिंग’

November 21, 2021
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
कतार फिफा वर्ल्ड कप

कतार फिफा वर्ल्ड कप वेळापत्रक 2022

November 21, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

जर्मनीत ‘फाशिंग’

सेरेनाचा चौफेर उधळणारा विजयाचा वारू शनिवारी एका २८ वर्षीय जर्मनीच्या तरुणीने रोखला. ती तरुणी आहे अँजेलिक कर्बर (Angelique Kerber). ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे कारकिर्दीतले पहिलेवहिले विजेतेपद साकारणाऱ्या लढावू अँजेलिकविषयी...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
November 21, 2021
in All Sports, Inspirational Sport story, Tennis
0
जर्मनीत ‘फाशिंग’
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

टेनिसविश्वात सेरेना नावाचं वादळ अखेर काही काळासाठी का होईना शमलं आहे. सेरेनाचा चौफेर उधळणारा विजयाचा वारू शनिवारी एका २८ वर्षीय जर्मनीच्या तरुणीने रोखला. ती तरुणी आहे अँजेलिक कर्बर (Angelique Kerber). ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे कारकिर्दीतले पहिलेवहिले विजेतेपद साकारणाऱ्या लढावू अँजेलिकविषयी…

kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

जगभरात निसर्गनिर्मित साधारणपणे चार ऋतू असतात. वसंत ऋतू, उन्हाळा, शरद ऋतू आणि हिवाळा. मात्र जर्मनीत फाशिंग उत्सवाला ‘पाचवा ऋतू’ मानतात. हा उत्सव म्हणजे फक्त नि फक्त धम्माल-मस्ती करणे. अगदी आनंदाची पर्वणीच! जर्मनीत शनिवारी जणू फाशिंग उत्सवाचंच वातावरण असेल. खळाळणारी राइन नदी जर्मनवासीयांना जणू आनंदाने बागडताना भासत असेल. अगदी ब्रेमेन शहरातल्या वेसर नदीतूनही आनंदलहरी उमटल्या असतील. कारण होतं, अँजेलिक कर्बर (Angelique Kerber) हिने जिंकलेलं ऑस्ट्रेलियन ओपनचं महिला एकेरीचं विजेतेपद. हे विजेतेपद साधंसुधं मुळीच नव्हतं. समोर सेरेना नावाचं वादळ होतं. या वादळाशी सामना करून जिंकलेलं अँजेलिकचं विजेतेपद म्हणूनच उल्लेखनीय म्हणावं लागेल.

तब्बल १७ वर्षांच्या कालखंडानंतर जर्मनीच्या दारात प्रथमच ग्रँडस्लॅमचं तोरण झळकलं होतं. स्टेफी ग्राफने १९९९ मध्ये जर्मनीला फ्रेंच ओपन जिंकून दिलं. हेच ते शेवटचं ग्रँड स्लॅम. आणि स्टेफीनेच १९९४ मध्ये शेवटचं ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद जिंकून दिलं. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी अँजेलिक कर्बर (Angelique Kerber) हिने हे विजेतेपद जर्मनीसाठी जिंकून दिलं. या विजयाचं आणखी  एक वैशिष्ट्य म्हणजे स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचं सेरेनाचं स्वप्नही अँजेलिकमुळे भंगलं. आपल्याच देशभगिनीचा विक्रम अबाधित ठेवणाऱ्या अँजेलिकचं कारकिर्दीतलं पहिलंवहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून टेनिसचे धडे गिरवणाऱ्या अंजेलिकला तिच्या आईवडिलांचं प्रोत्साहन मोलाचं ठरलं. ब्रेमेन शहरातली रहिवासी असलेल्या अँजेलिकने सराव कधी चुकवला नाही.

डब्लूटीए चॅम्पियनशिपवगळता फारसे मोठे यशही हाती येत नसतानाही ती नेटाने खेळत राहिली. दिलासा एवढाच होता, की जागतिक क्रमवारीत ती पहिल्या पाच क्रमांकांत होती. अँजेलिक कर्बर (Angelique Kerber) हिने २०११ च्या अमेरिकन ओपनमध्ये प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्या वेळी ती जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासातही नव्हती. ९२ व्या स्थानी होती! मात्र, तिची विजिगीषू वृत्ती इतकी तीव्र होती, की त्याच्या पुढच्याच वर्षी ऑक्टोबर २०१२ मध्ये तिने ९२ वरून थेट पाचव्या स्थानी मजल मारली. ९२ ते ५ वे स्थान हा प्रवासच मुळी थक्क करणारा होता. यंदा ऑस्ट्रेलियन ओपनसाठी मेलबर्नच्या कोर्टवर उतरली तेव्हा ती जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरलेली होती. टेनिसमध्ये जागतिक स्थान उंचावण्यापेक्षाही टिकविण्याचे आव्हान मोठे असते. त्या तुलनेत तिची प्रतिस्पर्धी जगातील अव्वल खेळाडू सेरेना विल्यम्स पहिल्या स्थानावर टिकून होती. या दोघींतला स्थान टिकविण्यातला फरकच पाहिला तर कोणीही सेरेनाच्याच पारड्यात विजेतेपदाची दावेदारी टाकेल. मात्र, अँजेलिक विचलित झाली नाही. ती विचलित झाली नाही. लढावू अँजेलिक म्हणूनच सेरेना नावाच्या वादळाशी सामना करू शकली.

जर्मनीच्या टेनिसला समृद्ध करणारी कालपर्यंत दोनच नावे डोळ्यांसमोर होती. एक म्हणजे स्टेफी ग्राफ, दुसरं नाव म्हणजे बोरिस बेकर. आंद्रे अगासीशी विवाहबद्ध झाल्यानंतर स्टेफी आता अमेरिकेत स्थायिक झाली असली तरी ती जर्मनीची टेनिससम्राज्ञी होती हे अद्याप कोणीही विसरलेले नाही. जर्मनीच्या टेनिसवर ठळकपणे कोरलेली कालपर्यंत हीच ती दोन नावे होती. अगदी अँजेलिकने पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळवल्यानंतरही टेनिसविश्वात ती एक जर्मनीची साधारण खेळाडू म्हणूनच ओळखली जात होती. मात्र, शनिवारी तिने सिद्ध केलं, की मी एक असाधारण खेळाडू आहे.

क्रीडाप्रेमी जर्मनी

मुळात जर्मनीच्या रक्तातच खेळ आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. जर्मनीला फुटबॉलप्रेमींचा देश म्हणावा, की बास्केटबॉलप्रेमींचा. अवघ्या आठ कोटींच्या या देशातील (जगात १७ व्या स्थानी) नागरिकांचं खेळाशी नातं अत्यंत घनिष्ठ राहिलेलं आहे. तब्बल पावणेतीन कोटी नागरिक देशभरातील विविध ९१ हजार स्पोर्ट क्लबचे मेंबर आहेत. हे सर्व क्लब जर्मन ऑलिम्पिक स्पोर्ट फेडरेशनशी संलग्न आहेत हे सर्वांत महत्त्वाचे. फुटबॉल या देशातला सर्वाधिक खेळला जाणारा खेळ. फुटबॉलखालोखाल आइस हॉकी जर्मनीतला लोकप्रिय खेळ आहे. मोटरस्पोर्टसमध्येही जर्मनी जगातला सर्वांत आघाडीचा देश. मायकेल शुमाकर आणि सेबास्टियन व्हेट्टेल याच देशातले जागतिक विजेते खेळाडू. बुद्धिबळावरही हा देश कधी मागे राहिला नाही. ८४ ग्रँडमास्टर आणि २४२ आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान मिळविणारे या देशात आहेत. १२८ कोटींच्या भारतात मोठ्या मुश्किलीने ४० वर ग्रँडमास्टर असतील! अर्थात जागतिक विजेता विश्वनाथन आनंद हे आपलं जसं वैभव आहे, तसंच जर्मनीत एकेकाळी इम्यॅन्युअल लास्कर वयाच्या २७ व्या वर्षी जागतिक विजेता होऊन गेला आहे. या खेळांमध्ये टेनिसचा क्रमांक आठव्या- नवव्या स्थानी घसरलेला आहे. मात्र, टेनिसचा दर्जा जगातील पहिल्या दहा क्रमांकात आहे हे विशेष.

स्टेफी ग्राफनंतर अँजेलिक?

जर्मनीच्या टेनिस इतिहासातच नव्हे, तर जगाचा टेनिस इतिहास ज्या ज्यावेळी लिहिला जाईल त्यात स्टेफी ग्राफचं नाव अग्रक्रमाने घेतलं जाईल. स्टेफी ग्राफनंतर जर्मनीची एकही महिला टेनिसवर छाप पाडू शकली नाही. अँजेलिक कर्बर (Angelique Kerber) हिने मात्र ही उणीव भरून काढली. वयाच्या २८ व्या वर्षी तिने कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं असलं तरी आव्हाने संपलेली नाहीत. स्टेफीनंतर तिचं नाव घेतलं जात असलं तरी स्टेफीइतकं उज्ज्वल यश मिळवणं खूप अवघड आहे. स्टेफीने एकाच वर्षात गोल्डन स्लॅम मिळविण्याच बहुमान मिळविला होता. गोल्डन स्लॅम मिळविणारी स्टेफी जगातली (पुरुष व महिलांमधील) एकमेव खेळाडू आहे. सेरेनालाही तिचा विक्रम मोडता आलेला नाही. अँडेलिकला ऑस्ट्रेलियन ओपनने आत्मिविश्वास दिला आहे. आता सातत्यपूर्ण कामगिरी हेच तिचं लक्ष्य असेल. अर्थात, तिला ते अशक्य नसेल. भविष्यातला तिचा प्रवास समृद्धच असेल. तूर्तास तिच्या गावातल्या ब्रेमेनमधल्या वेसर नदीला यशाचं खळाळतं गाणं गाऊ द्या… तिच्या विजेतेपदामुळे गावात अनाहूतपणे आलेला फाशिंगचा उत्सव होऊ द्या!!!

(Maharashtra Times, Nashik & Jalgaon : 1 Feb. 2016)

All Sports

रॉजर फेडरर- ‘फेडएक्स’चा टेनिस प्रवास थांबला…

September 18, 2022
All Sports

रॉजर फेडरर याने वसूल केलेले संस्मरणीय गुण

September 23, 2022
All Sports

महिला टेनिसवर सेरेना विल्यम्स इफेक्ट

December 5, 2022
Tags: अँजेलिक कर्बर angelique kerber
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
हिजार्बी-निरागस-हवी

‘हिजार्बी’ निरागस हवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!